Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पोस्टकार्डही होणार इतिहासजमा?

$
0
0
कॉम्युटर आणि मोबाइलच्या युगात टपाल खात्याची तारसेवा इतिहासजमा झाल्यानंतर त्या वाटेवर आता पोस्टकार्डही आहे. पोस्टकार्डसाठी नागरिकांकडून मागणी कमी होऊ लागली असल्याने, त्याची छपाई कमी प्रमाणात होत आहे.

शुभकार्याचे जेवणही ‘ईएमआय’वर

$
0
0
फ्लॅटपासून ते मोबाइलपर्यंत कोणतीही गोष्ट आता मासिक हफ्त्यावर मिळते. मात्र, कोणत्याही शुभकार्याच्या जेवणाचा खर्चही हप्त्याने करता येऊ शकतो याची कधी कल्पना केली आहे? ही अनोखी कल्पना रामानंद गुप्ता या केटरिंग व्यावसायिकाने अंमलात आणली असून, त्याला मोठा प्रतिसादही लाभतो आहे.

दाभोलकर हत्या; आरोपींना जामीन

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांच्या विरोधात पुणे पोलिसांकडून गेल्या तीन महिन्यांत आरोपपत्र दाखल न झाल्याने त्यांचा जामीन मंजूर झाला आहे.

यादीचा घोळ राजकीय पक्षांमुळेही

$
0
0
मतदारयादीतून नावे गायब झाल्याच्या प्रकाराला राजकीय पक्षांचे दुर्लक्षही कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. विविध कारणांनी नावे वगळल्यानंतर निवडणूक प्रशासनाच्या वतीने गेल्या वर्षीच मतदारयाद्या आणि वगळलेल्या नावांच्या याद्याही राजकीय पक्षांना देण्यात आल्या होत्या.

...अजून लाखभर नावं गायब असती!

$
0
0
शिवाजीनगर ८६ हजार..., वडगावशेरी ८१ हजार..., पर्वती ७८ हजार..., कोथरूड ७७ हजार... आणि कसबा २८ हजार...!...ही आकडेवारी होती, पुणे लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीतून रद्द होणाऱ्या संभाव्य मतदारांची.

कॅनॉल मुलांना ठरतोय जीवघेणा

$
0
0
हडपसर व वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुळा-मुठा कॅनॉलमध्ये जीव धोक्यात घालून मुले पोहत असतात. गेल्या अडीच वर्षांमध्ये हडपसर, वानवडी परिसरात तब्बल ५४ जणांचे जीव या कॅनॉलने घेतले आहेत. त्यामुळे हा कॅनॉल मृत्यूचा सापळा बनला आहे.

गंजीफा खेळाचं रहस्य उलगडलं

$
0
0
पत्त्यांशी साधर्म्य असणारे रंगविलेले काही गोल, त्यावर असणारी चित्रे, याचा नक्की उपयोग काय...याला म्हणतात तरी काय, अशा अनेक प्रश्नांच्या जंत्रीतून उलगडला गेला गंजीफा खेळाचा इतिहास.

औंध क्षेत्रीय कार्यालयात फेरीवाल्यांच्या संख्येत वाढ

$
0
0
औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरात पथारीवाल्यांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरण जाहीर झाल्यानंतर फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. सन २००९ मध्ये १३४ फेरील्यांची नोंद क्षेत्रीय कार्यालयाकडे होती.

सुपा परगण्याचा पाण्यासाठी टाहो

$
0
0
वैशाख वणव्याच्या उंबरठ्यावर सुपा परगणा भागातील ग्रामस्थांचा पाण्यासाठी टाहो सुरू आहे. परगण्यात येणाऱ्या २२ गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई असून महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

अपंगांच्या शाळांमधील शिक्षकही आर्थिकदृष्ट्या पंगू

$
0
0
अंपगांच्या शाळांतील शिक्षकही आता आर्थिकदृष्ट्या अंपग होऊ लागले आहेत, त्यामुळे आमच्या वेतनाचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी करत गेल्या काही महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने हतबल झालेल्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बुधवारी घेराव घातला.

सांगवी येथे एसटीचे बसस्थानक अखेर सुरू

$
0
0
एसटीच्या शिवाजीनगर बसस्थानकावरील वाहतूक कमी व्हावी, म्हणून एसटी प्रशासनाने सांगवी येथे उभारलेल्या बसस्थानक बुधवारपासून सुरू झाले. सुरवातीचे आठ दिवस याठिकाणी बसचे पार्किंग करण्यात येणार आहेत.

कँटोन्मेंट बोर्डाची पुन्हा मतदार नोंदणी

$
0
0
पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांची नावे गायब झाल्यावरून सध्या गोंधळ सुरू असताना, पुणे कँटोन्मेंट बोर्ड मतदार नोंदणीबाबत जागे झाले आहे. बोर्डाच्या निवडणुकांना दोनदा मुदतवाढ मिळाली असल्यामुळे प्रशासनाने पुन्हा मतदार नोंदणीला सुरुवात केली आहे.

निगडी-देहूरोड रस्त्याचे लवकरच चौपदरीकरण

$
0
0
पुणे-मुंबई जुन्या हायवेवर निगडी ते देहूरोड या रस्त्याच्या गेली अनेक वर्षे रखडलेल्या चौपदरी करणाच्या कामाला लवकरच मुहूर्त मिळणार आहे. या कामासह या रस्त्यावर सुमारे २८५ कोटी रुपयांची विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत.

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी पोलिसावर गुन्हा

$
0
0
लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलिस हवालदाराच्या विरोधात लाचलुचपत विभागाने बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वेश्याव्यवसायातून सात मुलींची सुटका

$
0
0
कात्रज येथील रासकर पार्क भागातील एका बंगल्यावर छापा टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसायातील सात मुलींची सुटका केली. त्यामध्ये तीन बांगलादेशी अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

‘राष्ट्रवादी’च्या वाबळेंचे नगरसेवकपद धोक्यात

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संजय वाबळे यांना जात पडताळणी समितीने दिलेला दाखला मुंबई हायकोर्टाने रद्द ठरविला आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे.

शिक्षक बढतीत गैरप्रकार

$
0
0
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळातील शिक्षण विभागाच्या बढत्यांमध्ये अनियमितता झाली असल्याचा ठपका मागासवर्ग कक्षाच्या सहायक आयुक्त वर्षा उंटवाल यांनी केलेल्या चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे.

फायर ब्रिगेडची फायरफायटिंग प्रशासनाच्या कृपादृष्टीसाठी...

$
0
0
मनुष्यबळ वाढीसाठी आणि जवानांना चांगले युनिफॉर्म मिळविण्यासाठी फायर ब्रिगेडला प्रशासनाच्या ‘कृपादृष्टी’ची गरज आहे. कर्मचाऱ्यांची नव्याने भरती करण्यासंबंधीच्या प्रस्तावावर राज्य शासनाची मोहोर उमटण्याची प्रतिक्षा पाच वर्षांपासून केली जात आहे.

स्मार्टफोनची बाजारपेठ वाढतेय ऐंशी टक्क्यांनी

$
0
0
‘भारतात स्मार्टफोनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. देशातील स्मार्टफोनची बाजारपेठ दर वर्षी सुमारे ८० टक्क्यांनी वाढत असून स्मार्टफोनच्या क्षेत्रात भारत जगातील तिसऱ्या क्रमाकांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे,’ ही माहिती एचटीसीचे भारतातील प्रमुख फैजल सिद्दीकी यांनी दिली.

शिक्षण संचालकांच्या वक्तव्याचा निषेध

$
0
0
शिक्षण हक्क कायद्यामधील (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशप्रक्रियेतील पूर्वप्राथमिक प्रवेशांसाठी नियमित फी भरावी लागण्याच्या राज्याच्या शिक्षण संचालकांच्या वक्तव्याचा अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेने बुधवारी तीव्र निषेध केला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images