Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

चेक वटण्यासाठी आणखी महिना थांबा...

0
0
रिझर्व्ह बँकेतर्फे चेक वटविण्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेली ‘सीटीएस’ प्रणाली अजूनही पुरेशी रूळलेली नाही. त्यामुळे काही खातेदारांना चेक वटण्यासाठी किमान आठवडाभर तरी वाट पाहावी लागत असल्याने खातेदार त्रस्त झाले आहेत.

बोर्डाकडून वाहनांची होणार झाडाझडती

0
0
पुणे महापालिका आणि पुणे कँटोन्मेंट बोर्ड यांच्या हद्दी एकमेकांना लागून असल्याचा फटका वाहन मालक-चालक आणि व्यापारी वर्गाला बसणार आहे. कारण पुणे आणि अन्य कोणत्याही ठिकाणांहून माल खरेदी करून बोर्डाच्या हद्दीत जाणाऱ्या वाहनांची बोर्डाकडूनही झाडाझडती होणार आहे.

पदांसाठी पुढे येईनात….

0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अ, ब, क, ड, ई आणि फ क्षेत्रीय समितीच्या अध्यक्षपदांसाठीच्या पदांची संख्या सहा आहे मात्र इच्छुक चार, अशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे.

वृत्तपत्र विक्रेत्याच्या मदतीला धावले सहकारी

0
0
आपल्या सहकाऱ्याच्या मुलीच्या हृदयशस्त्रक्रियेसाठी इतरांना मदत करण्याचे आवाहन करतानाच स्वतःहून मदतीचा हात पुढे करून पुण्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी आज नवा आदर्श निर्माण केला. पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाने यामध्ये पुढाकार घेतला आहे.

कुंड्यांची खरेदी अवाजवी दराने?

0
0
शालेय साहित्य, कम्प्युटर, बेंच यांच्या गैरव्यवहारांवरून सातत्याने पालिकेच्या शिक्षण मंडळावर आरोप होत असतानाच, मंडळाने केलेली कुंड्या आणि झाडांची खरेदीसुद्धा वादात अडकण्याची चिन्हे आहेत.

आपत्कालीन वैद्यकीय सेवेची फसव्या कॉलद्वारे चेष्टा

0
0
‘गोल्डन अवर्स’मध्ये अपघातग्रस्तांना जीवदान देणाऱ्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या १०८ या टोल फ्री क्रमांकावर फसव्या कॉलचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे उघड झाले आहे. तीन महिन्यांत एक लाख सात हजार व्यक्तींनी फसवे कॉल करून या सेवेची क्रयशक्ती वाया घालविली आहे.

सुरक्षा उपायांकडे सातारा रोडवर दुर्लक्ष

0
0
सातारा रोडवरील उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांच्या कामात सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष करण्यात आले असून, पादचारी आणि वाहनचालकांसाठी अधिक खबरदारी घेण्यात यावी, असे ‘ऑडिट रिपोर्ट’मध्ये सुचविण्यात आले आहे.

ऑनलाइनच्या संदिग्धतेमुळे संस्थाचालकही धास्तावले

0
0
अकरावीच्या ऑनलाइन प्रक्रियेतील तांत्रिक मुद्द्यांमधील संदिग्धतेमुळे आता शहरातील संस्थाचालकही धास्तावले असून ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी बुधवारी अनौपचारिक बैठक आयोजित करण्यात आली होती.

शाहूपुऱ्यातील रस्ता महिनाभर खोदलेलाच

0
0
शुक्रवार पेठेतील शाहूपुरा भागातील रस्त्याचे काम करण्यासाठी तो रस्ता गेला महिनाभर खोदण्यात आला असून, हे काम पूर्ण होत नसल्याने या भागातील नागरिक पालिकेच्या कारभारामुळे चांगलेच हैराण झाले आहेत.

सायकली सांभाळण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची

0
0
महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्या‌त येणाऱ्या सायकली संभाळण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांवर आली आहे.

पावसाळापूर्वी रस्त्याचे रिसरफेसिंग सुरू

0
0
रस्त्यांच्या रिसरफेसिंगच्या पावसाळापूर्व कामांना महापालिका प्रशासनाने सुरुवात केली असून, त्यासाठी ४० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. शहरातील ७७ रस्त्यांवरील रिसरफेसिंगची कामे या वेळी पूर्ण केली जाणार आहेत.

इंजिनीअरिंगच्या परीक्षा मतदानाच्या दिवशी

0
0
मतदानादिवशी कोणत्याही परीक्षा न घेण्याचा आदेश पुणे विद्यापीठाने सर्व कॉलेजांना दिला असतानाच, काही कॉलेजांनी गुरुवारी ऐन निवडणुकीच्या दिवशी परीक्षा ठेवल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

बारामतीत आजपासून ‘मटा ऑटो शो’

0
0
आघाडीच्या कार उत्पादन कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून नवीन कारची मॉडेल प्रत्यक्ष पाहण्याची संधी उपलब्ध करून देणारा महाराष्ट्र टाइम्स ऑटो शो आज, गुरुवारपासून बारामतीत आयोजित करण्यात येत आहे.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यामुळे औंधगावाचे पाणी तोडले

0
0
निवडणुकीच्या रणधुमाळीत पुणे जिल्ह्यात पाण्यावरून राजकारण तापले असतानाच, स्थानिक पातळीवरही पाण्यावरून संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. स्वपक्षातील एका वरिष्ठ नेत्यांच्या दबावामुळेच गेल्या पंधरवड्यात ऐन निवडणुकीच्या काळात औंधगाव आणि परिसराचे पाणी तोडल्याचा आरोप काँग्रेसच्याच माजी महापौरांनी केला आहे.

रस्ते दुरुस्तीसाठी हवा आणखी निधी

0
0
पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करणाऱ्या पालिकेला शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी मात्र निधीची चणचण भासत आहे. खोदाईमुळे शहरभर झालेली रस्त्यांची दयनीय अवस्था सुधारण्यासाठी पुनर्डांबरीकरणावर अधिक खर्च करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.

खिळखिळ्या बसविरोधात ‘धावते’ आंदोलन

0
0
पीएमपी खिळखिळी झाल्याची टीका अनेकविध चर्चा-परिसंवादांमधून केली जात असली, तरी खिळखिळी झालेली बस थेट डेपोत नेण्याच्या आंदोलनाची प्रत्यक्ष कृती बुधवारी सायंकाळी काही जागरूक प्रवाशांनी केली.

जिल्हा प्रशासनातर्फे आज निवडणूक आयोगाला अहवाल

0
0
मतदारयादीतून नावे गायब झाल्याबाबत जिल्हा प्रशासनातर्फे आज (गुरुवारी) निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, या संदर्भात लेखी तक्रारी करणाऱ्या काही मतदारांची नावे यादीत असल्याचे समोर आले आहे.

साखळीचोरी करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई?

0
0
सोनसाखळी चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या टोळीवर ‘मोक्का’ कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी कायदेशीर बाबी पडताळून पाहाण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.

सांडपाण्यातून साकारले ‘अशोकवन’

0
0
एकीकडे वृक्षतोडकरून जमीन उजाड करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे. तर, दुसरीकडे उजाड माळरानावर नंदनवन निर्माण करणारी माणसे देखील आहेत. याचेच एक उदाहरण जुन्नर तालुक्यातल्या निमगाव-म्हाळुंगी ग्रामपंचायतीने उभे केले आहे.

दादांच्या धमकीचा अहवाल सादर

0
0
खासदार सुप्रिया सुळे यांना मतदान न केल्यास गावाचे पाणी बंद करू, अशी धमकी दिल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारीविषयीचा चौकशी अहवाल बारामतीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी सौरव राव यांच्याकडे सादर केला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images