Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कलमाडी रिटर्न्स…!

$
0
0
लोकसभा निवडणुकीबाबतची पुढील दिशा सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरविण्यात येईल, असे संकेत विद्यमान खासदार सुरेश कलमाडी यांनी गुरुवारी दिले. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी त्यांनी आज सायंकाळी चार वाजता ‘कलमाडी हाउस’ येथे बैठक आयोजित केली असून, कलमाडी काय निर्णय घेणार, याकडे काँग्रेसजनांचे डोळे लागून राहिले आहेत.

हक्काच्या शिक्षणाची पायमल्ली

$
0
0
सर्व स्तरांमध्ये शिक्षण पोहोचण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या शिक्षण हक्क कायद्याची देशभरात पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बालहक्क कृती समिती या संस्थेने देशभरातील चौदा लाख शाळांची पाहणी केल्यानंतर देशभरात केवळ सात टक्के शाळांमध्ये शिक्षण हक्काचे निकष पूर्ण होत असल्याचा धक्कादायक निकर्ष आला आहे.

जगतापांची उमेदवारी बारगळली?

$
0
0
गेली दोन वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सातत्याने आवाज उठवून लोकसभेला विरोध करून त्यांची जागा दाखवण्याची भाषा करणारे तालुका युवक काँग्रेस नेते संजय चंदूकाका जगताप यांची स्वतंत्र उमेदवार जाहीर करण्याची घोषणा आता हवेत विरल्यात जमा झाली आहे.

कदमांसाठी दादा आले धावून...

$
0
0
लोकसभा निवडणुकीबाबतची पुढील रणनीती ठरविण्यासाठी शहराचे विद्यमान खासदार सुरेश कलमाडी त्यांच्या समर्थकांची बैठक घेणार असतानाच, काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार धावून येणार आहेत.

अपघाताचे आणखी तीन बळी

$
0
0
कात्रज-देहूरोड बायपासवरील नऱ्हे परिसरात नवले पुलाजवळ गुरुवारी दुपारी एका ट्रेलरने ताबा सुटल्याने नवले ब्रिजच्या सर्व्हिस रोडवरील पाच दुचाकींसह आठ वाहने उडवली. या अपघातात एका प्राध्यापकासह तिघांचा मृत्यू झाला.

फॉर्म भरायला गेला आणि...

$
0
0
परीक्षेचा फॉर्म भरायला गेलेल्या सनी ओदेल (वय २५, रा. नारायण पेठ) कॉलेजमध्ये जाण्याच्या आधीच मृत्यूने गाठले. कात्रज-देहूरोड बायपासवरील नवले पुलाजवळील अपघातात सनीला प्राण गमवावे लागले.

‘खिलाडी’ कोणती चाल खेळणार?

$
0
0
गेली अडीच दशके शहर काँग्रेसचा कारभार हाकणारे खासदार सुरेश कलमाडी पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता आहे. ते स्वतः निवडणुकीत लढणार इथपासून, ते स्वतःचे अस्तित्व दाखवून देऊन काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार, अशा निरनिराळ्या चर्चा पक्षाच्या गोटात सुरू आहेत.

‘द ट्रान्स्परंट ट्रॅप’ निघालं श्रीलंकेला

$
0
0
ध्यास पुणे प्रस्तुत ‘द ट्रान्स्परंट ट्रॅप’ची निवड तिसऱ्या कोलंबो इंटरनॅशनल थिएटर फेस्टिव्हल, श्रीलंका इथं झाली आहे. नॉन व्हर्बल फिजिकल थिएटर स्वरुपातील या नाटकाची संकल्पना, दिग्दर्शन आणि कोरिओग्राफी श्रीकांत भिडे या तरुण कलाकाराची आहे.

सोनसाखळी चोरांचा उच्छाद सुरूच

$
0
0
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फरारी आ​णि वाँटेड आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश येत असतानाच सोनसाखळी चोरांनी शहरात उच्छाद मांडला आहे. दुचाकीवरील सोनसाखळी चोरांनी गुरुवारी सकाळी अवघ्या पावणे दोन तासांत पाच सोनसाखळ्या हिसकावत सोळा तोळे वजनाचे दागिने हिसकावले.

एक चाल हुतात्म्यांच्या स्मृती जागवण्यासाठी

$
0
0
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या क्रांतिकारकांची, त्यांच्या क्रांतिकार्याची आपणा साऱ्यांनाच कल्पना आहे. त्यांच्या कार्यातून आपल्याला प्रेरणाही मिळत आली आहे. २३ मार्च हा या महान क्रांतिकारकांचा बलिदान दिन.

गारपीटग्रस्तांना समुपदेशन, धान्याची मदत द्या

$
0
0
गारपिटीच्या संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी समुपदेशन शिबिरे, हेल्पलाइन, गरीब शेतकरी-शेतमजुरांसाठी मोफत धान्य, जनावरांसाठी चारा छावण्या आणि गारपिटीने पडलेली पिके आणि अन्य कचरा नष्ट करून शेतजमीन साफ करण्यासाठी ‘मनरेगा’तील मजुरांची उपलब्धता करून देणे, अशा विविध शिफारसी राज्याच्या गृहखात्याकडे करण्यात आल्या आहेत.

तमाशाला हिणवू नका

$
0
0
'तमाशा ही आपल्याच ग्रामीण मातीतील कला आहे. त्यामुळे विनोद ग्रामीण ढंगाचा आहे; अश्‍लील नाही. घरातली हंडाभर गरीबी विसरून तमासगीर तुमच्यापुढे हसवायला उभा राहतो.

खुलली विविधरंगी वृक्षसंपदा!

$
0
0
जागतिक पातळीवर नुकत्याच साजऱ्या झालेल्या २१ मार्च या वृक्ष दिनानिमित्त पुणे परिसरात आढळून येणाऱ्या काही दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण वृक्षांचा घेतलेला आढावा...

त्याग केलेल्या मुलीची १४ वर्षांनी भेट

$
0
0
सहा महिन्यांची गर्भवती असताना त्याने तिला सोडून दिले..मुलीचे भवितव्य आणि तिच्या शिक्षणाच्या चिंतेमुळे तिने त्याच्याविरुद्ध चौदा वर्षांनंतर घटस्फोटाचा दावा दाखल केला... दुसऱ्या सुखी संसारात तो रमला होता...मुलींना आता मोफत शिक्षण मिळते...

वाट पाहणेच नागरिकांच्या पदरी

$
0
0
औंध क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग अधिकारी ‘माननीयां’चे ऑफिस आणि घरी जाऊन नागरिकांची कामे करत असल्याने औंध क्षेत्रीय कार्यालयात समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांना वाट पाहावी लागत आहे.

‘LBT’चा महसूल १२०० कोटींवर

$
0
0
स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) माध्यमातून पालिकेला पहिल्या वर्षी ११ महिन्यांतच, गेल्या वर्षी जकातीतून मिळालेल्या उत्पन्नापेक्षा अधिक महसूल प्राप्त झाला आहे. एप्रिल २०१३पासून शुक्रवारपर्यंत पालिकेला ‘एलबीटी’तून सुमारे बाराशे कोटी रुपये मिळाले असून, मार्चअखेरपर्यंत त्यात आणखी थोडी वाढ होण्याचा अंदाज आहे.

‘आरटीर्इ’चे ऑनलाइन प्रवेश सोमवारपासून

$
0
0
येत्या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण हक्क कायद्या (आरटीर्इ) नुसार हआरक्षित २५ टक्के जागांसाठीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया येत्या सोमवारपासून (२४ मार्च) सुरू होणार आहे. २९ मार्चपर्यंत पालकांना त्यांच्या घरून अथवा नजीकच्या मदत केंद्रातून अर्ज करता येणार आहे.

‘धरणक्षेत्र परिसरात झाडे वाचवा’

$
0
0
‘पावसाचे पाणी आणि माती धरून ठेण्याचे काम वनांद्वारे होते. धरणक्षेत्रात चहूबाजूची झाडे नष्ट होऊ लागल्याने माती वाहून धरणात साठते आणि गाळाचे प्रमाण वाढते आहे. म्हणून धरणाजवळील क्षेत्रात झाडे वाचविण्याचे प्रयत्न झाले पाहिजे,’ असे आवाहन प्रसिद्ध वनस्पती तज्ज्ञ श्रीकांत इंगळहळीकर यांनी केले.

बारामतीत ‘बसप’कडून काळुराम चौधरी

$
0
0
बारामती लोकसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षातर्फे (बसप) काळुराम चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारामतीच्या विकासाच्या केवळ गप्पा मारून सज्जन माणसांना कसे फसविण्यात येत आहे, हे या निवडणुकीत मतदारांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

माझी लढाई ‘राष्ट्रवादी’शीच

$
0
0
मावळ लोकसभा मतदारसंघात माझी लढाई राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्याशीच आहे, असा दावा शेकाप-मनसे पुरस्कृत उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी शुक्रवारी (२१ मार्च) केला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images