Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

निवडणुकीसाठी माहितीदर्शक नकाशे

$
0
0
पुणे लोकसभा मतदारसंघ आणि त्या अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघात असलेले मनपा प्रभागातील सर्व पक्ष, नगरसेवक, सर्व झोपडपट्ट्या, लोकसंख्या, समस्यांची माहिती देणाऱ्या नकाशांची निर्मिती मशाल आणि इनहॉफ या संस्थांनी केली आहे.

सैन्यदलाच्या टपाली मतपत्रिका रवाना

$
0
0
देशरक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या सैन्य दलातील पुण्याच्या दहा हजार जवानांना टपाली मतपत्रिका पाठविण्यात आल्या असून, निवडणुकीच्या कामासाठी नेमलेल्या ४४ हजार महसूल कर्मचारी, पोलिस व होमगार्ड यांना मतदानासाठी फॉर्म देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

फोडाफोडीचे राजकारण चालूच

$
0
0
मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठीबरोबरच विविध समाजाचा आणि प्रमुख नेत्यांचा पाठिंबा मिळविण्याची धडपड चालविली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील आता जाहीरपणे शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.

आता सक्ती खाणकाम आराखड्याची

$
0
0
खाण व क्रशर उद्योजकांना गौण खनिजांच्या उत्खननासाठी खाणकामपट्ट्याला मंजुरी मिळाल्यानंतर तीन महिन्यांत सरकारला खाणकाम आराखडा सादर करावा लागणार आहे.

शहरात सोनसाखळी हिसकावल्याच्या ३ घटना

$
0
0
शहरात गुरुवारी सोनसाखळी हिसकावण्याच्या तीन घटना घडल्या असून त्यात सुमारे साडेसहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावण्यात आले आहेत. या तीनही घटनामंध्ये दुचाकीवरील दोघांचा समावेश असून या घटनांपाठीमागे एकच टोळी असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

३ घटनांमध्ये १० लाखांचा ऐवज चोरला

$
0
0
शहराच्या विविध भागात घडलेल्या तीन घटनांमध्ये रोख रक्कम व सोन्या-चांदीचा सुमारे १० लाख ८३ हजार रुपयांचा ऐवज अनोळखी चोरट्यांनी बुधवारी चोरून नेला.पीएमपी बसमधून प्रवास करत असताना गळ्यात अडकविलेल्या हँडबॅगेतील प्लास्टिकच्या पिशवीतील तीन लाख रुपयांची रोकड चोरल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.

खासगी कंपन्यांनी निवडावे ‘डिफरन्शिएटेड बँ​किंग’

$
0
0
देशात बँक सुरू करण्याची इच्छा असलेल्या खासगी कंपन्यांतील काही कंपन्यांनी पूर्ण बँकिंग परवान्यापेक्षा वेगवेगळ्या स्वरुपातील परवान्यांचा विचार करावा. त्यांच्यासाठी ते अधिक सोयीस्कर व उपयुक्त असल्याचे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

बँकिंग क्षेत्राच्या धोरणांत सुधारणांची गरज

$
0
0
‘केवायसी’ नियमांमुळे देशातील बहुसंख्य नागरिकांना बँकांमध्ये खाते उघडता येत नाही. अशा नागरिकांना बँकिंग सुविधा सहजतेने उपलब्ध करून देण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी बँकिंग धोरणात सुधारणांची आवश्यकता आहे,’ असे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.

इन्कमटॅक्समध्ये पुणे देशात ६ व्या स्थानावर

$
0
0
इन्कमटॅक्स विभागाच्या पुणे परिक्षेत्रातून या आर्थिक वर्षाअखेरीस २९ हजार ६११ कोटी रुपयांचा महसूल जमा झाल्याने पुण्याने देशात सहावे स्थान कायम राखले आहे. पुणे परिक्षेत्रातून जमा झालेल्या इन्कमटॅक्समध्ये बँकिंग, फायनान्स आणि विमा क्षेत्रातून सर्वाधिक इन्कमटॅक्स मिळाला आहे.

स्विमिंग पूलची सुरक्षा ‘पाण्यात’

$
0
0
शहरातील ५० खासगी आणि सार्वजनिक स्विमिंग पूलपैकी तब्बल २५ पूल अतिधोकादायक ठरत आहेत, तर १० पूलवर सुरक्षाविषयक निकष गटांगळ्या खात आहेत. उन्हाळ्याच्या सुटीत स्विमिंगसाठी होणारी गर्दी लक्षात घेता वेळीच पूल सुरक्षित केले नाहीत, तर यंदाही शहरातील हे पूल चिमुकल्यांसाठी जीवघेणे ठरण्याची भीती आहे.

‘शुल्क नियंत्रण’च्या प्रस्तावित मसुद्यावर मोहोर

$
0
0
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या शुल्क नियंत्रण कायद्याच्या प्रस्तावित मसुद्यावर राष्ट्रपतींची मोहोर उमटली असून, हा कायदा लवकरच अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या शाळांच्या भरमसाठ फी वाढीला लगाम बसणार असून, शाळांची फीही आटोक्यात येणार आहे.

ग्राहकांची दिशाभूल : कंपनीला ‘FDA’कडून दंड

$
0
0
शीतपेयात फळाचा अर्क न वापरता संबंधित फळाचा कृत्रिम स्वाद वापरून ग्राहकांची दिशाभूल केल्याच्या कारणावरून उत्पादक कंपनीस तेरा प्रकरणांत दोषी ठरविण्यात आले आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संबंधित कंपनीला तीन लाख ९० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

फ्लॅट आणि दुकान फोडून १५.५ लाखांची चोरी

$
0
0
कर्वेनगर येथील फ्लॅट आणि औंध येथील नोटबुक हब नावाचे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे साडेपंधरा लाख रुपयांचा ऐवज चोरला आहे. त्यात रोख रकमेसह, सोन्या-चांदीचे, हिऱ्याचे दागिने, डॉलर आणि १२ लॅपटॉपसह तीन टॅबलेटचा समावेश आहे.

झळा या लागल्या जिवा…

$
0
0
निवडणुकांचा ज्वर चढू लागला असतानाच वाढत्या उकाड्यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. दिवसभर कडक उन्हाच्या झळा अनुभवल्यानंतर सायंकाळीही हवेत उकाडाच कायम राहत असल्याने पुणेकरांना रात्रीही दिलासा मिळत नसल्याचेच चित्र आहे.

विद्यार्थ्यांसमोर समस्यांची जंत्री

$
0
0
‘माझे नाव मुकुल लोहार. मी जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये राहतो. मला अकरावीला पुण्यात प्रवेश घेण्याची इच्छा आहे. मला त्याबाबत मार्गदर्शन करा...’, ‘माझ्या मुलाने पुण्यातून आयसीएसई बोर्डाच्या शाळेतून दहावीची परीक्षा दिली.

शाळांनी दिले चुकीचे पत्ते

$
0
0
राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशांसाठी राबविण्यात येत असलेल्या ऑनलाइन प्रक्रियेमध्ये शाळांनी दिलेले चुकीचे पत्ते हा मोठा अडथळा ठरला आहे.

इंजिनीअरिंग, मॅनेजमेंटचे एकही कॉलेज यंदा नको

$
0
0
इंजिनीअरिंग आणि मॅनेजमेंट शिक्षण संस्थांतील रिक्त जागांचे वाढते प्रमाण लक्षात घेता यंदा (२०१४-१५) एकाही नव्या तंत्रशिक्षण संस्थेला परवानगी मिळणार नसून, सध्या अस्तित्वात असलेल्या संस्थांचे जागावाढीचे प्रस्तावही स्वीकारले जाणार नाहीत.

सुरक्षिततेसाठीच भारती विद्यापीठातील रस्ता बंद

$
0
0
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी भारती विद्यापीठातून जाणारा रस्ता बंद करण्यात आला असून, कोर्टानेही भारती विद्यापीठाच्या बाजूने निकाल दिला असल्याचा खुलासा काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड्. अभय छाजेड यांनी शुक्रवारी केला.

प्रभाग समित्यांवर ‘राष्ट्रवादी’ची बाजी

$
0
0
महानगरपालिकेच्या प्रभाग समि‌त्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. प्रभाग समि‌तीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच नऊ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. नऊपैकी चार जागा राष्ट्रवादी, तीन जागांवर काँग्रेस तर दोन जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

कदम, भाटिया यांचा खर्च ५ लाखांवर

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी झालेला खर्च उमेदवारांकडून सादर करण्यास सुरुवात झाली असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम व पीपल्स गार्डीयन पार्टीचे अरुण भाटिया यांचा खर्च पाच लाखांवर गेला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images