Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

सट्टेबाजारावरही मोदींची मोहिनी

$
0
0
मतदानपूर्व कल चाचण्यांमध्ये ‘एनडीए’च्या बाजूने दिलेल्या कौलाचे सट्टे बाजारातही प्रतिबिंब पडले असून काँग्रेसला सर्वाधिक ‘रेट’ मिळाला आहे. म्हणजेच, काँग्रेसचे सरकार येण्याची शक्यता सर्वांत कमी वर्तविण्यात आली आहे!

पुण्याच्या शाळेत पालकांचा 'राडा'

$
0
0
‘विद्येचं माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्यात आज संतप्त पालकांनी शाळेच्या आवारात तोडफोड केल्याची घटना घडली आहे. सिंहगड रोडवरील ‘स्प्रिंग डेल’ शाळेच्या बसमधील सहायकानं चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्यावरही शाळा प्रशासन ढिम्म राहिल्यानं पालक खवळले होते.

‘वनाधिकाऱ्यांनो लिहिते व्हा’

$
0
0
एक सरकारी अधिकारी म्हणून नव्हे तर जंगलामध्ये फिरत असताना अनेक अविस्मरणीय अनुभवांना सामोरे जावे लागते. या प्रसंगांतून खूप शिकायला मिळते. हे अनुभव वाचकांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने वनाधिकाऱ्यांनी लिहिते झाले पाहिजे, असे म्हणताहेत राज्याचे निवृत्त प्रधान मुख्यवनसंरक्षक प्रकाश ठोसरे... ठोसरे यांच्याशी चैत्राली चांदोरकर यांनी साधलेला संवाद.

उन्हाळी सुटीसाठी जादा रेल्वे

$
0
0
उन्हाळी सुटीच्या निमित्ताने प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने जादा रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-हबीबगंज आणि पुणे-जबलपूर दरम्यान आठवड्यातून एकदा सुपरफास्ट रेल्वेसेवा चालवण्यात येणार असून ही सेवा आठ एप्रिल ते एक जुलै दरम्यान प्रत्येक मंगळवारी सुरू राहणार आहे.

फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये उभे राहणार नवीन थिएटर

$
0
0
चित्रपट निर्मितीच्या शास्त्रोक्त प्रशिक्षणासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये (एफटीआयआय) अद्ययावत सोयीसुविधांनी सुसज्ज असलेले थिएटर उभे राहणार आहे. नव्या थिएटरच्या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली असून, या थिएटरसाठी जागा निश्चित करून आराखडा तयार करण्याचे काम करण्यात येत आहे.

शहरात धावतात ८ हजार कॅब

$
0
0
‘शहरात फिरण्यासाठी स्वतःची गाडी नेण्यापेक्षा किंवा रिक्षा करण्यापेक्षा खासगी कंपन्यांच्या कॅबना मागणी वाढू लागली आहे. शहरात सुमारे १२०० हून अधिक कॅब धावत असून दिवसाला ८ हजाराहून अधिक पिक-अपसाठी या कॅबचा वापर होत आहे.

दुसऱ्यांच्या नावावर गुंतवणूक करणाऱ्यांवर ‘करडी नजर’

$
0
0
गैरमार्गांनी मिळविलेला पैसा दुसऱ्याच्या नावावर गुंतवून कालांतराने तो स्वतःकडे घेणाऱ्या पडद्यामागील करबुडव्यांवर आता इन्कमटॅक्स विभागाची करडी नजर राहणार आहे.

सायकल वाटपाला ‘निकाला’चा मुहूर्त

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अडकलेल्या स्कॉलरशिप वाटपासाठी १७ एप्रिलनंतरचा तर सायकल वाटपासाठी परीक्षेच्या निकालाचा मुहूर्त महापालिका प्रशासनाने काढला आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटी असलेल्या निकालाच्या दिवशीच विद्यार्थ्यांच्या हातात निकालाबरोबर सायकल दिली जाणार आहे.

सर्वाधिक पावसासाठी चेरापुंजी जगात ‘नंबर वन’

$
0
0
जगातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी एक असलेल्या चेरापुंजीच्या नावावर एक नवा विक्रम नोंदला गेला आहे. ४८ तासांत सर्वाधिक पावसासाठी चेरापुंजीच्या नावावर हा विक्रम नोंदला गेला आहे. १५ व १६ जून १९९५ या ४८ तासात चेरापुंजी येथे तब्बल २४९३ मिलिमीटर पाऊस पडला होता.

वृक्ष प्राधिकरण समिती बरखास्तीची मागणी

$
0
0
हायकोर्टाचे सर्व निर्णय आणि वृक्षसंवर्धनाच्या कायद्याचे उल्लंघन करून महापालिकेने अपात्र सदस्यांची वृक्ष प्राधिकरण समितीवर नेमणूक केली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी नेमलेल्या या सदस्यांची नियमानुसार पात्रता सिद्ध करा अन्यथा वृक्ष प्राधिकरण समिती बरखास्त करा, अशी मागणी पुणे ट्री वॉच संस्थेने केली आहे.

एरंडाच्या बिया खाल्ल्याने ८ मुलांना विषबाधा

$
0
0
शेंगदाणे समजून एरंडाच्या बिया खाल्ल्यामुळे आठ मुलांना विषबाधा झाली. यापैकी पाच जणांना वायसीएममध्ये दाखल केले असून, दोघांची प्रकृती गंभीर आहे. चऱ्होली गावाच्या वेशीवर असलेल्या शेतात वस्तीला असलेल्या कामगार वस्तीवर सोमवारी (७ एप्रिल) दुपार साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

स्मशानभूमीतील रक्षकाकडून तरुणीवर बलात्कार

$
0
0
आठ महिन्यांपूर्वी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आईची आठवण आली म्हणून स्मशानभूमीत जाऊन रडत बसलेल्या एका १९ वर्षीय मुलीवर स्मशानभूमीतील वॉचमनने बलात्कार केला. रविवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

पालिकेतील अग्निशमन यंत्रणेचे काम पूर्ण

$
0
0
मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका भवनात उभारण्यात आलेल्या अग्निशमन यंत्रणेचे काम अखेर पूर्ण झाले आहे. या यंत्रणेची प्राथमिक चाचणी यशस्वी झाली असून अग्निशमन दलाकडून पुढील आठवड्यात या यंत्रणेची अंतिम तपासणी केली जाणार आहे.

लक्ष्मण जगताप, तुम्ही नक्की कोणाचे?

$
0
0
‘घाटावर अपक्ष, घाटाखाली शेकाप, तर कधी मोदींनाही पाठिंबा अशी भूमिका काहीजण बजावत आहे. त्यामुळे तुम्ही नक्की कोणाचे हे पहिल्यांदा ठरवा,’ असा सवाल माजी मंत्री रामराजे निंबाळकर यांनी शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना केला आहे.

तिघांच्या भांडणात लाभ कोणाला?

$
0
0
मावळ लोकसभा मतदारसंघात अपेक्षित मते मिळविण्यासाठी प्रमुख उमेदवारांची चढाओढ सुरू आहे. मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर त्यांचा भर आहे; तसेच पुढील आठवड्यात सभांचे नियोजन करण्यात कार्यकर्ते मग्न आहेत.

‘अँड्रॉइड अॅप’ रामायण गाई

$
0
0
‘आधुनिक वाल्मिकी’ ग. दि. माडगूळकर यांचे गीतरामायण अत्याधुनिक तंत्राच्या स्पर्शाने अँड्रॉइडवर आले आहे. गीतरामायणातील सर्व गाणी मूळ रचनांसह अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली असून, आज (८ एप्रिल) रामनवमीच्या मुहूर्तावर हे अॅप्लिकेशन प्ले स्टोअरवर लाँच करण्यात येणार आहे.

‘स्कॉलरशिप’च्या चुकांवर आक्षेप

$
0
0
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेतील चुकीच्या प्रश्नांबाबत परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या पालकांनी सोमवारी परिषदेकडे धाव घेऊन अधिकाऱ्यांसमोर आपल्या तक्रारींचा पाढाच वाचला.

पौड रोड, कोथरूडमध्ये पावसाच्या हलक्या सरी

$
0
0
सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पौड रोड, कोथरूड परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. सिंहगड रोड परिसरातही अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान, आगामी दोन दिवसांमध्ये दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

परीक्षा विभाग सुधारणेच्या आश्वासनाला हरताळ

$
0
0
‘कॉलेज म्हणतंय निकालात चूक वाटतेय..ही विद्यापीठाच्या अखत्यारीतील बाब आहे. विद्यापीठात आलोय, तर विद्यापीठाचं म्हणणं आहे की चूक कॉलेजचीच आहे. परीक्षांच्या दिवसांत चुका नेमक्या कोणाच्या, हेच आम्ही शोधायचं का? चुका यांच्या नाहीतच. आम्ही अभ्यास केला, आम्ही पेपर लिहिले या आमच्याच चुका आहेत...’

विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची जबाबदारी कोणाची?

$
0
0
अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याच्या घटनेने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्याची जबाबदारी पालकांची आहे, की शाळांची, या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरितच आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images