Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

प्रचार तापला... कार्यकर्ते भडकले

0
0
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अखेरच्या टप्प्यावर पोहोचला असल्याने वातावरण तापत असतानाच, प्रचारात सहभागी कार्यकर्तेही तापत असल्याचा अनुभव सर्वच पक्षांच्या पदयात्रांदरम्यान येत आहे.

‘मनमोहनसिंग यांची कारकीर्द सुवर्णकाळ’

0
0
‘डॉ. मनमोहनसिंग यांच्या काळात देशाच्या आर्थिक विकासाचा दर वाढला, अनेक नागरी हिताचे कायदे झाले. कोठेही दंगेधोपे झाले नाहीत. दहा वर्षांच्या त्यांची यशस्वी कारकीर्दीची नोंद इतिहासात ‘सुवर्णकाळ’ म्हणून घेतली जाईल,’ असा आशावाद मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

‘पक्ष हायजॅक करणारे आता देश हायजॅक करण्याच्या तयारीला’

0
0
‘फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांतून उभा केलेला देश उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली असून, पक्ष ‘हायजॅक’ करणारे आता देश ‘हायजॅक’ करण्याच्या तयारीला लागले आहेत,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

१३ लाख लिटर मद्य रिचवले

0
0
निवडणूक काळात मद्यविक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, गेल्या दहा दिवसांत सुमारे १३ लाख लिटर देशी व विदेशी मद्य पुणेकरांनी रिचवले आहे. मद्यविक्रीचे वाढते प्रमाण पाहता निवडणूक आणि मद्य यांचे समीकरण अधिक घट्ट होताना दिसत आहे.

राज बॅकफूटवर; पुण्यात एकच सभा?

0
0
प्रचाराचा शेवट करण्यासाठी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. त्यांच्या दोन सभांचे नियोजन झाले आहे; मात्र त्याऐवजी एकाच झंझावाती सभेचे आयोजन करण्याच्या विचारात मनसेचे पदाधिकारी आहेत.

मोदींना आतंकवादी म्हणायचे का?

0
0
‘गोध्रासारख्या घटनेनंतर माफी किंवा दिलगिरी व्यक्त न मागणाऱ्यांचे काळीज उलटे असून, जागतिक पातळीवर देशाची किंमत कमी करणाऱ्या मोदींना आतंकवादी म्हणायचे का,’ अशी विचारणा करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी थेट हल्ला चढविला.

मोदी अर्थशास्त्रात निरक्षर

0
0
‘गुजरात मॉडेलचे गुणगान करणाऱ्या नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राची अर्थसमीक्षा वाचण्याची गरज आहे. देशाचा विकास हा केवळ आर्थिक विकासानेच साध्य होणार आहे. मोदींना आजवर कोणत्याही भाषणात आर्थिक धोरणांचा साधा उल्लेखही केलेला नाही.

सांगलीतील लाख मतदार पुण्यात

0
0
सांगली आणि पुणे लोकसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्यांमध्ये एक लाख आठ हजार मतदारांची नावे समान असल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सौरव राव यांच्याकडे शुक्रवारी केली. काँग्रेसच्या उमेदवारानेच मतदारयादीत गैरप्रकार केल्याचा आरोप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला.

बारामतीला जेव्हा जाग येते…

0
0
महायुतीतील मित्रपक्षांची मने अद्यापही घट्ट जुळलेली नाहीत; पण महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य कमी होणे म्हणजे संस्थानाला खिंडार पडण्यास सुरुवात झाली असा अर्थ निघणार असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने ही लढाई दीर्घकालीन अस्तित्व टिकविण्याची झाली आहे.

आयात उमेदवारांमधील रंगतदार लढत

0
0
‘आयात उमेदवारांमधील लक्षवेधी’ अशी चर्चा झालेली मावळ लोकसभा मतदारसंघातील लढत रंगतदार स्थितीत आहे. प्रचाराची रणधुमाळी लक्षात घेता शिवसेनेपुढे आघाडी आणि शेकापने कडवे आव्हान निर्माण केले आहे.

‘आप’ का झाडू चलेगा क्या?

0
0
‘चलेगा झाडू उडेगी धूल, ना रहेगा पंजा ना रहेगा फूल’.....अशी घोषणा देत, राजकारणशुद्धीची हाळी देत आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल दिल्लीत तब्बल २२ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आणि ‘स्टार’ बनले. दिल्लीतील ४९ दिवसांच्या सरकारच्या नाट्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाने लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली.

‘हाता’ला गरज जादूच्या कांडीची

0
0
नवीन चेहरा..., कोरी पाटी...., मित्रपक्षाचे पाठबळ..., विरोधी मतांमध्ये विभागणी.... अन् काँग्रेसचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी सर्व विभागलेल्या गटा-तटांना एकत्र प्रचारात उतरवण्यासाठी दाखवण्यात आलेले कौशल्य... या सर्व गोष्टींची गोळाबेरीज केली, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांची ‘खासदारकी’ सहज-सोपी असल्याचं कोणीही सांगू शकेल.

सिंहगड रोडवर तरुणाचा गोळ्या घालून खून

0
0
सिंहगड कॉलेज परिसरातील हिडन पॅलेस या हॉटेलमध्ये स्नूकर खेळत असलेल्या तरुणाच्या छातीत पिस्तुलाची गोळी घालून तसेच त्याच्यावर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या वेळी दुसऱ्या एका तरुणावरही कोयत्याने वार करण्यात आला आहे.

८ वर्षांच्या मुलाचा धनकवडीत खून

0
0
धनकवडी परिसरातील संभाजीनगर येथे एका आठ वर्षांच्या मुलाचा खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शाहीद ऊर्फ राजा फारुख खान (८) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

अभिनेते, साहित्यिक, खेळाडूंचा प्रवास उलगडणार

0
0
डी. एस. कुलकर्णी फाउंडेशनतर्फे दर वर्षी आयोजित केला जाणारा ‘डीएसके गप्पां’चा कार्यक्रम या वर्षी १७ ते २० एप्रिलदरम्यान होणार आहे. अभिनेते, साहित्यिक व खेळाडूंसह नवोदित कलाकारांचा प्रवास या गप्पांतून उलगडला जाणार आहे, अशी माहिती फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमंती कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी दिली.

घाटोळ समितीचा अहवाल जाहीर करणार?

0
0
परीक्षा नियंत्रक डॉ. संपदा जोशी यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत पुणे विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्यावर केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर विद्यापीठ या पुढील टप्प्यात कोणावर कारवाई करणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. ‘ही कारवाई इथेच थांबणार,’ असे संकेत विद्यापीठाच्या अंतर्गत वर्तुळातून मिळत असले, तरी डॉ. घाटोळ समितीच्या लेखी अहवालानंतरच कारवाईबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी पाया भक्कम करण्यावर भर

0
0
‘आम आदमी पक्षासाठी (आप) दिल्लीखालोखाल महाराष्ट्र आणि हरियाणा ही दोन राज्य महत्त्वाची आहेत. या राज्यातून आम्हाला ‘ब्रेक थ्रू’ मिळेल. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यासाठी पाया पक्का करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही लोकसभा निवडणुकांकडे पाहत आहोत,’ अशी माहिती ‘आप’ चे राष्ट्रीय नेते योगेंद्र यादव यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

‘भाजप, काँग्रेसपेक्षा ‘आप’च सक्षम पर्याय’

0
0
भारतीय जनता पक्षालाच नव्हे, तर काँग्रेसलाही थेट विरोध करण्याची ‘आम आदमी पार्टी’ची भूमिका लक्षात घेत, लोकसभा निवडणुकांमध्ये नागरिकांनी केवळ ‘आप’लाच मते देण्याचे भावनिक आवाहन ‘आप’च्या केंद्रीय कार्यकारणीचे सदस्य प्रा. डॉ. योगेंद्र यादव शनिवारी झालेल्या सभेत केले.

आढळराव चक्रव्यूह भेदणार?

0
0
पक्षाच्या बालेकिल्ल्यात असलेल्या शिरूर लोकसभेची हार ‘राष्ट्रवादी’च्या अत्यंत जिव्हारी लागली आहे. गेली पाच वर्षे ही सल मनात ठेवून राष्ट्रवादीने या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या भोवती चक्रव्यूह निर्माण केले आहे.

राज करिष्म्याची कसोटी

0
0
‘नमो नमः’चा जप करत भाजपची मते वळवण्याचा ‘मनसे’ने सुरुवातीपासून केलेला प्रयत्न, त्यावर भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी केलेली टीका, पक्षांतर्गत नाराजांची गटबाजी थोपविण्यात उमेदवार दीपक पायगुडे यांना आलेले अपयश, कॉँग्रेस-भाजपप्रमाणे मतांची टक्केवारी टिकवणे, तसेच ती वाढवण्याचे आव्हान, यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरोधकांची किती मते खेचणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images