Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मोदी लाटेची खरी कसोटी

$
0
0
उमेदवारीसाठी झालेली रस्सीखेच...,युतीमधील अस्वस्थता...गटातटांची नाराजी.. आणि मनसेच्या मतविभागणीचा धोका..., अशा वेगवेगळ्या अडचणींवर मात करत महायुतीची प्रचारयंत्रणा पुण्यात दुसऱ्या टप्प्यात सज्ज झाली आहे.

बेकायदा सावकारी करणारा अटकेत

$
0
0
सावकारीचा धंदा करून गरीबांना वेठीस धरल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाला अटक केली. त्याला कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली. यापूर्वी अशाच प्रकरणात एकाला अटक करण्यात आली होती. दिलीप छबुराव सपाटे (वय ४०, रा. चंदननगर, खराडी) असे आरोपीचे नाव आहे.

मोदींना हव्यात ३०० जागा

$
0
0
सोनिया गांधी यांच्या रिमोट कंट्रोलद्वारे चालणारे सरकार म्हणजे लोकशाहीला धोका असून, त्यापासून देशाला वाचविण्यासाठी भारतीय जनता पक्षाला किमान तीनशे जागा देऊन विजयी करा, असे आवाहन या पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुण्यातील एस. पी. कॉलेजच्या मैदानावरील प्रचारसभेत केले.

कलमाडी, राजबाबत मोदींचे मौन

$
0
0
महायुतीपुढे असलेले मनसेचे आव्हान..., सुरेश कलमाडी यांच्यावरील आरोप... आणि गेले काही दिवस सातत्याने हल्ले चढविणारे शरद पवार यांना प्रत्युत्तर... भाजपच्या दृष्टीने यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाच्या ठरलेल्या या मुद्द्यांवर नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले.

मोदींच्या सभेत रिकाम्या खुर्च्या

$
0
0
मोदींची पुण्यातील सभा अभूतपूर्व होणार, याबाबत कुणाच्याही मनात शंका नव्हती. साहजिकच, एसपी कॉलेजच्या ग्राउंडकडे मोठ्या उत्सुकतेने पावले चालली होती. ग्राउंडवर पायही ठेवण्यास जागा मिळणार नाही, खचाखच भरलेले असेल, सगळे वातावरण मोदीमय झालेले असेल, अशा कल्पना केली जात होती...पण

डॉक्टरांनी दिली २.५ लाखांची मोफत औषधे

$
0
0
आर्थिकदृष्ट्या गरीब पेशंटला महागडी औषधे घेणे अशक्य असून, सरकारी आरोग्य केंद्रात ती मोफत पण सहजपणे मिळावी यासाठी आता पुण्यातील डॉक्टरांनीच अडीच लाखांची औषधे मोफत दिली आहेत.

स्वयंरोजगार योजनेकडे पाठ

$
0
0
अपंगांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणारी रक्कम तुटपुंजी असल्यामुळे गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या राज्य सरकारच्या स्वयंरोजगार योजनेकडे अपंगांनी पाठ फिरविली आहे. केवळ एक हजार रुपये मदतीवर व्यवसाय सुरू करणे शक्य नसल्यामुळे या योजनेबाबत कोणतीही उत्सुकता दिसत नसल्याचे चित्र आहे.

‘आप’ने बसविले ६०० कॅमेरे

$
0
0
मतदानाची तारीख जवळ येऊ लागली असतानाच शहरात पैसे, दारू किंवा अन्य वस्तूंच्या वाटपाची चर्चाही सुरू झाली आहे. याच वाटपावर आता निवडणूक आयोग आणि पोलिसांबरोबरच छुप्या कॅमेरांचीही नजर असणार आहे.

सोनसाखळी हिसकावल्याचे ११ गुन्हे उघडकीस

$
0
0
गेल्या एक वर्षांपासून दरोड्याच्या तयारीतील गुन्ह्यांत पसार झालेल्या आरोपीने शहरात नऊ सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. कोंढवा पोलिसांनी रेकार्डवरच्या गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला अटक करत त्यांच्याकडून चोरीचे सोने, गुन्हे करण्यासाठी वापरलेल्या दुचाकी असा नऊ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

जन्मदाखल्यासाठी आकारणार १०० रुपये

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाकडून जन्मदाखला मिळ​विण्यासाठी नागरिकांना आता बालकाच्या जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत अर्ज करावा लागणार आहे. सहा महिन्यांनंतर जन्मदाखला हवा असल्यास शंभर रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव हॉस्पिटल प्रशासनाने तयार केला आहे.

डास उत्पत्ती रोखण्यास हवी ‘अंतिम मान्यता’

$
0
0
डेंग्यू, मलेरिया यासह कीटकजन्य आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तयार केलेल्या नियमावली (उपविधी) २०१३ ला नागरिकांकडून एकही हरकत अथवा सूचना आलेली नाही.

‘उद्योगधंद्यात मराठी तरुणांना संधी नाही’

$
0
0
‘मी कुठल्याही उद्योगधंद्यांच्या विरोधात नाही. मात्र, राज्यात सर्वच ठिकाणी उद्योगधंद्यांमध्ये स्थानिकांना डावलून सर्रास परप्रांतियांना नोकऱ्या देण्याचे प्रकार सुरूच असून हे खपवून घेणार नाही,’ असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे.

‘माझ्या पुतण्याचा पवारांना गुण लागलाय’

$
0
0
‘माझ्या पुतण्याचा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना वाण नाही तर गुण लागला आहे, त्यामुळेच पवारांनी शाई पुसून दोनदा मतदान करण्याचा मतदारांना सल्ला दिला आहे,’ असा टोला भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी बारामतीत लगावला.

प्रचाराला उरले अवघे दोन दिवस

$
0
0
प्रचाराला अवघे काही तास उरले असताना मावळ लोकसभा मतदारसंघात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांबरोबरच कार्यकर्त्यांमध्ये ‘खास’ शर्यत जुंपली आहे. महायुतीतर्फे आज, सोमवारी (१४ एप्रिल) उद्धव ठाकरे यांची सभा तर, आघाडीतर्फे उद्या, मंगळवारी (१५ एप्रिल) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे.

पुण्यात १०८ मतदान केंद्रे संवेदनशील

$
0
0
पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघांतील १०८ मतदान केंद्रे संवेदनशील (क्रिटिकल) म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. यातील ७१ मतदान केंद्रांवरील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले असून, दहा मतदान केंद्रांतील निवडणूक प्रक्रियेचे चित्रीकरण थेट मतदारांना दाखविले जाणार आहे.

होऊ दे खर्च!

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ‘होऊ दे खर्च’ अशी उमेदवारांची भावना असून, खर्चामध्ये पुणे लोकसभेत डॉ. विश्वजित कदम, बारामतीत सुप्रिया सुळे, मावळात राहुल नार्वेकर व शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव यांनी आघाडी घेतली आहे.

पुण्याची मतदारसंख्या ६५ लाखांवर

$
0
0
नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांमुळे पुण्याच्या २१ विधानसभा मतदारसंघांतील मतदारसंख्या ६५ लाख ६१ हजार १९९ वर पोहोचली आहे. साडेचार लाख मतदारांचा चिंचवड मतदारसंघ सर्वांत मोठा, तर अडीच लाख मतदारांचा समावेश असलेला आंबेगाव हा सर्वांत छोटा मतदारसंघ ठरला आहे.

लैंगिक अत्याचारांविरोधात कलाकारांचा लढा

$
0
0
‘या शहराने आपल्याला खूप काही दिले आहे. याच शहरात आपण वाढलो, मोठे झालो, आनंदाचे क्षण उपभोगले. आज आपण आपल्या शहरवासियांच्या मागे ठामपणे उभे राहाण्याची गरज आहे. मुलींवरील लैंगिक अत्याचार ही विकृती आहे.

केस निकाली काढण्यात राज्यात पुणे पहिले

$
0
0
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय महालोकअदालतमध्ये एक लाख ९ हजार केसेस निकाली काढण्यात आल्या आहेत. राज्यात सर्वांधिक केसेस पुणे जिल्ह्यात निकाली काढण्यात आल्या आहेत.

आधीच्या समित्यांच्या अहवालांचे काय झाले?

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा कारभार सुधारण्याबाबत या आधी वेळोवेळी नेमण्यात आलेल्या विविध समित्यांच्या अहवालांचे नेमके काय झाले आणि या समित्यांनी केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी झाली की नाही, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images