Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

डॉ. संपदा जोशी यांची तक्रार

0
0
पुणे विद्यापीठाच्या निलंबित परीक्षा नियंत्रक डॉ. संपदा जोशी येत्या आठवडाभरात पुणे विद्यापीठ प्राचार्य फोरमसमोर आपली बाजू मांडणार आहेत. याबाबत त्यांनी फोरमकडे तक्रार दिली होती.

‘आरटीर्इ’ प्रवेशाला मुदतवाढ

0
0
शहरात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला १९ एप्रिलपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रक्रियेतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणाऱ्या शाळांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशाराही शिक्षण खात्याकडून देण्यात आला आहे.

अधिकृत प्रमाणपत्राअभावी सांस्कृतिक कोट्याला फटका

0
0
सांस्कृतिक कोट्यातून अकरावी प्रवेशातील दोन टक्के आरक्षित जागांवर प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसमोर अधिकृत प्रमाणपत्राची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजप आणि काँग्रेस पक्षांची पुण्या‌विषयी भूमिका दुटप्पी

0
0
‘काँग्रेस व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पुण्यासंबंधीच्या विविध विषयांवर मांडत असलेल्या भूमिकेच्या अगदी उलट कृती त्यांच्या पक्षाचे नगरसेवक करत आहेत. त्यामुळे या पक्षांची भूमिका दुटप्पी आहे,’ अशी टीका नागरिक चेतना मंचाचे अध्यक्ष मेजर जनरल (निवृत्त) सुधीर जटार यांनी केली.

महायुतीचा जानकारांसाठी आज बारामतीत प्रचार

0
0
बारामती लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी शेवटच्या दिवशी महायुतीतील सर्व पक्ष शक्तीप्रदर्शन करत रस्त्यावर उतरणार आहेत.

शाही इमामांना भेटणाऱ्यांनी हिंदुत्ववादाबद्दल बोलू नये

0
0
‘देशाचा पंतप्रधान कोण व्हावा, हे शाही इमाम नव्हे तर देशातील सर्वसामान्य जनता ठरवेल, असे सांगून मतांचा जोगवा मागण्यासाठी शाही इमामांना भेटणाऱ्या सोनिया गांधी यांना आमच्या हिंदुत्ववादाबद्दल बोलण्याचा काय अधिकार आहे?’ असा जोरदार हल्ला शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्यावर केला.

पवारांचा आज झंझावाती दौरा

0
0
बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे मंगळवारी एकाच दिवशी तीन सभा घेणार आहेत.

जिल्ह्यातही धडाडल्या प्रचारतोफा

0
0
‘देशाचे नेतृत्व सामान्य लोकांमधून निवडून आलेल्या खासदारांनी ठरवण्याचा अधिकार असताना एकाचे नाव ठरवून कधी पंतप्रधान होत नाही,’ अशी टीका करीत पवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची नव्या नेतृत्वाची फळी देशाचा गाडा पुढे नेण्यास समर्थ असल्याचा पुनरुच्चार केला.

प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

0
0
राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या सभा, शक्ती प्रदर्शनाच्या पदयात्रा, नेते-अभिनेत्यांचे रोड शो, उमेदवारांचे आरोप-प्रत्यारोप, पक्षांतर्गत रूसवे-फुगवे, भले मोठे वचननामे आणि मतदार राजाला घालण्यात येणारे साकडे अशा रंगतदार प्रचाराच्या रणधुमाळीची सांगता आज, मंगळवारी सायंकाळी सहा वाजता होणार आहे.

पोलिस यंत्रणा मतदानासाठी सज्ज

0
0
प्रचाराचा धुराळा खाली बसत असताना लोकसभा मतदानासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. पुणे पोलिस दलात २०० हून अधिक ‘क्विक रिपॉन्स टीम’ तयार करण्यात आले असून आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर पहरा ठेवणार आहे.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सरसावले खासगी व्यावसायिक

0
0
मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न होत असतानाच खासगी व्यावसायिकांनीही आकर्षक ऑफर देऊ केली आहे. कोणी पुस्तकांवर तर कोणी मिसळीवर सवलत देऊ केली आहे. तर कोथरूडमध्ये कार मोफत वॉश करून मिळणार आहे. तर काही दुकानांमध्ये खरेदीवर सवलत दिली जात आहे.

मतदार राजा जागा हो...

0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज, मंगळवारी संपल्यानंतर मतदार यादीतील नाव व मतदान केंद्र याची शोधाशोध करण्यासाठी मतदारांची कसोटी लागणार आहे.

पक्षाला नव्हे तर उमेदवारालाच महत्त्व देणार

0
0
मतदान हा आपला अधिकार असून तो आपण बजावलाच पाहिजे, लोकशाहीचा एक घटक म्हणून आपण निवडणूक प्रक्रियेविषयी जागरूक राहिले पाहिजे, असे सांगून यंदाच्या निवडणुकीत पक्षाला नव्हे तर उमेदावालाच आम्ही महत्त्व देणार आहोत, अशा भावना पुणेकरांनी ‘मटा’च्या ‘मतसंग्राम यात्रे’मध्ये व्यक्त केल्या.

अनधिकृत बांधकामे पाडाल, तर गाठ शिवसेनेशी

0
0
‘वशिल्याने लवासा अधिकृत करता येते, मग गरिबांची अनधिकृत बांधकामे नियमित का करता येत नाहीत,’ असा सवाल करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘अनधिकृत बांधकामे पाडणार असाल तर याद राखा, गाठ शिवसेनेशी आहे,’ असा इशारा सोमवारी (१४ एप्रिल) दिला.

पुणे स्टेशन ते ‘सीओईपी’ सकाळी दोन तास वाहतूक बंद

0
0
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे आज (मंगळवार) पुण्यात जाहीर सभेसाठी येणार असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. राजा बहाद्दूर मिल रोडवर पुणे स्टेशन ते इंजीनिअरिंग कॉलेज चौकादरम्यान सकाळी अकरा ते दुपारी एकच्या दरम्यान वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

प्रचाराच्या सांगतेला राहुल गांधींची सभा

0
0
पुणे लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम यांच्या प्रचाराची सांगता काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहीर सभेने होणार आहे. आज, मंगळवारी ‘एसएसपीएमएस’च्या मैदानावर ही सभा होणार आहे.

सक्षम बीआरटीपासून स्वच्छ नदीपर्यंत..

0
0
‘अहमदाबादसारखी सक्षम बीआरटी..., साबरमतीसारख्या नदी सुधारणा...,सॅटेलाइट सिटीजची निर्मिती..., पाच मिनिटांनी पीएमपीची बससेवा... आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ...’

वादग्रस्त मतदाराला खात्रीनंतरच मतदानाची संधी

0
0
‘कोणत्याही वादग्रस्त मतदारास खातरजमा करूनच मतदानाची संधी देण्यात येईल,’ असे निवडणूक आयोगाने नुकतेच स्पष्ट केले आहे. पुणे व सांगली जिल्ह्याच्या मतदारसंघांतील सारख्या नावांच्या मतदारांबाबत भाजपच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीवर आयोगाने ही भूमिका स्पष्ट केली.

वाराणसीत मोदी , मग पुण्यात कदम का नाही?

0
0
‘पुण्याचा काँग्रेसचा उमेदवार बाहेरून आणल्याचा आरोप करणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून अर्ज का भरला?, वाराणसीमध्ये भाजपने उमेदवार आयात केला असे म्हणायचे का,’ असा प्रश्न केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी उपस्थित केला.

वाजपेयींनी कधी स्वतःसाठी मते मागितली नाहीत

0
0
‘भारतीय जनता पक्ष सध्या फक्त पंतप्रधानपदाच्या उमेदवारासाठी मते मागतो आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयांनीही मते मागितली; पण ती स्वतःच्या नाही, तर पक्षाच्या नावावर. परंतु, आता पंतप्रधानपदही मतदारांवर लादण्याचा प्रकार सुरू असून, ही काय लोकशाही आहे,’ असा खडा सवाल उपस्थित करून केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढविला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images