Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विद्यार्थी वाहतूक करणारी व्हॅन उलटली

$
0
0
शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी ओम्नी व्हॅन सिग्नल तोडल्यामुळे शुक्रवारी सकाळी बी. टी. कवडे रोड चौकात ट्रकला धडकली. या अपघातात व्हॅनमधील १४ पैकी चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

ट्रेलरचा चालक ‘अल्पवयीन’?

$
0
0
नऱ्हे येथील अपघातात तिघांचा बळी घेणारा २१ वर्षीय चालक २५ टनी ट्रेलर कसा काय चालवत होता, की या अपघाताला तेथील रस्त्याची दुरव्यस्था कारणीभूत आहे का, अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यास दत्तवाडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

कॅनॉलमध्ये बुडून मुलाचा मृत्यू

$
0
0
गाडीतळ येथे कॅनॉलमध्ये रंग धुण्याकरिता गेलेल्या राष्ट्रपाल गणेश सोनकांबळे (१५, रा. तुपेनगर, माळवाडी, हडपसर) याचा तोल जाऊन तो पाण्यात बुडाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी चार वाजता घडली.

वारज्यातील पोलिस अधिकाऱ्याची बदली

$
0
0
नऱ्हे येथे ट्रेलरच्या अपघातात तिघांचा बळी गेल्यानंतर आयुक्त सतीश माथुर यांनी शुक्रवारी कात्रज-देहूरोड बायपासवर धाव घेतली. केवळ नवले पूलच नव्हे, तर या मार्गावरील दुरवस्थेचा आढावा घेत उपस्थित अधिकाऱ्यांना खडसावले.

भाई, तुम्ही किंगमेकर व्हा... अपक्ष लढू नका

$
0
0
भाई, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत अपक्ष वा अन्य पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवू नका. पक्षाच्या पाठिशी राहून ‘किंगमेकर’ व्हा... खासदार सुरेश कलमाडी यांच्या समर्थकांनी अशा शब्दांत त्यांना अपक्ष लढण्यापासून परावृत्त करण्याचा शुक्रवारी प्रयत्न केला.

कलमाडी म्हणतात… मला सर्व पर्याय खुले

$
0
0
समर्थकांशी चर्चा करण्याचा ‘मार्ग’ निवडत, इतर पक्षांकडून निवडणूक लढविण्याची ‘दिशा’ दाखवत, निलंबन रद्द झालेच पाहिजे, ही मागणी लावून धरत आगामी काळातील ‘रोडमॅप’बाबत कोणतेही संकेत कलमाडी यांनी शुक्रवारी दिले नाहीत.

मी नाही, म्हणून राष्ट्रवादी जोरात

$
0
0
पुण्याचे विद्यमान खासदार सुरेश कलमाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते अजून कायम असल्याचे शुक्रवारी समोर आले. ‘मी पुण्यातून उमेदवार नाही, म्हणूनच राष्ट्रवादीला जोर चढला आहे’, अशा शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले.

अखेर ‘पौर्णिमे’ची ‘अमावास्या’

$
0
0
भीक मागण्यासाठी पुण्यात दाखल झालेल्या पौर्णिमा हत्तिणीने अनेकांना लळा लावला. आर्यन शाळेतील मुलांसाठी तर ती एक मैत्रीणच बनली होती. पुण्याबाहेर जाण्यासाठी कोर्टाची परवानगी कधी मिळेल, याची वाट बघत तब्बल सात वर्षे रस्त्यावर फिरणाऱ्या त्या हत्तिणीची अखेर निसर्गानेच सुटका केली.

काँग्रेसने माझ्यावर अन्याय केला

$
0
0
‘माजी रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांच्यासह लालूप्रसाद यादव यांनाही काँग्रेसने पुन्हा जवळ केले आहे. मात्र, माझ्यावर अन्याय केला आहे’, अशा शब्दांत खासदार सुरेश कलमाडी यांनी काँग्रेसविषयीची नाराजी शुक्रवारी व्यक्त केली.

काँग्रेस भवनमध्ये… ‘भाईगिरी’!

$
0
0
खासदार सुरेश कलमाडी यांना काँग्रेस पक्षाने निलंबित केल्याने कलमाडी यांचे कट्टर विरोधक असलेले अजित‘दादा’ पवार आता जोरात सक्रिय झाल्याचे चित्र गुरुवारी काँग्रेस भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात पहायला मिळाले.

काँग्रेस-राष्ट्रवादीचे ‘मनोमिलन’

$
0
0
जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांमध्ये काय घडलं हे काढत बसू नका. ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ असे समजून आगामी लोकसभा निवडणुकांना सामोरे जात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यर्त्यांनी पुणे शहरासह जिल्ह्यातील आघाडीच्या चारही‌ उमेदवारांना विजयी करून दिल्लीला पाठवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी कार्यकर्त्यांना केले.

‘स्कूल व्हॅन’वर शहरभर कारवाई

$
0
0
सोलापूर रोडवरील बी. टी. कवडे चौकात ‘स्कूल व्हॅन’च्या चालक-मालकाच्या निष्काळजीपणामुळे १४ विद्यार्थ्यांना ​शुक्रवारी अपघाताला सामोरे जावे लागले.

सर्व पर्याय खुलेः कलमाडी

$
0
0
समर्थकांशी चर्चा करण्याचा 'मार्ग' निवडत, इतर पक्षांकडून निवडणूक लढविण्याची 'दिशा' दाखवत, निलंबन रद्द झालेच पाहिजे, ही मागणी लावून धरत आगामी काळातील 'रोडमॅप'बाबत कोणतेही संकेत कलमाडी यांनी शुक्रवारी दिले नाहीत.

अपहरणप्रकरणी एकाला अटक

$
0
0
सेनापती बापट रोडवर राहत असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करुन एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

नोकरीचे आमिष : विद्यार्थ्यांची फसवणूक

$
0
0
सॉफ्टवेअर डेव्हलपर ट्रेनी म्हणून नोकरी देण्याच्या आमिषाने इप्टा टेक्नोलॉजीज या कंपनीने सुमारे ४५० विद्यार्थ्यांची तब्बल ९० लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

बिल्डरला खोट्या गुन्ह्यात गोवले

$
0
0
रक्तचंदनाच्या खोट्या गुन्ह्यात बांधकाम व्यवसायिक राजेश पोखरकर यांना अडकवून त्यांच्याकडून ५० लाख रुपयांची खंडणी वसूल करणारे सहा वनाधिकारी व दहा कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत.

हुतात्म्यांविषयीच्या चुकांचा ‘बालभारती’ला विसरच!

$
0
0
शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मरणार्थ देशात आज ‘हुतात्मा दिन’ साजरा होत असताना, राजगुरू यांच्या गावकऱ्यांना मात्र या हुतात्म्यांच्या बलिदानाची खरी आणि वस्तुनिष्ठ माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी ‘बालभारती’शी झगडावे लागत आहे.

‘टीबी’च्या पेशंटची सरकारदफ्तरी नोंद वाढेना

$
0
0
राज्यातील टीबीच्या (क्षयरोग) पेशंटची संख्या काही वर्षांच्या तुलनेत दरवर्षी एक हजारने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१३ वर्षी राज्यात एक लाख ३७ हजार ३२० एवढ्या पेशंटची नोंद झाली असली तरी प्रत्यक्षात आणखी एक लाखांहून अधिक पेशंटची अद्याप सरकारी दफ्तरी नोंदच नसल्याची माहिती पुढे आली आहे.

सुपारी देऊन पतीचा खून

$
0
0
विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने सहा लाख रुपयांची सुपारी देऊन पतीचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार बिबवेवाडीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी संबंधित प्रियकरासह पाचजणांना अटक केली आहे.

सोमवारी परीक्षा; शनिवारी बैठकीत बदल

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या बी. एस्सी. कम्प्युटर सायन्सच्या उद्यापासून (२४ मार्च) सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी काही कॉलेजांची बैठक व्यवस्था विद्यापीठाने शनिवारी अचानक बदलली. त्या विषयी शुक्रवारी काढण्यात आलेले अधिकृत परिपत्रक विद्यापीठाने शनिवारी विद्यापीठाच्या वेबसाइटवरून कॉलेजांपर्यंत पोहोचविले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images