Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

छोट्या राजकीय पक्षांचाही मोठा प्रचार

$
0
0
प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहाचलेला असतानाच इतर छोटे राजकीय पक्षाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारही पूर्ण ताकदीने प्रचारात उतरले आहेत. कोणी पदयात्रेद्वारे तर कोणी पीएमपीतून प्रवास करून मतदारांशी संवाद साधत आहेत.

‘आप’ने बसविले सहाशे कॅमेरे

$
0
0
मतदानाची तारीख जवळ येऊ लागली असतानाच शहरात पैसे, दारू किंवा अन्य वस्तूंच्या वाटपाची चर्चाही सुरू झाली आहे. याच वाटपावर आता निवडणूक आयोग आणि पोलिसांबरोबरच छुप्या कॅमेरांचीही नजर असणार आहे. टेक्नो सॅव्ही असलेल्या आम आदमी पक्षाने यासाठी शहराच्या विविध झोपडपट्ट्यांमध्ये ६०० कॅमेरे बसवले आहेत.

विवाह लपविणाऱ्या मोदींचा अर्ज बाद करावा

$
0
0
‘निवडणूक अर्जामध्ये खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा अर्ज आयोगाने बाद करावा’, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी केली. तसेच, या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

धरणग्रस्तांसाठी विकास महामंडळ

$
0
0
बारामती मतदार संघातील ग्रामीण भागातील मतदारांना महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी दुहेरी टोल पद्धत बंद करण्याचे आणि धरणग्रस्तांसाठी स्वतंत्र विकास मंडळ स्थापनेसाठी प्रयत्न करण्याचे वचन दिले आहे.

पाणी न पो‌होचल्याची सुळेंना खंत

$
0
0
बारामती हा शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र मतदार संघ असल्याने, या मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी आगामी पाच वर्षांचा जाहीरनामा मतदारांसमोर मांडताना दोन्ही मतदारांचा समतोल राखला आहे.

‘गुजरात मॉडेल’ म्हणजे विकासाचे मॉडेल

$
0
0
‘गुजरात मॉडेल हे प्रत्यक्षात भारतीय जनता पक्षाचे विकासाचे मॉडेल आहे. सर्वांना गुजरात ठाऊक आहे, म्हणून त्याला गुजरात मॉडेल म्हटले जाते; परंतु, गोवा, मध्य प्रदेश अशा राज्यांमध्येही विकासाचे हेच मॉडेल आहे,’ अशी टिपण्णी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी केली.

निवडणुकीनंतर काँग्रेस नेते काळ्या पाण्याच्या शिक्षेवर

$
0
0
‘काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या भ्रष्टाचाऱ्यांच्या नेत्या असून, देशात काँग्रेसच देशाचा मोठा गुन्हेगार आहे. या निवडणुकीनंतर मात्र त्यांच्या सर्व बड्या नेत्यांवर निवडणुकीनंतर देश सोडून जाण्याची वेळ येईल आणि तसे न केल्यास त्यांना तुरुंगाची हवा खाण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही,’ असे ‘भाकित’ योगगुरू बाबा रामदेव यांनी रविवारी केले.

होऊ दे (खिशातून) खर्च

$
0
0
भेळ-वडापाव खाऊन निवडणुका लढविण्याचे दिवस सरले असले, तरी शहरात काही पक्षांमध्ये उमेदवारांचे हात सैल सुटत नसल्याने कार्यकर्त्यांनाच स्वतः खिशात हात घालून ‘होऊ द्या खर्च,’ म्हणण्याची वेळ आली आहे.

अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करा, पण…

$
0
0
‘घरे देण्याच्या नावाखाली बिल्डरांनी लोकांना फसविलेल्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण मिळाले पाहिजे. मात्र, अन्य अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केलीच पाहीजे,’ अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मांडली.

मोफत बसप्रवास ते आंतरराष्ट्रीय स्टेडियम

$
0
0
शहरात १०० किमीवर मेट्रोचे जाळे... मध्य पुण्यात मोफत बससेवा... अखंडित पाण्यासाठी शहरात एक टीएमसीची १२ तळी... आयआयटी आणि आयआयएम सुरू करण्यासाठी प्रयत्न... आयटीतील महिलांसाठी सीसीटीव्ही सुविधा असलेल्या वेगळ्या बससेवा...

‘सभास्पर्धे’तही काँग्रेसला हवी ‘आघाडी’

$
0
0
भाजपबरोबरच्या ‘सभास्पर्धे’त आघाडी घेण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली असून, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचार सांगतेच्या सभेला नरेंद्र मोदी यांच्या सभेपेक्षा अधिक गर्दी जमविण्याचे स्पष्ट आदेश काँग्रेसने दिले आहेत.

७ लाखांची रोकड जुन्नरमध्ये जप्त

$
0
0
पोलिसांच्या भरारी पथकाने नाका तपासणीमध्ये एक महिंद्रा गाडी आणि कारमधून सात लाख ४० हजार रुपयांची रोकड जप्त केली. ही रक्कम प्राप्तीकर विभागाच्या पथकाकडे देण्यात आल्याची माहिती जुन्नरचे पोलिस निरीक्षक कैलास पिंगळे यांनी दिली.

३६ वर्षे थांबल्यानंतर अखेर घटस्फोट

$
0
0
मनाने आणि शरीराने त्याच्याबरोबर कधीच घटस्फोट घेतला होता. आता फक्त कोर्टाचा शिक्का बाकी होता. ३६ वर्षापूर्वी त्याच्याबरोबर झालेले लग्न किरकोळ कारणामुळे केवळ चार महिनेच टिकले. आपला संसार पुन्हा जुळेल या आशेवर तिने एकटीने अनेक वर्षे वाट पाहिली.

मनसेचा उल्लेख कशासाठी?

$
0
0
गेले अनेक महिने ज्या विषयावरून गल्ली ते दिल्ली आरोपांच्या फैरी झाडल्या, तो खासदार सुरेश कलमाडी यांच्यावरील आरोप हा आता भाजपच्या दृष्टीने ‘स्थानिक’ विषय ठरला आहे. ‘कलमाडी हे भ्रष्टाचाराचे प्रतीक आहेत, मात्र हा विषय स्थानिक आहे.

‘सर्वसमावेशक विकास हवाच’

$
0
0
पुण्याचा सर्वसमावेश विकास कसा झाला पाहिजे, लोकप्रतिनिधींनी तरुणांच्या समस्या कशा पद्धतीने हाताळणे आवश्यक आहे.. इथपासून ते मतदानाविषयी असलेली आत्मीयता अन् दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडून मतदारयाद्यांविषयी करण्यात आलेले दुर्लक्ष … अशा विविध विषयांवर प्रतिक्रिया व्यक्त करून रविवारी डहाणूकर कॉलनीच्या ‘पब्लिक’ने ‘मटा’चा मतसंग्राम फ्लोट गाजवला.

राहुलबाबा घेणार ‘साईबाबांची शपथ’

$
0
0
नगर, पुणे येथे प्रचारसभा घेणारे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या प्रचारदौऱ्याची काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी ‘कॉपी’ करणार आहेत. पुढील दोन दिवसांत नगर, पुण्यात राहुल दोन सभा घेणार असून, निवडणुकांमध्ये विजयासाठी राहुलबाबा शिर्डीत मुक्काम ठोकून साईबाबांना साकडे घालणार आहेत.

जेवणावळीच्या खर्चाबाबात आम आदमी पक्षाला नोटीस

$
0
0
निवडणूक आयोगाने निवडणुकीचा खर्च मोजण्यासाठी ठरवलेल्या शॅडो रजिस्टरमुळे रोज नवे वाद समोर येऊ लागले आहेत. आम आदमी पक्षातर्फे कार्यकर्त्यांना देण्यात येणाऱ्या जेवणाचा खर्च प्रत्यक्षात २७ रुपये असताना आयोगाने मात्र शॅडो रजिस्टरप्रमाणे प्रत्येकी १२५ रुपये धरला आहे.

विरोधी उमेदवार निवडून येण्याची क्षमता नसलेले

$
0
0
माझ्या विरोधात उभे असणाऱ्यांपैकी एकही पात्र उमेदवार नाही. त्यांच्यात निवडून येण्याची क्षमता नाही. मात्र, माझ्यात या परिसराचे चित्र बदलण्याची ताकद आहे. त्यामुळे मला निवडून द्या,’ असे आवाहन महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी काळेवाडीमधील पदयात्रेदरम्यान मतदारांना केले.

अंतिम टप्प्यात उमेदवारांची धावपळ

$
0
0
मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांना विविध सामाजिक संस्था, संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. प्रचाराचा केवळ एकच दिवस शिल्लक राहिल्यामुळे कमीतकमी कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोचण्याचे आव्हान पूर्ण करण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे.

१५० विद्यार्थ्यांनी केला सलग १८ तास अभ्यास

$
0
0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२३ व्या जयंती निमित्त पुणे विद्यापीठासह शहरातील विविध कॉलेजांमध्ये शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे विद्यापीठातील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स असोसिएशन’तर्फे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयामध्ये सलग १८ तास अभ्यास करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images