Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कलमाडींचे विरोधास्त्र म्यान

0
0
खासदार सुरेश कलमाडी यांची काँग्रेस हायकमांडवरील नाराजी अखेर निवळली असून, मंगळवारी त्यांनी पुण्याचे उमेदवार विश्वजित कदम यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. सर्व पर्याय खुले असल्याचा दावा चार दिवसांपूर्वी करणाऱ्या कलमाडींना शेवटी समर्थकांच्या आग्रहापुढे विरोधाचे अस्त्र म्यान करावे लागल्याची चर्चा आहे.

कदमांनी साधला ‘मुहूर्त’

0
0
मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील सर्व उमेदवारांचे अर्ज एकत्र भरण्याची घोषणा करूनही काँग्रेस आघाडीचे उमेदवार विश्वजित कदम यांनी अर्ज भरण्यासाठी मंगळवारचा ‘मुहूर्त’ साधला!

डी. एस. कुलकर्णी उतरणार रिंगणात?

0
0
पुण्यात लोकसभेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी ब्राह्मण समाजास डावलल्याची भावना व्यक्त होत असतानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सोशल साइट्स होणार मालामाल

0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केल्या जाणाऱ्या डिजिटल प्रचारातील प्रचंड आर्थिक उलाढालीमुळे गुगल, फेसबुक, ट्विटर या परदेशी कंपन्या मालामाल होणार आहे.

नोकरी करताना करा ‘इंजिनीअरिंग’

0
0
नोकरी करता करता इंजिनीअरिंग किंवा अन्य तंत्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करण्याची इच्छा असेल, तर ती आता पूर्ण होऊ शकेल. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) ‘ब्लेंडेड लर्निंग मोड’द्वारे ‘वर्किंग प्रोफेशनल्स’ना ही संधी उपलब्ध करून दिली आहे.

कोण किती ‘माल’दार?

0
0
पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम पुण्यातील सर्वांत धनाढ्य उमेदवार असून, त्यांच्याकडे ८७ कोटी ४९ लाख रुपयांची मालमत्ता आहे.

पुण्यात १९ उमेदवारी अर्ज दाखल

0
0
पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम, भाजपचे अनिल शिरोळे, मनसेचे दीपक पायगुडे आणि आम आदमी पक्षाचे सुभाष वारे यांच्यासह १९ इच्छुकांनी मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले.

नाराज ब्राह्मण ‘नोटा’ वापरणार

0
0
सर्वच राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजास प्रातिनिधीत्व डावलल्यामुळे ब्राह्मण समाजाने पुण्यात नकाराधिकाराचा (नोटा) वापर करावा, असे आवाहन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने मंगळवारी करण्यात आले आहे.

गडकरी कौटुंबिक मित्रचः सौ.ठाकरे

0
0
‘भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी आमच्या कुटुंबाचे पूर्वीपासून मित्र आहेत; तुम्हाला ते फक्त निवडणुकीच्या काळात दिसतात,’ अशी टिपण्णी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला यांनी मंगळवारी केली. ‘पुण्यातून मनसेच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे,’ असे त्या म्हणाल्या.

MBBS डॉक्टर करणार सोनोग्राफी

0
0
रेडिओलॉजी, स्त्रीरोग तज्ज्ञांना सोनोग्राफी करण्याची मुभा मिळाल्यानंतर केंद्र सरकारच्या सेंट्रल सुपरवायझरी बोर्डाच्या शिफारशीनुसार ‘एमबीबीएस’ची पदवी घेतलेल्या डॉक्टरांनाही आता सोनोग्राफी करता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आघाडीच्या सभेचा ‘फ्लॉप शो’

0
0
मोठा गाजावाजा करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ‌आघाडीची पहिलीच जाहीर सभा ‘फ्लॉप’ ठरली.

निनादले बासरीचे मोहमयी सूर

0
0
बासरीचे मोहवून टाकणारे स्वर सभागृहात घुमले आणि रसिकांना स्वरमयी अनुभूती मिळाली. बासरीवादक विवेक सोनार यांचे वादन आणि त्याला समीर सूर्यवंशी यांची उत्तम तबलासाथ मिळाल्यानं हा कार्यक्रम रंगतदार झाला.

युवा जल्लोषाची संगीतरजनी

0
0
‘लल्लाटी भंडार’, ‘निगाहें मिलाने को जी चाहता है’, ‘दिल मेरा मुफ्त का’ अशी गाणी, जोडीला भूपाळी, कव्वाली, गझल, लावणी आणि बहारदार नृत्यांनी सजलेला ‘संगीत रजनी’ हा कार्यक्रम नुकताच भरत नाट्य मंदिर इथं झाला.

उलगडलं पश्चिम घाटाचं सौंदर्य

0
0
सह्याद्रीच्या कुशीत फुलणारा निसर्ग, पर्यावरणाच्या साखळीत महत्त्वाच्या भूमिका बजावणाऱ्या वनस्पती, या वनस्पतींनी समृद्ध झालेल्या पश्चिम घाटाचं हिरवं सौंदर्य नुकतंच निसर्गप्रेमींना सह्याद्री महोत्सवात उलगडलं.

एकत्रित आस्वाद मराठी-संस्कृत नाटकाचा

0
0
पुण्यातील संस्कृतप्रेमींना आणि नाट्यरसिकांना संस्कृत आणि मराठी नाटक एकत्रित पाहाण्याची संधी लवकरच मिळणार आहे.

अंतर्मुख करणारं ‘द बॅलन्सिंग अॅक्ट’

0
0
हिंसा...भेदभाव...ओरबाडण्याची वृत्ती...अप्पलपोटेपणा...या सगळ्या वृत्तींमुळे आपल्या जीवनातील हास्य, निखळ आनंद, सहकार्याची वृत्ती, एकमेकांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा स्वभाव कुठल्या कुठे मागे पडला आहे.

सिंधुदुर्ग उजळणार

0
0
गेल्या चारशे वर्षांहून अधिक काळ समुद्राच्या लाटांचे तडाखे आणि जोरदार वाऱ्यांशी सामना करत दिमाखानं उभा असलेला सिंधुदुर्ग किल्ला विविधरंगी दिव्यांनी उजळणार आहे.

मध्यंतर हवं एमआरपीतचं !

0
0
थिएटरमध्ये इंटरव्हलच्या दरम्यान आपण जी काही खादाडी करतो, त्यासाठी एमआरपीपेक्षा जास्त किंमत मोजावी लागल्याचा अनुभव आपल्याला येतो. त्याविरोधात ‘कन्झ्युमर प्रोटेक्शन कमिटी’नं आवाज उठवला आहे. पैसे घ्या; पण एमआरपीनंच, असं निवेदन त्यांनी पुण्यातल्या ४७ थिएटर्सना दिलं आहे.

बेकायदा वृक्षतोड : तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा

0
0
बेकायदा वृक्षतोड केल्याप्रकरणी सोमवार पेठेतील दशनाम गोसावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना एक महिना तुरुंगवास आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा पालिका कोर्टाने सुनावली आहे. कोणत्याही परवानगीविना वृक्षतोड करणाऱ्यांना या निकालामुळे आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

त्रुटी दूर झाल्याशिवाय ऑनलाइन परीक्षा नाहीत

0
0
इंजिनीअरिंगच्या ऑनलाइन परीक्षा पद्धतीमधील विविध त्रुटी दूर केल्याशिवाय ही पद्धत पुढील वर्गांसाठी कोणत्याही परिस्थितीत लागू केली जाणार नसल्याचे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी बुधवारी जाहीर केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images