Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अनधिकृत ‘क्रॉसिंग’ बंद

$
0
0
कात्रज - देहूरोड बायपासवरील नऱ्हे येथील नवले पुलाजवळ झालेल्या अपघाताच्या ठिकाणासह मातृशिल्प येथील दोन अनधिकृत क्रॉसिंग (पंक्चर) बंद करून तेथे दुभाजक उभारण्याची सूचना शहर वाहतूक पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह रिलायन्स इन्फ्राच्या ठेकेदारांना केली.

कोण बाहेरचा, कोण आतला हा वाद निरर्थक

$
0
0
‘मोहन धारिया, एस. एम. जोशी यांच्यापासून सुरेश कलमाडी यांच्यापर्यंत पुण्याबाहेरचे अनेक जण पुण्याचे खासदार झाले. त्याप्रमाणेच, विश्वजित कदम यांना कोणी पुण्याबाहेरचे म्हणत असेल, तर ही संकुचित वृत्ती पुणेकर स्वीकारणार नाहीत,’ अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार कदम यांची पाठराखण केली.

‘अजूनही हवा वंशाचा दिवा…’

$
0
0
महाराष्ट्र प्रगतीपथावर असताना ‘वंशाचा दिवा’ हवा हा विचार अद्यापही समाजातून गेलेला नाही. मुलगा आणि मुलगी यांच्यात अजूनही भेद केला जातो. त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये लिंगभेदाचे अस्तित्त्वही कायम असल्याचा निष्कर्ष कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ ओटावामधील प्रा. डॉ. कॅरोल व्लासॉफ यांनी काढला आहे.

‘नॅक’ परीक्षेतील बनवाबनवी उघड!

$
0
0
‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडिटेशन कौन्सिल’कडून (नॅक) चांगल्या ग्रेड्स मिळविण्यासाठी देशभरातील अनेक कॉलेजांकडून खोट्या नोंदींची मदत घेतली जात आहे. त्यासाठी वेळप्रसंगी ‘प्रोफेशनल कन्सल्टन्सीं’च्या मदतीने अहवाल तयार केले जात आहेत.

मनसेचे प्रचार बिगुल पुण्यातून

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यातील लोकसभा उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर येत्या ३१ मार्चला पुण्यातून फोडणार आहेत. प्रचाराच्या पहिल्या सभेत ‘राज’बाण कोणाला घायाळ करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार व्हा

$
0
0
‘स्वतंत्र निवडणूक लढवून काँग्रेसच्या पराभवाचे धनी होण्यापेक्षा वडिलकीच्या नात्याने पुण्यात पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाचे शिल्पकार व्हा,’ असा सल्ला खासदार सुरेश कलमाडी यांच्या अनेक समर्थकांनी त्यांना दिल्याचे समजते.

नरेंद्र मोदींकडे नैतिकता नाही

$
0
0
‘गुजरातमध्ये खासदारासह २० जणांना जाळून मारण्यासारखी क्रूर घटना घडते. तरीही, मुख्यमंत्री सांत्वनाला जात नाहीत. पीडितांना भेटून त्यांचे दुःख हलके करण्याची नैतिकताही नसलेल्या व्यक्तीच्या हाती देशाचा कारभार देणार का,’ असा सवाल उपस्थित करून केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर शनिवारी तोफ डागली.

वास्तूंमधून पुन्हा भेटले राजगुरू

$
0
0
हुतात्मा राजगुरू यांचं पुणे शहराशी असणारं निकटचं नातं, त्यांच्या आठवणींची साक्ष देणाऱ्या वास्तूंची रोमांचक भेट आज पुणेकरांनी अनुभवली.

‘विश्वास’च्या वर्धापनदिनी घेतला कवितेचा शोध

$
0
0
‘या कुंदे’, ‘मना सज्जना’, ‘एक तुतारी द्या मज आणुनी’, ‘देवा तुझे किती सुंदर आकाश’, ‘पिवळे तांबूस ऊन कोवळे’, ‘खबरदार जर टाच मारूनी’, ‘वाटे सानुली मंद झुळूक मी व्हावे’, ‘आजीचं घड्याळ’, ‘ऋतू हिरवा’, ‘किती दिसते ही कपिला गोजिरवाणी’, ‘घाल घाल पिंगा वारा माझ्या परसात...’

रंगीबेरंगी बंजारा फॅशन

$
0
0
तथाकथित फॅशनेबल वर्गाला फारशा परिचित नसणाऱ्या कपड्यांची फॅशन ल मेरिडियन हॉटेलमधील रॅम्प वॉकमध्ये नुकतीच सादर झाली. ‘अद्वैत’ नावाचा हा बंजारा संस्कृतीतील कपड्यांचा फॅशन शो होता.

एक झाला सारा रंग

$
0
0
पं. जितेंद्र अभिषेकी यांच्यावर बांधलेल्या झिंझोटी रागावर आधारित काव्यपंक्तीने ‘राधाजी... ए सर्च विदीन!’ या नवीन रचनांच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. ‘राधाजी’ या कार्यक्रमामध्ये हेमंत पेंडसे यांनी स्वरबद्ध केलेल्या रचना आणि राधाजी या विषयाला अनुसरून काही गीतांचा समावेश करण्यात आला होता.

जर्मन सिनेमे पाहाण्याची संधी

$
0
0
ऑस्कर मॅट्झेराथ स्वतःच्या तिसऱ्या वाढदिवशी असं ठरवतो, की मला मोठंच व्हायचं नाही. या हट्टाने सगळीकडे फिरताना त्याच्या हातात फक्त एक लहान ड्रम असतो. हा ड्रमच नाझींना दर्शवायच्या विरोधाचं प्रतिक बनून जातो.

नम्रताचा पर्फेक्ट ‘अॅक्ट’!

$
0
0
नृत्य आणि कराटेचं प्रशिक्षण घेत असतानाच नम्रता मुंदडा ‘मटा’च्या ‘श्रावणक्वीन’ स्पर्धेत सहभागी झाली. तिचा अभिनयाचा इरादा पक्का झाला, तो इथेच. ती येत्या बुधवारच्या ‘अस्मिता’ मालिकेतही दिसणार आहे. तिच्या या प्रवासाविषयी...

कर्नाटकी शैली आणि हार्मोनिअमचे जादुई स्वर

$
0
0
अभोगी रागात सुरू झालेली मैफील, हंसध्वनी रागात मंत्रमुग्ध करणारी गणेशस्तुती आणि नम्रपणे कला सादर करणारा ज्येष्ठ कलावंत अशी मैफील गुरुवारी ‘होरायझन’ या मालिकेत रसिकांनी अनुभवली.

टिळक रोड होतोय... ट्रेंडी!

$
0
0
अगदी ‘हार्ट ऑफ सदाशिव पेठेत’ विसावलेला टिळक रोड आता भलताच ट्रेंडी होतोय. पूर्वी अभ्यासू विद्यार्थांची शाळा-कॉलेज, ग्रंथालये अशा सोज्वळ स्वरुपातील या रोडवर आता धम्माल हँगआऊट्स होताहेत. याच ट्रेंडी टिळक रोडचा फेरफटका...

हवामानामुळे भाजीपाल्याची आवक घटली

$
0
0
उन्हाचा वाढलेला कडाका आणि अवकाळी पाऊस या दोन कारणांमुळे बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याची आवक रोडावली आहे. आले आणि मटारच्या दरामध्ये वाढ झाली असून, काकडी, वांगी, शेवगा यांचे दर दहा ते वीस टक्क्यांनी कमी झाले आहेत.

पर्यावरणविषयक कायदे हितसंबंधांमुळेच कागदावर

$
0
0
‘विकास आणि पर्यावरण संरक्षणाचा समतोल साधण्यासाठी सरकारने उत्तम कायदे तयार केले आहेत. पण स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी सरकार या कायद्याची अंमलबजावणी करण्यास तयार नाही.

महिला सुरक्षेसाठी अॅपचा सहारा

$
0
0
‘कुठलीही महिला संकटात असल्यास मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मदत मिळणे शक्य होऊ शकते. प्रत्येक वेळी पोलिस किंवा सुरक्षा अधिकारी मदतीला उपलब्ध असतेच असे नाही, त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रासह सर्व क्षेत्रातील महिलांनी सुरक्षिततेसाठी मोबाइलवर उपलब्ध असणाऱ्या अॅप्लिकेशनचा वापर करावा,’ असा सूर कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजतर्फे (सीआयआय) आयोजित परिसंवादात व्यक्त झाला.

कर्नाटकच्या आंब्याची आवक थांबली

$
0
0
कर्नाटकमधून पुण्याच्या बाजारपेठेत येणाऱ्या आंब्याची आवक थांबली असली तरी कोकणातून येणाऱ्या आंब्याची आवक कायम आहे. रविवारी मार्केट यार्डमधील बाजारपेठेत अडीच हजार पेट्यांची आवक झाली. त्यामध्ये बहुतेक आंबा हा रत्नागिरी, वेंगुर्ला या भागातील असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कोकणचा राजा रुसून बसतो

$
0
0
वातावरणात सातत्याने झालेल्या बदलांचा फटका कोकणातील आंबा पिकाला बसला आहे. मोहोरावर फुलकिडे, तसेच तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ३० टक्केच उत्पादन हाती लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images