Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मगरपट्टा रोडवर दुचाकीस्वाराला लुटले

$
0
0
मुंढवा रोडवर मगरपट्टा येथे किरकोळ कारणावरून भांडण करून दुचाकीस्वाराला लुटल्याचा प्रकार घडला. कारमधील चौघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण कदम (२६, रा. संगमवाडी) यांनी तक्रार दाखल केली.

नियम मोडणाऱ्या पब, हॉटेलवर कारवाई

$
0
0
रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारी हॉटेल आणि बीअर बार, पब यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त सतीश माथुर यांनी दिले आहेत. मोठमोठ्या स्टार हॉटेलमध्ये पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत असून, त्यामध्ये अल्पवयीन मुलांना दारूची विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी आयुक्तालयात आल्या आहेत.

तळजाई दुर्घटना : कारवाईचा तपशील द्या

$
0
0
तळजाई पठारावरील अनधिकृत बांधकाम कोसळल्या प्रकरणी राज्य सरकारने अनधिकृत बांधकामांवर अंकुश ठेवण्यासाठी २००९ मध्ये काढलेल्या अध्यादेशाची महापालिकेने पूर्तता का केली नाही, असा सवाल मुंबई हायकोर्टाने विचारला आहे.

फिजिक्सने केली दांडी गुल

$
0
0
राज्यातील इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशांसाठी आवश्यक असलेली ‘जेईई-मेन’ कठीणच गेल्याची विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया आहे. फिजिक्सने बऱ्याच जणांची दांडी गुल केली असून, अनेक विद्यार्थ्यांना निगेटिव्ह गुण मिळण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

‘केमिस्ट्री’ जुळली, तरच पुढच्या परीक्षेचे अर्ज

$
0
0
पुणे विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या एम. एस्सी. बायोकेमिस्ट्रीच्या निकालामधील नानाविध आक्षेपांबाबत विद्यार्थ्यांनीच आवाज उठवला आहे. विद्यापीठाने याबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास, पुढील परीक्षेचे अर्ज न भरण्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी रविवारी दिला.

स्कॉलरशिप परीक्षेच्या पेपरमध्ये चुका?

$
0
0
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षांच्या दर्जाबाबत पालक आणि शिक्षकांकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

‘पानशेत पूरग्रस्तांचे प्रश्न आघाडी सरकारनेच सोडवले’

$
0
0
‘पानशेत पूरग्रस्तांचे प्रश्न आघाडी सरकारनेच सोडविले असून, मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे, अर्धवट माहितीच्या आधारे भाजपने केलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही,’ असा दावा आमदार मोहन जोशी यांनी केला.

करमणूक कराची कोटीच्या कोटी उड्डाणे

$
0
0
केबल, डीटीएच सेवा, सिनेमागृहे, गेम झोन, करमणूक कर या माध्यमातून पुण्याच्या करमणूक कर विभागाने १२० कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे. या करमणूक करामध्ये सिनेमागृहांचा तब्बल ३० कोटी रुपयांचा वाटा आहे.

निवडणूक यंत्रणेला आव्हान ‘सज्जते’चे

$
0
0
पुण्यातील सातशे मतदान केंद्रांत अपंगासाठी रॅम्पची उभारणी, जुन्नर भागातील तीस मतदान केंद्रात विजेची सौय आणि मतदान कर्मचाऱ्यांसाठी चारशेहून अधिक ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था...अशी आव्हाने निवडणूक यंत्रणेला येत्या मतदानापर्यंत पेलायची आहेत.

निवडणूक पद्धतीत बदल होणे गरजेचे

$
0
0
‘आपल्या निवडणूक पद्धतीत अनेक त्रुटी आहेत. भ्रष्टाचार, घोटाळे होत असतानाही कोणीही निवडणूक पद्धतीत बदल करण्याची मागणी करत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. निवडणूक पद्धतीत बदल झाला पाहिजे,’ असे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी रविवारी व्यक्त केले.

भेंडी, गवार, सिमला मिरची स्वस्त

$
0
0
पुणे प्रादेशिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारपेठेत (मार्केट यार्ड) रविवारी भेंडी, गवार आणि सिमला मिरचीची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने त्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घट झाली, तर आवक कमी झाल्याने बटाटा आणि मटारच्या दरामध्ये त्याच प्रमाणात वाढ झाली आहे.

मनसे हा निवडणुकीवेळी सुपारी घेणारा पक्ष

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विकासाची दृष्टी नसून, केवळ तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. इतकेच नव्हे, तर मनसे हा फक्त निवडणुकीच्या वेळी सुपारी घेणारा पक्ष आहे, अशी जहरी टीका अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी जुन्नर येथे केली.

शहर नियोजनाचे राजकडून वाभाडे

$
0
0
केवळ गुंठेमंत्र्यांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी​ उंचच उंच इमारती उभारण्याच्या नादात शहर नियोजनाचा मात्र बट्ट्याबोळ होत असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येरवडा येथील सभेत केली.

उमेदवारांचे… ‘व्हिजन पुणे’

$
0
0
आरोप-प्रत्यारोप, व्यक्तिगत टीकाटिप्पणी आणि पक्षीय मतभेदांमुळे निवडणुकीच्या मतसंग्रामात शहर विकासाच्या मुद्द्यांना दुय्यम स्थान मिळते. म्हणूनच, ‘व्हिजन पुणे’ या विषयावर महाराष्ट्र टाइम्सने सर्व प्रमुख उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणले.

मतदारांची सुट्टी... उमेदवारांचा ‘ओव्हरटाइम’...

$
0
0
प्रचाराची रणधुमाळी थंडावण्यास आता नऊ दिवसांचा अवधी राहिलेला असताना अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वपक्षीय उमेदवार करीत आहेत. सुटीचे औचित्य साधून उमेदवारांनी रविवारी विविध माध्यमांतून मतदारांशी संपर्क साधला.

पुणे महिलांसाठी असुरक्षित

$
0
0
महिलाविषयक गुन्ह्यांत शहरात गेल्या वर्षी पन्नास टक्के वाढ झाली असून, महिलांवरील अत्याचारात पुण्याचा राज्यात दुसरा क्रमांक आहे. त्यामुळे पुणे शहर हे महिलांसाठी असुरक्षित बनले आहे, अशी टीका भाजप-शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

प्राण्यांनाही कूलर अन् आइस केक

$
0
0
बर्फापासून तयार केलेले फ्रूट केक, कूलर, स्प्रिंकलर्स, रेनगन अशी जय्यत तयारी सध्या राजीव गांधी प्राण‌िसंग्रहालयामध्ये सुरू आहे. माणसाप्रमाणेच वन्यप्राण्यांनाही उकाड्याचा प्रचंड त्रास होत असल्याने त्यांना खंदक आणि पिंजऱ्यांमध्ये गारवा मिळेल, यासाठी विविध कामे सुरू आहेत.

संत्र्यांना मिळाला उच्चांकी भाव

$
0
0
राज्याच्या विविध भागांत झालेली गारपीट आणि संपत आलेल्या हंगामामुळे संत्र्यांची आवक घटली असून दरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मार्केट यार्डात रविवारी फक्त ९ टेम्पो संत्र्याची आवक झाली असून तीन डझन संत्र्यासाठी शेतकऱ्यांना या हंगामातील उच्चांकी भाव मिळाला आहे.

इलेक्शन इफेक्ट, आंब्याला विलंब

$
0
0
दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात दाखल होणाऱ्या कर्नाटकी हापूस आंब्याचे आगमन, या वर्षी अजून अपेक्षित प्रमाणात झालेले नाही. आंबा तोडणी कामगार निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र असल्याने आंबा उपलब्ध होत नसल्याचे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

राज यांचा ‘मोदीजप’ सुरूच!

$
0
0
‘आर्थिक, सामाजिक संकटांसह, परराष्ट्रांचे आक्रमण होत असताना आता देशाला कणखर नेतृत्वाची गरज आहे. म्हणूनच नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा जाहीर केला आहे,’ असे मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी पुन्हा स्पष्ट केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images