Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अध्यादेशानंतरच एलबीटीची वसुली

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून स्थानिक संस्था कर (एलबीटी) वसूल करण्याबाबतचा अध्यादेश अद्याप आलेला नसला, तरीही बोर्डाने स्वतंत्र एलबीटी विभाग सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे.

विनापरवाना ४० हॉस्पिटलला टाळे

$
0
0
विनापरवाना हॉस्पिटल चालविणे कायद्याने गुन्हा ठरत असतानाही शहरातील विविध भागातील ४० हॉस्पिटलला महापालिकेच्या आरोग्य विभागाने टाळे ठोकली आहेत. तर आणखी ६० हॉस्पिटलच्या विरोधात कोर्टात खटले दाखल केले आहेत.

उत्पन्न वाढीसाठी पालिकेची ‘रेव्हेन्यू कमिटी’

$
0
0
महापालिकेला मिळणारे उत्पन्न आणि विकास कामांसाठी होणारा खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण होत असल्याने आवश्यक त्या विकास कामांसाठी महापालिकेकडून निधी उपलब्ध होत नाही.

अन्नपदार्थ उत्पादकाकडून ८८ लाखांचा दंड वसूल

$
0
0
अन्न पदार्थ उत्पादक व रिपॅकर व रिलेबलिंग करणाऱ्या परवानाधारकांनी वार्षिक परतावा मुदतीत न भरल्याने त्यांच्याकडून आतापर्यंत सुमारे ८८ लाख २८९ हजार रुपयांचा दंड अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) वसूल केला आहे.

पुण्यात मगरपट्टा, मुंढव्यात पाणीकपात

$
0
0
पुण्यात मुंढवा बायपास रोडवर जलवाहिनीचे काम करण्यात येणार असल्याने उद्या, मंगळवारी (२२ एप्रिल) लष्कर पाणीपुरवठा केंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार असून,

‘कचराकोंडी’चा धूर ‘फायर ब्रिगेड’च्या नाकात!

$
0
0
शहर फायर ब्रिगेडचा निम्मा वेळ कचऱ्याला लागलेल्या आगी विझवण्यात जात असल्याचे विभागाकडे नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षांत मार्च ते जून या दरम्यान शहरातील आगीच्या एकूण घटनांपैकी ४२ टक्के घटना कचऱ्याला लागलेल्या आगीच्या होत्या.

राज्यात सर्पदंशाचे बळी लाखावर

$
0
0
मानवी वस्तीत येणाऱ्या सापाला बघून देखील शहरातील नागरिकांची धावपळ होते, पण ग्रामीण भागातील लोकांसाठी साप म्हणजे ‘मृत्यूचा सापळा’चा बनले आहेत.

कचरा जाळल्याने पर्यावरणाला धोका

$
0
0
कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी पालिकेने काढलेल्या ग्लोबल टेंडरमध्ये पुढे आलेल्या कंपन्या ओला-सुका असा मिश्र कचरा जाळून त्याची विल्हेवाट लावणार आहेत; पण त्यामुळे शहराच्या पर्यावरणाचा पोत बिघडण्याची दाट शक्यता असल्याचा ठपका स्वयंसेवी संस्थांनी ठेवला आहे.

दहावी बोर्डाचा डेटाबेस अकरावीच्या प्रवेशासाठी

$
0
0
शहरात सोमवारपासून सुरू झालेल्या अकरावी प्रवेशांसाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (बोर्ड) आपल्याकडील विद्यार्थ्यांचा डेटाबेस अकरावी केंद्रीय प्रवेश समितीसाठी उपलब्ध करून दिला आहे.

शिक्षणहक्क कायदा बालवाडीच्या बाहेरच

$
0
0
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशांसाठी नुकत्याच राबविण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून पूर्वप्राथमिक (बालवाडी/नर्सरी) वर्गांना प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शुल्क भरावेच लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील बदल स्वीकारणे गरजेचे

$
0
0
‘बदल हा निसर्गाचा अविभाज्य घटक असून वैद्यकीय क्षेत्रांत देखील अमूलाग्र बदल होत आहेत. पूर्वी लोकांचा डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर विश्वास असायचा, त्या काळातील समाजातील वातावरण वेगळे होते. सध्याच्या काळातील वैद्यकीय क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत,’ असे मत ज्येष्ठ वैद्यकतज्ज्ञ डॉ. एच. व्ही. सरदेसाई यांनी केले.

पालिका शिक्षण अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश

$
0
0
अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेची माहिती असतानाही पुण्यातील एका शाळेने तो प्रकार लपविण्याची बाब शिक्षण खात्यानेही गांभीर्याने घेतली आहे.

नव्या तंत्रशिक्षण संस्थांच्या मान्यतेचा मार्ग मोकळा?

$
0
0
नव्या तंत्रशिक्षण संस्थांना मान्यता देण्याचा अधिकार या शैक्षणिक वर्षासाठी पुन्हा एकदा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला (एआयसीटीई) बहाल करण्यात आल्याचा ‘एआयसीटीई’चा दावा आहे.

फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात पालिका अपयशी

$
0
0
शहरात राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणाअंतर्गत शहरातील पथारी व्यावसायिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यास महापालिकेला अद्यापही यश मिळाले नाही. पथारी व्यावसायिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी आणखी एका महिन्याला कालावधी लागणार आहे.

आरोपींना जामीन हे पोलिसांचे अपयश

$
0
0
वेळेत आरोपपत्र दाखल होऊ न शकल्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपींना जामीन मिळणे, हे पोलिसांचे अपयश आहे. दाभोलकर यांचे मारेकरी आणि सूत्रधारांपर्यंत पोलिस अद्याप पोहोचू शकले नाहीत, हा प्रकार अत्यंत वेदनादायी आहे, अशी भावना दाभोलकर कुटुंबियांनी सोमवारी व्यक्त केली आहे.

युवा सेना करणार मतदार जनजागृती

$
0
0
लोकसभा निवडणुकीत मतदारयादीतून नाव गायब झाल्याने हजारो नागरिकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. या पार्श्वभूमीवर, मतदार जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय युवा सेनेने, तर नावे गायब होण्यामागचे गौडबंगाल शोधण्याचा संकल्प सजग नागरिक मंचाने सोडला आहे.

नावे गायब झाल्याच्या १२३० तक्रारी

$
0
0
मतदारयादीतून नावे गायब झाल्याच्या एक हजार २३० तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. या प्रत्येक तक्रारीची तपासणी करून येत्या दोन दिवसांत निवडणूक आयोगाला अहवाल पाठविण्यात येणार आहे.

१५ डब्यांची लोकलसेवा कागदावरच

$
0
0
पुणे-लोणावळा दरम्यान लोकल प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने या मार्गावर १५ डब्यांची लोकलसेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. या संदर्भातील प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने मुख्यालयाकडे पाठवला असला, तरी त्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

हुश्श! पहिला दिवस अडचणीविना…

$
0
0
विद्यार्थी आणि पालकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शहरातील अकरावी केंद्रीय प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली. प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी सायंकाळपर्यंत चार हजार ७२७ विद्यार्थ्यांनी वेबसाइटवरून पहिल्या टप्प्यातील अर्ज भरले.

पावसाने पुणेकरांना झोडपून काढले

$
0
0
मागील दोन दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने सोमवारी सायंकाळी पुणेकरांना अक्षरशः झोडपून काढले. कर्वेनगर, कोथरूड, वारजे, धायरी परिसरात किरकोळ स्वरूपाच्या गाराही पडल्या.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images