Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नामफलकाच्या दंडवसुलीसाठी मुदतवाढ

$
0
0
नामफलकांचे शुल्क न भरणाऱ्या शहरातील व्यापाऱ्यांना महापालिकेने नोटीस पाठविल्याने एकच गोंधळ उडाला होता. नामफलकासाठी पहिल्यांदाच ही योजना राबविली जात असल्याने व्यापाऱ्यांमध्ये जनजागृती झालेली नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने ३१ मे नंतरच व्यापाऱ्यांकडून दंड वसूल करावा, असा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

तरुण पिढीच्या आवडीशी सुसंगत दिवाळी अंक हवेत

$
0
0
‘तंत्रज्ञानामुळे बदलत्या काळात दिवाळी अंकांचे स्वरूप बदलण्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. तरुण पिढीची भाषा बदलते आहे. त्यांच्या आवडीनिवडीशी सुसंगत अंक तयार झाले पाहिजेत. दिवाळी अंक ही साहित्याची प्रयोगशाळा असून, त्यातून उत्तम साहित्यनिर्मिती होते,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

युवक राखताहेत मतदारांचे ‘इमान’!

$
0
0
‘वाईट पाहू नका’, ‘वाईट बोलू नका’ आणि ‘वाईट ऐकू नका’ या महात्मा गांधींनी दिलेल्या संदेशांच्या धर्तीवरच मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘डेमोक्रसी ऑफ ट्रुथ’ या अनोख्या जाहिरातीची निर्मिती पुण्यातील सर्जनशील युवकांनी केली आहे.

प्रलोभनांवर आता ‘आप’चीही नजर!

$
0
0
मतदारांना भुलवण्यासाठी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पैसे, मद्य किंवा अन्य आमिषे दाखविऱ्यांवर आता आम आदमी पक्षाचाही ‘वॉच’ असणार आहे. टेक्नोसॅव्ही असलेल्या ‘आप’ने यासाठीही तंत्रज्ञानाची मदत घेतली असून पक्षाचे दोन हजार स्पाय कॅमेऱ्याच्या माध्यमातून पैसे वाटप किंवा अन्य गोष्टींच्या वाटपावर लक्ष ठेवणार आहेत.

कर्ज परतफेड न केल्याने दोघांना अटक

$
0
0
कर्जाच्या रकमेची परतफेड न केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना कोर्टाने पाच एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

भारती विद्यापीठातील रस्ता खुला करणार का?

$
0
0
लोकसभेच्या निवडणुकीत पुणेकरांची मते मागताना भारती विद्यापीठाने पुणेकरांचा बंद केलेला रस्ता खुला करून देणार का, असा सवाल भाजपच्या वतीने काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांना गुरूवारी विचारण्यात आला आहे.

परीक्षा विभागाचा कारभार सुधारण्याची ग्वाही

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील कारभाराविरोधातील विविध तक्रारींबाबत येत्या ४८ तासांमध्ये अंतिम निर्णय घेण्याचा इशारा कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी गुरुवारी दिला. ‘यापुढे विभागाचा कारभार निश्चितच सुधारणार असून, विद्यार्थ्यांनी त्याबाबत कोणतीही साशंकता बाळगू नये,’ असे आवाहनही केले.

प्रक्रिया मालावर सेवा शुल्क नको

$
0
0
प्रक्रिया केलेल्या मालावर सेवा शुल्क आकारण्यास पुण्यातील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला असून, राज्य सरकारकडे दाद मागण्यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली आहे.

प्रश्न सोडविणाऱ्यांना तरुणांची पसंती

$
0
0
प्रथमच मतदान करीत असल्याने मला उत्सुकता आहे. नागरी प्रश्नांचा विचार करणाऱ्या उमेदवारालाच माझी पसंती आहे. कच्चे रस्ते, पाणी, वीज या बाबतीत प्रामुख्याने सुधारणा करणारा उमेदवार असावा.

निवडणूक खर्च अनलिमिटेड.. लिमिटेड !

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी सत्तर लाख रुपयांचे खर्चाचे बंधन निवडणूक आयोगाने घातले असले तरी उमेदवारांचा प्रत्यक्ष खर्च त्याच्या कित्येक पटींनी अधिक होणार आहे. उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी केलेले ‘शॅडो रजिस्टर’ हे फक्त सभा, मेळावे व रॅली याच्यापुरतेच राहणार आहे.

‘आप’ चे संकल्पपत्र जाहीर

$
0
0
उमेदवारी जाहीर करण्यापासून आघाडी घेतलेल्या आम आदमी पक्षाने आता पुण्यासाठीचा जाहीरनामा (संकल्प पत्र) जाहीर करण्यातही प्रथम क्रमांक पटकावला आहे.

बापट आले अर्ध्यावरच सोडून गेले

$
0
0
हीरोपेक्षा साईडहीरोच प्रेक्षकांची दाद घेऊन जातानाचा प्रसंग विरळाच. मात्र, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनिल शिरोळे यांच्या कसबा पेठेतील गुरुवारी निघालेल्या प्रचारफेरीत हा ‘पिक्चर’ दिसला! ‘कसब्याची ताकद गिरीश बापट’ अशा घोषणांनी आसमंत दणाणून सोडला गेल्यानंतर आमदार बापट अखेर पदयात्रेत सहभागी झाले.

खर्च तर होणारच...

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी सत्तर लाख रुपयांचे खर्चाचे बंधन निवडणूक आयोगाने घातले असले तरी उमेदवारांचा प्रत्यक्ष खर्च त्याच्या कित्येक पटींनी अधिक होणार आहे. उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी केलेले ‘शॅडो रजिस्टर’ हे फक्त सभा, मेळावे व रॅली याच्यापुरतेच राहणार आहे.

तुझे नी माझे जमेना...

$
0
0
वरिष्ठ नेते वारंवार दोस्तीचे संदेश देत असताना आघाडीचा धर्म पाळण्याच्या मुद्यावरून जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसच्या मनोमिलनात विघ्न उभे राहिले आहे.

‘आघाडी’ की ‘बिघाडी’

$
0
0
वरिष्ठ नेते वारंवार दोस्तीचे संदेश देत असताना आघाडीचा धर्म पाळण्याच्या मुद्यावरून जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसच्या मनोमिलनात विघ्न उभे राहिले आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रामाणिकपणे प्रचार करीत असताना राष्ट्रवादीकडून मात्र आपल्या पदाधिकाऱ्यांची फोडाफोडी सुरू असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसजनांनी राष्ट्रवादीच्या प्रचारसभेतून ‘सभात्याग’ केला.

मोदींचे स्वप्न स्वप्नच राहणार

$
0
0
‘पंतप्रधानपदाचा उमेदवार आहे, असे म्हणून कोणी खरोखर पंतप्रधान होत नाही. पंतप्रधान होण्याचे नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्न स्वप्नच राहणार आहे. देशातील जनता जातीयवादी पक्षाला कधीही थारा देणार नाही,’ अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपाची खिल्ली उडविली.

मोदी पंतप्रधान होणार नाहीत!

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असतानाच भाजप हा सर्वांत जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरणार आहे. मात्र, नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकणार नसल्याचे भाकीत बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष आणि ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी वर्तविले.

मोदींना क्लीन चिट नाही: शिंदे

$
0
0
‘गुजरात दंगलीबाबत अद्यापही कोर्टात काही खटले सुरू असून, चौकशी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मोदींना ‘क्लीन चिट’ देता येणार नाही,’ अशी भूमिका केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना मांडली. मुख्यमंत्री असताना ‘राजधर्म’ न पाळणाऱ्यांना आता पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत, अशा शब्दांत त्यांनी मोंदीवर प्रहार केला.

बक्षिसाच्या आमिषाने ५.२५ लाखांची फसवणूक

$
0
0
खासगी कंपनीचे बक्षीस लागल्याच्या आमिषाचा मेल पाठवून एका नागरिकाला सव्वापाच लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४ मतदारसंघांत १ खिडकी योजना

$
0
0
निवडणुकीच्या प्रचारासाठी आवश्यक परवानगी देण्याच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी पुण्यातील चार लोकसभा मतदारसंघांत १३ ठिकाणी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. एक खिडकी योजनेच्या कामातील ढिलाईविषयी तक्रारी वाढल्यामुळे त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images