Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अखेर कलमाडींनी पुणे ‘सोडलं’!

$
0
0
राष्ट्रकुल घोटाळ्यात दोषी ठरल्यानं काँग्रेसनं उमेदवारी नाकारलेले सुरेश कलमाडी अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरणार नसल्याचं स्पष्ट झालंय. येत्या निवडणुकीत आपण काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांना पाठिंबा देऊ, असं जाहीर करून खुद्द कलमाडींनीच उलटसुलट चर्चांवर पडदा पाडला.

RTI कार्यकर्त्याची आत्महत्या

$
0
0
चाकणमधील जमीन घोटाळ्यांविरोधात माहिती अधिकाराच्या माध्यमातून आवाज उठविणारे आरटीआय कार्यकर्ते विलास बारवकर यांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेल्या घोटाळेबाजांच्या यादीत विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे- पाटील यांचेही नाव असल्याने खळबळ उडाली आहे.

विकासकामे हाच माझा अजेंडा

$
0
0
मी मागील पाच वर्षांत बारामती लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांवर निवडणूक लढविणार आहे. मी मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नाला प्राधान्य दिले. मी केलेली विकासकामे हीच माझ्या प्रचाराचा मुख्य अजेंडा असतील.

सुप्रिया सुळेंचा प्रचार २९ ला कन्हेरीपासून

$
0
0
निवडणूक म्हटली, की केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या काटेवाडीजवळील श्री क्षेत्र कन्हेरी चर्चेत येते. कारण निवडणूक कोणतीही असली, तरी पवार श्री क्षेत्र कन्हेरीच्या मारुतीरायाला श्रीफळ फोडूनच प्रचाराचा प्रारंभ करतात.

खोपडे यांची मालमत्ता दोन कोटी

$
0
0
बारामती लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पार्टीचे (आप) उमेदवार निवृत्त पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. पोलिस खात्यात राहून कुचकामी पोलिस यंत्रणेवर टिकाटिप्पणी करणाऱ्या खोपडे यांची मालमत्ता दोन कोटी ५५ लाख ७८ हजार रुपये आहे.

श्रीरंग बारणेंचा उमेदवारी अर्ज दाखल

$
0
0
ढोल-ताशांचा गजर, फटाक्याची आतषबाजी करीत मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी (२५ मार्च) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत शिवसेनेसह भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जयश्री पलांडे भाजपमध्ये परतल्या

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी जयश्री पलांडे यांनी मंगळवारी पुन्हा स्वगृही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पलांडे यांच्या प्रवेशामुळे शिरूरमध्ये भाजपला ताकद मिळण्यास मदत होणार आहे.

बारणेंची मालमत्ता ५२ कोटी

$
0
0
मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी त्यांच्याकडे ५२ कोटी रुपयांची प्रॉपर्टी असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यामध्ये अलिशान मोटारींबरोबरच स्वसंरक्षणासाठी एक रिव्हॉल्वर आणि एक बोअरचाही समावेश आहे.

सोपानराव निकम यांचा अर्ज दाखल

$
0
0
आम आदमी पार्टीचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निवृत्त न्यायाधीश सोपानराव निकम यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, आपला प्राधान्यक्रम स्पष्ट केला.

‘राष्ट्रवादी’च्या प्रचारात आता काँग्रेसचा ‘हात’

$
0
0
मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या प्रचारात सहभागी होण्याचा निर्णय काँग्रेसने अखेर मंगळवारी (२५ मार्च) घेतला.

बारावी पेपर तपासणीबाबतची चूक बोर्डाला मान्य

$
0
0
बंद झालेल्या कॉलेजकडे बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची चूक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाने मंगळवारी मान्य केली.

‘जेईई-मेन’मध्ये ‘ऑप्शन’ नाही

$
0
0
‘जेईई-मेन’मध्ये गणित, फिजिक्स आणि केमिस्ट्री या तिन्ही विषयांच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरील प्रश्न येतील, असे परीक्षा संचालकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही विषयातील कोणताही भाग ‘ऑप्शन’ला टाकणे महागात पडू शकते.

गळ्यात गळे... नि पायात पाय!

$
0
0
अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंतची कोणतीही निवडणूक आली, की त्याचा प्रचार वा कोणा एका नेत्याची सभा एवढ्यापुरताच मर्यादित ‘इव्हेंट’ हल्ली नसतो. तर, उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती-परीक्षांपासून उमेदवारी जाहीर होण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर माध्यमांचा प्रकाशझोत पडत राहतो.

वाहतुकीची कोंडी नि डोक्याला ताप

$
0
0
शहरातील वाहतुकीची कोंडी करत हजारो कार्यकर्त्यांसह पदयात्रा काढत पुण्यातील जवळपास सर्व आघाडीच्या उमेदवारांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा ‘मुहूर्त’ साधला. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीची कोंडी झाली होती.

प्राध्यापकांना नको ‘इलेक्शन ड्युटी’

$
0
0
लोकसभा निवडणुकीचा पुणे विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये कमीत कमी व्यत्यय यावा, यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी स्वतः पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना पत्र पाठविली आहेत.

दारू वितरकांवर ‘सीसीटीव्ही’चा वॉच

$
0
0
निवडणुकीच्या काळात मद्याचे पेले रिते करणाऱ्या कार्यकर्त्यांसह त्यांना पाजणाऱ्या उमेदवारांवरही निवडणूक आयोगाने लक्ष केंद्रीत केले आहे. आचारसंहितेच्याकाळात ‘सीसीटीव्हीं’च्या देखरेखीखाली मद्याची निर्मिती आणि विक्री करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.

मनसेच्या ६० जणांवर गुन्हा दाखल

$
0
0
मनसेचे लोकसभेचे उमेदवार दीपक पायगुडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना जादा गाड्यांचा वापर केला, वाहतुकीला अडथळा केल्या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी ६० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

बापटांच्या अनुपस्थितीत शिरोळेंचा अर्ज

$
0
0
उमेदवारी डावलल्याने नाराज झालेले आमदार गिरीश बापट यांच्या अनुपस्थितीतच महायुतीचे उमेदवार अनिल शिरोळे यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल करण्यात आला. दरम्यान, ‘बापट हे आमचे नेते असून त्यांच्याच नेतृत्वाखाली प्रचार करणार आहोत,’ असे शिरोळे यांनी पत्रकारांना सांगितले.

‘मी सर्वाधिक मतांनी विजयी होईन’

$
0
0
पुणे लोकसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दीपक पायगुडे आणि शिरूरचे उमेदवार अशोक खांडेभराड यांनी मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

‘अभ्यासू म्हणून पुणेकर मला निवडतील’

$
0
0
आम आदमी झिंदाबाद, आम औरत झिंदाबाद अशा घोषणा देत पदयात्रा काढून, आम आदमी पक्षाचे उमेदवार प्रा. सुभाष वारे यांनी आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केला. इतर उमेदवारांच्या मिरवणुकांच्या तुलनेत आम आदमी पक्षाचा साधेपणा चर्चेचा विषय ठरला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images