Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

समाजवाद आणण्याचे समाजवादी पक्षाचे आवाहन

$
0
0
पुण्यावर समाजवादी विचारांचा प्रभाव होता. कालांतराने हा विचार मागे पडत गेला. आता पुन्हा समाजवाद आणण्याचे आवाहन करत पुणे लोकसभा मतदार संघातील समाजवादी पार्टीचे उमेदवार सय्यद अफसर यांनी रविवारच्या मुहूर्तावर खडकी, शिवाजीनगर आणि औंध भागातील नागरिकांशी संपर्क साधला.

बारामतीच्या टोलवरून जानकरांची फटकेबाजी

$
0
0
​​बारामती लोकसभा मतदार संघात प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून, आरोपप्रत्यारोपांच्या फैरींनी रंगत येऊ लागली आहे. बारामतीतील दुहेरी टोल आकारणी पद्धत बंद करण्याचे आणि बारामती टँकरमुक्त करण्याचे आश्वासन गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दिले होते.

ताईंच्या प्रचारासाठी साहेब, दादांची सभा

$
0
0
बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात खुद्द केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले आहे.

शैक्षणिक धोरण जाहीर करा

$
0
0
शिक्षणाचे बाजारीकरण कसे रोखणार, सर्व शिक्षण समान, मोफत व गुणवत्तापूर्ण करण्याच्या योजना, शालेय व उच्च शिक्षणाच्या स्तरावर आर्थिक कारणांमुळे जी विषमता निर्माण झालेली आहे, ती कशी नष्ट करणार, शिक्षणाच्या संधी कशा वाढविणार…

जगतापांनी केली दादांची फसवणूक

$
0
0
‘मावळ मतदारसंघामध्ये लक्ष्मण जगताप दोन वर्षांपासून इच्छुक होते. त्यांच्यावर विश्वास असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारही गाफील राहिले. परंतु, शेवटच्या क्षणी त्यांनी आमची फसवणूक केली,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी जगताप यांनी पक्षाशी केलेला दगाफटका उघड केला.

शर्मिला ठाकरे यांचा आज रोड शो

$
0
0
मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचारार्थ पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या रोड शोचे आज (मंगळवारी) आयोजन करण्यात आले आहे. लॉ कॉलेज रस्त्यावरील राजमहल येथून रोड शोला सकाळी नऊ वाजता प्रारंभ होणार आहे.

निवडणुकीत तटस्थ राहणार

$
0
0
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) मातंग आघाडीने लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेबरोबरच ’आरपीआय’च्या नेत्यांनीही आमची दखल घेतली नाही.

तर रिपब्लिकन पक्ष बाहेर

$
0
0
‘दोन्ही काँग्रेस राज ठाकरे यांना महायुतीमध्ये येऊ देत नाहीत,’ अशी टीका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी सोमवारी केली. ‘आता काही जणांची इच्छा असली, तरी राज व उद्धव ठाकरे एकत्र येणार नाहीत,’ असे भाकित वर्तवून ‘मनसे महायुतीमध्ये आली, तर आम्ही बाहेर पडू,’ असा इशाराही त्यांनी दिला.

शरद पवारांच्या तीन सभा

$
0
0
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर प्रचारसांगतेच्या आदल्या दिवशी (१४ एप्रिल) पवार यांच्या सभा तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये होणार आहेत.

फ्लाइंग स्क्वाड दक्ष, पण...

$
0
0
निवडणूक काळात होणारा पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी स्थापन करण्यात आलेली स्टॅटिक, व्हिडिओ आणि फ्लाइंग स्क्वाड दक्ष झाली असली, तरी झोपडपट्ट्यांमध्ये, पदयात्रांत, सभा-रॅलींमध्ये आणि कार्यकर्त्यांना वाटल्या जाणाऱ्या पैशांचा बंदोबस्त करण्यात त्यांना यश आलेले नाही.

पीएमपी सक्षमीकरणाला पर्याय नाही

$
0
0
‘व्हिजन पुणे’ या विषयावर महाराष्ट्र टाइम्सने लोकसभा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या सर्व प्रमुख उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणले होते. त्या वेळी या उमेदवारांनी पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या विषयावर आपली ‘व्हिजन’ मांडली.

मतदान करा, डिस्काउंट मिळवा

$
0
0
मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी यंदा निवडणूक आयोगाने अक्षरशः चंगच बांधला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता ‘डिस्काउंट’ची क्लृप्ती आयोगाने लढवली आहे. मतदान केल्याची खूण दाखवल्यानंतर शहरातील डिपार्टमेंटल स्टोअर्स किंवा मॉलमधील खरेदीवर काही डिस्काउंट देण्यात येणार आहे.

बिबवेवाडीत ५० लाख जप्त

$
0
0
मार्केट यार्डातील एका व्यापाऱ्याने सातारा, कराड, उंब्रज परिसरातून गोळा केलेली सुमारे ५० लाख रुपयांची रोकड बिबवेवाडी पोलिसांनी रविवारी रात्री महेश सोसायटी चौकात एका कारमधून जप्त केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगासह, इन्कम टॅक्स विभागानेही या रकमेची चौकशी सुरू केली आहे.

एकमेकींच्या साथीतील ‘आम्ही सखया’

$
0
0
लग्न ठरलेली मुलगी आणि तिची आई यांच्या नात्यातला संवाद मुलीच्या लग्न ठरण्यापासून एका वेगळ्या टप्प्यावर जाऊन सुरू होतो. आपली मुलगी सासरी जाणार, दुसऱ्या घरी जाणार असं वाटल्यामुळे आणि त्या दुःखामुळे ‘मुलीची आई होणं नको’ असं त्या आईला वाटण्यापर्यंतचा प्रवास या मुलगी-आई संबंधात घडतो.

मारहाणीप्रकरणी एकाला अटक

$
0
0
कर्जाच्या रकमेची परतफेड करूनही व्याजाच्या रकमेची मागणी करत शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाला अटक केली. दत्तात्रय अंकुश करे (वय ३४, चंदननगर, खराडी) असे आरोपीचे नाव आहे.

कँटोन्मेंटच्या प्रश्नांकडे केंद्राचे दुर्लक्षच

$
0
0
शहरात पुणे आणि खडकी तर, पिंपरी - चिंचवड शहरामध्ये देहूरोड असे तीन कँटोन्मेंट बोर्ड आहेत. या तीनही कँटोन्मेंटमध्ये ब्रिटिशकालीन १९२४ चा कँटोन्मेंट कायदा अस्तित्वात आहे. त्यामध्ये २००६ मध्ये काही बदल केले गेले. मात्र, त्या बदलामुळे फक्त खासदार आणि आमदारांना बोर्डाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा अधिकार मिळाला.

आचारसंहिता काटेकोर पाळा

$
0
0
लोकसभा निवडणुका निर्विघ्न पार पडण्यासाठी नियुक्त केलेल्या विविध पथकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून आचारसंहितेची काटेकोर आणि प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे, अशी सूचना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली आहे.

प्रचारात झडताहेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत होणाऱ्या सभांमधून विविध राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात कोपरा सभा, संघटना आणि व्यावसायिकांच्या भेटी, पदयात्रा यातून अधिकाधिक मतदारांशी संपर्क साधण्याचा उमेदवारांचा प्रयत्न सुरू आहे.

वारज्यात आढळला अल्बिनो गवत्या साप

$
0
0
वारजे परिसरातील उरीटनगर येथे मानवी वस्तीत सोमवारी संध्याकाळी अल्बिनो गवत्या साप आढळला. सर्पसंरक्षणाबद्दल आस्था असल्याने स्थानिकांनी ‘वाइल्ड अॅनिमल्स अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटी’शी संपर्क साधून सापाला जीवदान दिले. वन विभागाच्या सहकार्याने सर्पमित्रांनी मंगळवारी सकाळी त्याला निसर्गात मुक्त केले.

‘नॉन क्रिमीलेअर’ विद्यार्थ्यांची अडवणूक

$
0
0
नॉन क्रिमीलेअर गटाची उत्पन्न मर्यादा सहा लाख रुपयांवरून साडेचार लाख रुपये करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना हा नियम लागू आहे. त्यामुळे ज्यांची उत्पन्न मर्यादा साडेचार लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांना शैक्षणिक शुल्काचे संपूर्ण पैसे द्यावे लागणार आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images