Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

महादेव जानकरांना हवीय कपबशी

$
0
0
निवडणुकीत उमेदवार कोण आहे, याबरोबरच निवडणूक चिन्ह कोणते आहे, हेदेखील महत्त्वाचे ठरते. कारण चिन्ह लोकांच्या लक्षात राहणारे मिळाले की निम्मे काम फत्ते होते. त्यात ‘कपबशी’ या चिन्हाला राजकारण्याची मागणी फार असते.

सर्व चित्रपटांचे बुकिंग एक एप्रिलपासून ऑनलाईन

$
0
0
शहरातील सर्व मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये येत्या एक एप्रिलपासून ऑनलाईन बुकींग सुरू करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला आहे. तसेच त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, असेही सरकारने या आदेशात म्हटले आहे.

चौथी, सातवी स्कॉलरशिप येत्या रविवारी

$
0
0
राज्यातील चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या रविवारी (२३ मार्च) स्कॉलरशिप परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यभरातील विविध केंद्रांवर सकाळी ११ ते ४ या वेळेत या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.

चर्चेला बोलवा अन्यथा ‘कॅशलेस’ बंद

$
0
0
उपचारासह ऑपरेशनचे दर ठरविण्यासाठी छोट्या मोठ्या सर्व हॉस्पिटलसाठी सोमवारपर्यंत चर्चेला बोलवावे अन्यथा येत्या एक एप्रिलनंतर ‘जिप्सा’ कंपन्यांची ‘कॅशलेस’ सेवा बंद करण्याचा इशारा छोट्या हॉस्पिटलच्या संघटनेने विमा कंपन्यांना दिला आहे.

उच्चशिक्षण संचलनालय ठरले निव्वळ ‘बोलघेवडे

$
0
0
पुरेशी सुसूत्रता नसल्याने आणि कडक धोरणांची अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या अपयशामुळेच राज्यातील विद्यापीठे कुशल मनुष्यबळाच्या नेमणुकीसोबतच बी. एड. अभ्यासक्रमांची गुणवत्ता जोपासण्याच्या पातळीवरही अपयशी ठरत असल्याची टीका राज्याचे उच्चशिक्षण संचालक डॉ. पी. आर. गायकवाड यांनी केली.

सामान्यांचा हवा निर्णयप्रक्रियेत सहभाग

$
0
0
‘विकास आणि पर्यावरण संरक्षणाचा समतोल साधण्यासाठी सरकारने उत्तम कायदे तयार केले आहेत. पण स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी सरकार या कायद्याची अंमलबजावणी करण्यास तयार नाही. देशाचा विकास करायचा असेल, तर प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेत तळागाळातील लोकांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे,’ असे मत ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.

बनावट नोटांप्रकरणी दोघांना सक्तमजुरी

$
0
0
बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या दोघांना पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. बी. कुलकर्णी यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

भटकळला भेटण्याची वकिलांना मुभा

$
0
0
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने अटक केलेला आरोपी यासिन भटकळला भेटण्याची परवानगी देण्यात यावी, म्हणून त्याच्या वकिलांनी कोर्टात दाखल करण्यात आलेला अर्ज मंजूर करण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश एस. डी. दरणे यांच्या कोर्टाने हा अर्ज मंजूर केला आहे.

बलात्काराच्या गुन्ह्यातून वगळण्याची महिलेची मागणी

$
0
0
चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातून वगळण्यात यावे, म्हणून एका महिला आरोपीने महिला विशेष कोर्टात अर्ज केला आहे.

महिला सुरक्षेसाठी मोबाईल अॅपचा सहारा

$
0
0
‘कुठलीही महिला संकटात असल्यास मोबाइल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून मदत मिळणे शक्य होऊ शकते. प्रत्येक वेळी पोलिस किंवा सुरक्षा अधिकारी मदतीला उपलब्ध असतेच असे नाही, त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रासह सर्व क्षेत्रातील महिलांनी सुरक्षिततेसाठी मोबाइलवर उपलब्ध असणाऱ्या अॅप्लिकेशनचा वापर करावा,’ असा सूर कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजतर्फे (सीआयआय) आयोजित परिसंवादात व्यक्त झाला.

‘क्रोसिन’ची दुपटीच्या दरात पुण्यातही विक्री

$
0
0
डोकेदुखी, अंगदुखीसाठी ‘क्रोसिन अॅडव्हान्स’ नावाने विकल्या जाणाऱ्या ‘पॅरासिटेमॉल’च्या गोळीची ९४ पैसे एवढी किंमत असताना प्रत्यक्षात दोन रुपये या जादा दराने विक्री केल्याची माहिती पुढे आली आहे.

कात्रजची दूध दरवाढ आचारसंहितेच्या कचाट्यात

$
0
0
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज) शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये केलेली दोन रुपयांची वाढ आचारसंहितेच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. कात्रजने निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना शेतकऱ्यांना दिलेली ही दरवाढ प्रलोभन होऊ शकते का, याची तपासणी केली जाणार असल्याचे आचारसंहिता कक्षाचे प्रमुख सुरेश जाधव यांनी स्पष्ट केले.

नागोरी, खंडेलवालला जामीन नाकारला

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणातील अटक आरोपी मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. ए. काझी यांच्या कोर्टाने हा अर्ज फेटाळला.

त्याग केलेल्या मुलीची झाली १४ वर्षांनी भेट

$
0
0
सहा महिन्यांची गर्भवती असताना त्याने तिला सोडून दिले..मुलीचे भवितव्य आणि तिच्या शिक्षणाच्या चिंतेमुळे तिने त्याच्याविरुद्ध चौदा वर्षांनंतर घटस्फोटाचा दावा दाखल केला... दुसऱ्या सुखी संसारात तो रमला होता...मुलींना आता मोफत शिक्षण मिळते...घटस्फोट देताना मुलीच्या भवितव्यासाठी ५० हजार रुपये पण खूप झाले या मुद्द्यावर तो अडला होता..

शिवसेना कार्यकर्त्यांचे राजीनामे

$
0
0
काँग्रेसमधील ठराविक पदाधिकारी शिवसेनेत आल्यानंतर त्यांना पदांची बक्षिसी दिली जाते. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केला जातो, या निषेधार्थ शिवसेनेच्या ४५ कार्यकर्त्यांनी पदांचे राजीनामे दिले आहेत. यामध्ये दोन माजी नगरसेवक, एक उपशहरप्रमुख आणि आठ विभाग प्रमुखांचा समावेश आहे.

विकासाच्या प्रश्नांवरच लढणार

$
0
0
पुण्यातून काँग्रेसने विश्वजित कदम यांच्या रूपाने ‘युवा चेहरा’ लोकसभेच्या रिंगणात उतरविला आहे. काँग्रेसमधील उमेदवारीच्या चुरशीच्या स्पर्धेमध्ये कदम यांनी बाजी मारली असली, तरी त्यांच्यासमोर भाजपसह मनसे आणि ‘आप’चे ही आव्हान असणार आहे. त्या अनुशांगाने त्यांच्याशी झालेली बातचित...

काहीही करा, पण मारेकरी शोधा

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास हा कोर्टाच्या देखरेखीखाली व्हावा, यासाठी हायकोर्टाला विनंती करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांनीच या हत्येचा तपास लावावा. तपासासाठी प्रसंगी विशेष पथक स्थापन करावे अथवा इतर यंत्रणांची मदत घ्यावी, जे काही करायचे ते करा, मात्र तपास लावा, अशा संतप्त भावना डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केल्या.

‘मिलियन डॉलर क्वेश्चन’चे उत्तर काय असणार?

$
0
0
प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात झाली, तरी भाजपमध्ये अजूनही उमेदवारीच्या चर्चांचे गुऱ्हाळ अजूनही सुरूच आहे. पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्याकडे सर्वाधिकार दिल्यानंतरही गुरुवारी उमेदवारीचा तिढा सुटू शकलेला नाही. त्यामुळे सर्वच इच्छुक मंडळी आणि कार्यकर्ते गॅसवर आहेत.

साडेपाच कोटींच्या ‘खड्ड्या’नंतर पालिकेला आली अक्कल

$
0
0
सातारा रोडवरील पुष्पमंगल चौकात उभारण्यात येत असलेल्या भुयारी मार्गात सुधारणा करण्याची बुद्धी महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना आली आहे. साडेपाच कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात येणारा भुयारी मार्ग केवळ पादचाऱ्यांसाठी योग्य नसल्याने या ठिकाणाहून टू ‌व्हिलर आणि थ्री व्हिलरसाठी व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचा खुलासा पालिका आयुक्त विकास देशमुख यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत केला.

शालाबाह्य मुलांसाठी आता निवासी शाळा?

$
0
0
शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेण्यासाठी राज्यभरात सर्व शहरांमधून निवासी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण खात्याच्या विचाराधीन आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images