Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

'तपास कोर्टाच्या देखरेखीखाली व्हावा’

0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचा तपास कोर्टाच्या देखरेखीखाली व्हावा, तसेच हा तपास लावण्यासाठी वेगवेगळे अधिकारी तसेच तपास यंत्रणांची मदत घेण्याच्या पर्यायांचा विचार व्हावा, अशी विनंती दाभोलकर कुटुंबीयांनी हायकोर्टात केली आहे.

१७५ रिक्षांना परमिट मिळणार नाही

0
0
रिक्षा परमिटसाठी आलेल्या ऑनलाइन अर्जांच्या तपासणीदरम्यान पुणे विभागात १५ ते २० टक्के अर्ज अवैध ठरले आहेत. निकषाची पूर्तता न केल्यामुळे १५० ते १७५ जणांना रिक्षा परमिट मिळणार नसल्याचे समोर आले आहे.

रवींद्र संगीताची अनोखी मैफील

0
0
गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर हे अतिशय विद्वान व्यक्तिमत्त्व असून संगीत आणि साहित्यातील त्यांचं कार्य अवर्णनीय आहे. त्यांनी लिहिलेल्या नोबेल पारितोषिक विजेत्या ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहाला १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एसएनडीटी विद्यापीठातील प्रथम वर्षाच्या संगीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी मिळून एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

मुग्ध नायकाची खुलली नृत्यकथा!

0
0
‘झा डाला वेल का बिलगते?’, ‘फुलाकडे भ्रमर का आकर्षित होतो?’, ‘प्राण्यांचं युगुल का बरं एकत्र येतं?’... नायिका अशा पद्धतीचे प्रश्न मुग्ध नायकाला सातत्याने विचारते. सर्वांत आधी तो तिच्या येण्याची दखलही घेत नाही.

‘इंडियन पॅनोरमा’ चित्रपट महोत्सवाचं आयोजन

0
0
जागतिक स्तरावरील चित्रपटांची स्पर्धा करणाऱ्या ‘इंडियन पॅनोरमा’ या विभागातील भारतीय चित्रपटांची पर्वणी २६ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत पुणेकरांना मिळणार आहे.

‘मिराज’मध्ये रंगणार फिल्मी गप्पा

0
0
प्रेक्षकांच्या कमतरेमुळे किंवा प्रमोशनच्या अडचणींमुळे काही सिनेमे प्रेक्षकांपर्यंत नीटसे पोहोचतच नाहीत. आशय-विषय चांगला असूनही या सिनेमांना प्रेक्षकवर्ग मिळत नाही आणि सिनेमांप्रमाणे प्रेक्षकांचंही नुकसान होतं.

सापडले लोहयुगीन महापाषाण संस्कृतीचे पुरावे

0
0
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या परवानगीनं डेक्कन कॉलेजच्या टीमनं कुही उर्फ खोपडी (जि. नागपूर) इथं केलेल्या संशोधनाला यश आलं आहे. कुही परिसरात सुरू असलेल्या उत्खननात या टीमला सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीचे लोहयुगीन महापाषाण संस्कृतीचे अवशेष आढळून आले आहेत.

कलात्मक अभिव्यक्ती स्त्रीत्त्वाची !

0
0
ब्रॉन्झ किंवा झिंक प्लेटमध्ये कोरल्यानंतर त्यात शाई भरून तयार केलेलं इचिंग पेंटिंग, काही मिक्स मीडिया आर्ट, तर काही व्यक्तिचित्रं, निसर्गचित्रं आणि इन्स्टॉलमेंट्स असं चित्रप्रकारांचं वैविध्य सध्या येरवड्यातील ईशान्यमधील टिल्टिंग आर्ट गॅलरीत पाहायला मिळतंय.

ऑनलाइन अपॉइंटमेंटकडे पाठ

0
0
लर्निंग लायसन्स काढण्यासाठी ‘आरटीओ’च्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या ऑनलाइन अपॉइंटमेंट सुविधेकडे आयटीची भाषा करणाऱ्या टेक्नोसॅव्ही पुणेकरांनी पाठच फिरवली आहे.

अजस्र अजगराने बोकडाला गिळले

0
0
अजगराचे हल्ले आणि शिकारींविषयी अनेक किस्से गावकऱ्यांनी ऐकले होते; पण गवत चरणाऱ्या २५ किलो वजनाच्या बोकडावर हल्ला करून त्याला गिळणाऱ्या अजगराला प्रत्यक्षात पाहून मात्र गावकरी थक्क झाले.

ऑनलाइन पासपोर्ट भरण्यासाठी शंभर रुपये

0
0
पासपोर्ट प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने ऑनलाइन पद्धत स्वीकारली असली तरी ग्रामीण भागातील नागरिक आणि कप्युटरविषयी अज्ञानी नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आता महाराष्ट्रात दहा हजार ‘नागरी सेवा केंद्रां’मध्ये पासपोर्टचे अर्ज भरून मिळणार आहेत.

उपमुख्यमंत्र्यांचे ७० हजार कोटींचे घोटाळे

0
0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ७० हजार कोटी रुपयांचे घोटाळे केले आहेत; त्यांच्यासारखे काम मी करू शकत नाही, असा टोला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोमवारी लगावला. यंदा सव्वादोन लाख मतांच्या फरकाने आपण विजयी होऊ, असा दावा त्यांनी केला.

बारामतीमधील उमेदवारात ग्रामीण भागाची दहशत

0
0
बारामती लोकसभा मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या तोंडावर गारपीट झाल्यामुळे उमेदवारांनी मत मागायला गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तोंड द्यायला लागू नये, म्हणून शहरी भागात संपर्क साधण्यावर भर दिला आहे. त्यामुळे गावांमध्ये घोंगडी सभा आणि शहरात प्रचारसभा, असे चित्र या मतदार संघात निर्माण झाले आहे.

मनसेच्या इंजिनाला ‘सोशल’ डबे

0
0
लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुण्यात नवनिर्माण घडविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दीपक पायगुडे आता ‘फेसबुक पेज’बरोबर मोबाइल ‘अॅप’, वेबसाइटद्वारेही आता प्रचार सुरू करणार आहेत. या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान युगातील तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पक्षाने सुरू केला आहे.

फ्लेक्स ‘आउट’… ‘डिजिटल प्रमोशन’

0
0
फ्लेक्स आणि होर्डिंग लावण्यास परवानगी मिळत नसल्याने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांकडून फ्लेक्सला पर्याय शोधला जात आहे. त्यात, डिजिटल प्रमोशनचा वापर मोठ्या प्रमाणावर होणार असून, नेत्यांचे कटआउट्स, चिन्हे आणि फ्लोट्सना राजकीय पक्षांकडून मागणी मिळत आहे.

राष्ट्रवादीत ‘टिक-टिक’

0
0
काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या शहरातील प्रचारफेऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अधिक सक्रिय असून, काँग्रेससमोर नाराजी मिटविण्याचे आव्हान कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. बुधवारी (२६ मार्च) होणाऱ्या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेमध्ये सर्व नाराजी दूर होण्याची आशा काँग्रेसजनांना आहे.

कलमाडी आज मौन सोडणार?

0
0
एकीकडे कलमाडी यांच्याशी पूर्वीपासूनचे जिव्हाळ्याचे संबंध आणि दुसरीकडे आपल्या भवितव्याची चिंता, अशा दुहेरी कात्रीत खासदार सुरेश कलमाडी यांचे बहुसंख्य समर्थक सापडले आहेत.

कलाकृती बंधनात?

0
0
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात अप्रत्यक्ष प्रचार टाळण्यासाठी निवडणूक आयोग लक्षपूर्वक काम करत आहे.

बंद कॉलेजकडे उत्तरपत्रिका तपासणी

0
0
तीन वर्षांपूर्वीच बंद झालेल्या कॉलेजकडे बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविण्याचा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाचा कारभार उघड झाला आहे.

रायडर सापडले, साखळीचोर पळाले!

0
0
पुण्यातील महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्यांवर डल्ला मारणारे मोटरसायकलस्वार युवक ‘रोजंदारी’वरील ‘रायडर’ असून, त्यांचे सूत्रधार नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील चार इराणी नागरिकांच्या टोळीतील आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images