Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

डॉ. जगताप यांना धन्वंतरी पुरस्कार

$
0
0
फॅमिली डॉक्टर म्हणून कुटुंबांना वैद्यकीय सेवा दिल्याबद्दल डॉ. विजयकुमार जगताप यांना धन्वंतरी तसेच ‘एक्सलन्स इन फॅमिली मेडिसीन’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय ओक यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

‘सेफ्टी ऑडिट रिपोर्ट’नुसार पालिकेची कार्यवाही सुरू

$
0
0
पादचाऱ्यांची सुरक्षा..., ट्रॅफिक सिग्नल पूर्ववत..., बीआरटी मार्गावरील पथदिव्यांमध्ये सुधारणा... सातारा रोड ‘बीआरटी’च्या ‘सेफ्टी ऑडिट रिपोर्ट’मध्ये करण्यात आलेल्या शिफारशींनुसार पालिकेने तातडीने कार्यवाहीचे पाऊल उचलले आहे.

पालिकेची ऑनलाइन व्यवस्था ‘हँग’

$
0
0
पालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आणि नागरी सुविधा केंद्रांत मिळकतकर भरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना गेल्या दोन दिवसांपासून ‘सर्व्हर डाउन’ असल्याने रांगेत तिष्ठत राहावे लागत आहे.

महिलाही घेणार ‘प्लंबिंग’चे धडे

$
0
0
पुरुषांच्याबरोबरीने सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय जबाबदारी सांभळणाऱ्या महिला आता ‘कुशल मनुष्यबळा’ची गरज असलेल्या क्षेत्राकडे वळाल्या आहेत. त्यामुळे घरातील गळणारा नळ दुरुस्त करण्यापासून ते सोसायटीतील पाइप लाइनच्या फिटिंगपर्यंतची ‘प्लंबिंग’ची कामे करताना महिला दिसल्या तर यापुढे आश्चर्य वाटून घेऊ नका.

पोस्टाचे चेक आता होणार लवकर क्लिअर

$
0
0
टपाल खात्याकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या चेकची हार्डकॉपी काही बँकांकडून क्लिअरिंग हाऊसकडे पाठविली जात नसल्याने चेक रिटर्न येण्याचे प्रमाण वाढले होते. मात्र, आता बँकांकडून स्कॅन कॉपीबरोबरच हार्डकॉपी देण्यात येणार असल्याने, चेक वटण्यास होणारा विलंब टळणार आहे.

ट्रेकिंगच्या ‘फीव्हर’मुळे मलेरियाचा ‘ताप’

$
0
0
शहरानजिकच्या राजगड, भोर, वेल्हा, खेड-शिवापूर, मुळशी, मावळ, सासवड या भागात पर्यटन-ट्रेकिंगसाठी जाऊन आल्यानंतर पुणेकरांना मलेरियाचा ताप चढत असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांनी काढला आहे.

पुण्यात मतदानादिवशीच परीक्षा

$
0
0
मतदानादिवशी परीक्षा न घेण्याच्या पुणे विद्यापीठाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुण्यातील महाविद्यालयांमुळे शिक्षणासाठी पुण्यात आलेले नाशिक जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी मतदानापासून वंचित राहिले.

राहिली आठवण ‘माहिमतुरा’ची

$
0
0
लोणावळा नगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या निष्क्रियतेमुळे १६ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या लोणावळ्यातील एकमेव माहिमतुरा जलतरण तलावाची अवस्था देखभाल व दुरुस्तीअभावी उकिरड्याप्रमाणे झाली आहे.

यंदा पाऊस कमी

$
0
0
यंदा पाऊसमान कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याच्या (आयएमडी) अधिकृत अंदाजात अधोरेखित करण्यात आली आहे. सरासरीच्या ९५ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज गुरुवारी वर्तविण्यात आला.

राजकीय पक्षांना कुपोषणाचा विसर

$
0
0
देशभरातील अनेक पक्षांपैकी केवळ पाच पक्षांनीच लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कुपोषणाचा धावता उल्लेख केला असल्याची माहिती ‘क्राय-चाइल्ड राइट्स अँड यू’ या संस्थेने केलेल्या विश्लेषणातून पुढे आली आहे.

... पुन्हा नावे नोंदवावी लागणार

$
0
0
कोणत्याही कारणामुळे मतदारयादीतून नाव वगळल्या गेलेल्या सर्व पुणेकरांना पुन्हा फॉर्म क्रमांक सहा भरून मतदारनोंदणी करावी लागणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता समाप्त होताच शहर व जिल्ह्यात मतदार नोंदणीची व्यापक मोहीम प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात येणार आहे.

पुण्यात रविवारपर्यंत लोडशेडिंग

$
0
0
अकोला ते औरंगाबाद दरम्यान चारशे केव्ही वीजवाहिनीच्या क्षमतावाढीचे काम हाती घेण्यात येत असल्याने आज, शुक्रवारपासून रविवारपर्यंत पुण्यासह अन्य काही परिसरात लोडशेडिंग होण्याची शक्यता आहे.

एमसीए-सीईटीसाठी उद्याही संधी

$
0
0
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने गेल्या ३० मार्चला झालेल्या एमसीए-सीईटीला, नोंदणी करूनही काही कारणाने ज्यांना बसता आले नाही, त्यांना रविवारी (२७ एप्रिल) दुपारी दोन वाजता पुन्हा परीक्षा देता येईल.

‘आरटीई’साठी दोन शाळांनी प्रवेश नाकारले

$
0
0
बाणेर आणि शिवाजीनगर येथील दोन प्रसिद्ध शाळांनी वंचित आणि दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी काही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याची तक्रार शिक्षण हक्क मंचाने केली आहे. या शाळांची मान्यता रद्द करून दोषींवर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.

बसचालकांचे पोलिस व्हेरिफिकेशन सक्तीचे

$
0
0
शालेय परिवहन समितीच्या अध्यक्षांनी शाळेच्या स्कूल बसवरील चालकांचे पोलिस व्हेरिफिकेशन करून घ्यावे, अशी सूचना आरटीओकडून करण्यात आली आहे. तसेच शाळेमधील विद्यार्थी बसने किंवा रिक्षाने येत नसले तरी शाळांमध्ये परिवहन समितीची स्थापना बंधनकारक केली आहे.

संपदा जोशी यांच्या निलंबनाची प्राचार्य फोरममध्ये मंगळवारी चर्चा

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या निलंबित परीक्षा नियंत्रक डॉ. संपदा जोशी यांच्या निलंबनाबाबत येत्या मंगळवारी पुणे प्राचार्य फोरममध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या योजनांची माहिती देण्यासाठी येत्या २९ तारखेला पुणे विद्यापीठातर्फे प्राचार्यांची कार्यशाळा आयोजिण्यात आली आहे.

सिगारेटसाठी मजुरावर अज्ञातांचा अॅसिड हल्ला

$
0
0
सिगारेट दिली नाही, म्हणून २४ वर्षीय मजूरावर चार अज्ञात इसमांनी अॅसिडचा हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. मुठा नदीच्या पात्रामध्ये झालेल्या या प्रकारामध्ये शेखर प्रल्हाद भारतीय (वय २४, रा. कर्वेनगर) चाळीस टक्के भाजला असून त्याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

निवडणुकीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा

$
0
0
निवडणुकीचे काम करताना शासकीय अधिकारी आणि सरकारी कर्मचारी यांना दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागत असल्याने निवडणुकीच्या कामात दिरंगाई होते. निवडणुकीच्या कामासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची नेमणुका करताना कर्मचाऱ्यांना कुठल्याही भागात नियुक्त केले जात असल्याने त्यात अनेक अडचणी निर्माण होतात.

आचारसंहिता शिथिल करण्याबाबत संभ्रम कायम

$
0
0
राज्यातील निवडणुकीचा टप्पा संपल्यानंतर आचारसंहिता शिथिल होण्याची वाट पाहणाऱ्या राजकीय नेत्यांना मतमोजणी होईपर्यंतची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

सोन्याचे दागिने चोरणारा विद्यार्थी अटकेत

$
0
0
सोन्याचे दागिने चोरणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. अभिषेक अरुण कांबळे (वय २०, रा. राऊत हाइट्स, सिंहगड रोड) असे त्याचे नाव असून, तो प्रथम वर्षात शिकतो. त्याच्याकडून १३ लाख १९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images