Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राजकीय सभांसाठी मैदानाचा ‘राजमार्ग’!

$
0
0
बड्या राजकीय नेत्यांच्या सभा पुण्यात घ्यायच्या कुठे, असा सर्वच राजकीय पक्षांना पडलेला संभ्रम दूर करीत शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सभेसाठी एसपी कॉलेजचे मैदान उपलब्ध करून दिले जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांनी वाटोळे केले

$
0
0
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी जिल्ह्याचे वाटोळे केले आहे. आपण मात्र विरोधात असूनही कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली. या कामांमुळेच मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या पाच आमदारांपैकी एकाचीही आपल्या विरोधात लढण्याची हिम्मत झाली नाही,’ असा दावा शिवसेनेचे शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांनी केला आहे.

मनसे समर्थकांची मते मिळविण्याचा पवारांचा डाव

$
0
0
'शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केलेले वक्तव्य हाही पवार यांचा ‘विनोद’च आहे काय,’ अशी शंका येते, असे टीकास्त्र शिवसेनेने बुधवारी सोडले.

मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात

$
0
0
अवेळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीच्या पॅकेजमधून पहिल्या टप्प्यात ८० कोटी रुपये मिळाले आहेत. ही मदत येत्या १५ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

महापौर पाहतायेत ‘बीआरटी’ अहवालाची वाट

$
0
0
बीआरटी मार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा अहवाल दोन आठवड्यानंतरही महापौर कार्यालयाकडे पाठविण्याचा विसर प्रशासनाला पडला आहे.

मनसे नगरसेविकेला मदत करणारीला अटक

$
0
0
महापालिका निवडणुकीसाठी बनावट जात आणि जातपडताळणी प्रमाणपत्र तयार करायला मनसेच्या नगरसेविका कल्पना बहिरट यांना मदत केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) एका महिलेस अटक केली आहे.

सिनेट सदस्य मागणार दाद

$
0
0
परीक्षा विभागाची कार्यक्षमता सुधारण्यासाठी पुणे विद्यापीठ प्रशासनाने अद्यापही कडक धोरण न अवलंबिल्याने विद्यापीठाच्याच सिनेट सदस्यांनी थेट राज्यपालांकडेच दाद मागण्याचा निश्चय केला आहे.

राजसाहेबांशिवाय… आहेच काय?

$
0
0
… कोण आला, कोण आला… मनसेचा वाघ आला, अशा घोषणांच्या गजरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दीपक पायगुडे यांची पदयात्रा सुरू होते आणि केवळ आणि केवळ राज ठाकरे यांच्या करिष्म्याशिवाय पक्षाच्या पोतडीत प्रचार करताना दुसरा कोणताच मुद्दा नसल्याचे पदोपदी जाणवत जाते.

प्रचारातील गैरव्यवहाराला चाप

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैसे आणि दारू वाटप रोखण्यासाठी पोलिसांची १३ भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. शहरातील सर्वच विधानसभा मतदारसंघांसाठी प्रत्येकी एक भरारी पथके असणार असून एका पथकात चौघांचा समावेश आहे.

‘विश्व’ ‘जीत’ खेचण्यासाठी सज्ज

$
0
0
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘यंग टीम’मधला नवा चेहरा पुण्यात पोचविताना काँग्रेस नावाचे महाकाय ‘प्रचारइंजिन’ हळूहळू का होईना पूर्ण आग ओकू लागले आहे. काही ठिकाणी कार्यकर्ता नाराज आहे, कोणी समोर दिसत असलं, तरी मनापासून काम करत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

पुण्यात कमळ रुतलेलेच

$
0
0
लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना मोदींची कथित लाट आणि संघ परिवाराची साथ असे सकारात्मक वातावरण तयार झालेले असताना प्रचार सुरू झाल्यानंतर प्रत्यक्षात मात्र भारतीय जनता पक्षाचे कमळ पुण्यात समस्यांच्या चिखलात रुतले आहे.

सोनियांची सभाही SPवर

$
0
0
बड्या राजकीय नेत्यांच्या सभा पुण्यात घ्यायच्या कुठे, असा सर्वच राजकीय पक्षांना पडलेला संभ्रम दूर करून, शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सभेसाठी एसपी कॉलेजचे मैदान उपलब्ध करून दिले जाण्याची शक्यता आहे.

रखडले सिंहांचे सीमोल्लंघन

$
0
0
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी देशभर विकासाची सिंहगर्जना करीत असले, तरी पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील सिंहाचे पिंजरे त्यांचा होकार मिळत नसल्याने रिकामेच आहेत! गुजरातचा राज्य प्राणी असलेला आशियाई सिंह मोदींच्या परवानगीशिवाय इतर राज्यांमधील प्राणी संग्रहालयात येऊ शकत नाही.

वेटरशी झटापटीतून वेश्येचा मृत्यू

$
0
0
हॉटेलमध्ये मद्यप्राशन करताना वेटरसह झालेल्या झटापटीमध्ये सुनंदा पोकळे (अंदाजे वय २५) ही वेश्या मरण पावली. शिवाजी रोडवरील प्यासा हॉटेलमध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली.

कॉलेज विद्यार्थ्यांची मद्यधुंद पार्टी

$
0
0
लोणावळा परिसरातील तुंगार्लीजवळील गोल्ड व्हॅली येथील एका बंगल्याच्या मोकळ्या जागेत मद्यप्राशन करून अश्लिल व बिभत्स नृत्य करून धांगडधिंगा घालणाऱ्या ४७ उच्चशिक्षित तरुण-तरुणींना बुधवारी मध्यरात्री लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली.

परीक्षेचे परिपत्रकच चुकीचे!

$
0
0
इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षासाठी कॉलेज पातळीवर प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी ५० गुणांची परीक्षा घेण्याबाबतचे पुणे विद्यापीठाचे परिपत्रकच चुकीचे असल्याचे स्पष्टीकरण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी गुरुवारी दिले.

महिला सुरक्षेसाठी समिती

$
0
0
कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ कायद्यानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ज्या विभागामध्ये दहापेक्षा जास्त महिला कर्मचारी कार्यरत आहेत, अशा प्रत्येक विभागासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करण्याची सूचना आयुक्त राजीव जाधव यांनी दिली आहे.

‘घरोघरी जाऊन महिलांशी संवाद’

$
0
0
रोज सकाळी कुटुंबीयांसाठी राबणारे हात आता घरातील जबाबदाऱ्यांबरोबरच प्रचाराची आघाडीदेखील समर्थपणे सांभाळत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप पतीच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात सहभागी झाल्या आहेत.

पासपोर्ट पुस्तकांची टंचाई संपली

$
0
0
पासपोर्ट पुस्तकांच्या टंचाईमुळे विस्कटलेली पासपोर्ट छपाईची घडी आता पुन्हा सुरळीत होण्याच्या मार्गावर आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पासपोर्ट कार्यालयाकडे पुस्तकांचा पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे.

ज्योतिष हे शास्त्र नसल्याचे सिद्ध करा

$
0
0
‘ज्योतिष हे शास्त्र नसल्याची टीका अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आतापर्यंत अनेकदा केली आहे. मात्र, सातत्याने आव्हान देणाऱ्या ‘अंनिस’ने फलज्योतिष हे शास्त्र नसल्याचे सिद्ध करून दाखविल्यास २१ लाख रुपये देण्याची तयारी आहे,’ असे आव्हान बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार यांनी दिले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images