Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘राष्ट्रवादी’ची विश्वजितना तंबी

$
0
0
‘सासवडमधील तुमचे उद्योग थांबले नाहीत, तर पुण्यामध्ये आमच्या मदतीची अपेक्षा धरू नका,’ अशा तंबीनेच पुण्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वयाची पहिली बैठक बुधवारी गाजली. सासवडमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवायांचा संदर्भ या तंबीला आहे.

मुंडेहट्टामुळे लटकली उमेदवारी

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचा हट्ट आणि त्याला नितीन गडकरी यांचा तितकाच तीव्र विरोध यांमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी लटकल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.

दोन दिवसीय 'यूथ फिएस्टा'

$
0
0
मिटकॉन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि सार अॅड्स यांच्यातर्फे कॉलेजियन्ससाठी 'यूथ फिएस्टा २०१४'चं आयोजन करण्यात आलं आहे. बालेवाडी इथल्या मिटकॉन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या आवारात २१ आणि २२ मार्चला हा धमाल फिएस्टा होणार आहे.

'पर्यायी जगा'विषयीचा चित्रपट महोत्सव

$
0
0
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या ८३ व्या शहीद दिनाच्या स्मरणार्थ लोकायततर्फे 'पर्यायी जग शक्य आहे' नावाचा चित्रपट महोत्सव आयोजिण्यात आला आहे. शनिवारी (दि. २२) संध्याकाळी सहा वाजता लॉ कॉलेज रस्त्यावरील लोकायत हॉल इथं होणारा हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे.

केशववेणूची पंचतारांकीत साधना

$
0
0
जे. डब्ल्यू. मॅरिएट या शहरातल्या प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलची लॉबी. देशी-परदेशी पाहुण्यांची 'चेकइन' आणि 'चेकआउट'ची गडबड, अदबीनं ग्राहकांशी संवाद साधण्यात गर्क असणारे कर्मचारी... या सगळ्यात कानांना सुखावणारे बासरीचे स्वर...

पुण्याजवळ अपघात ४ ठार

$
0
0
पुण्याजवळ वडगाव धायरी येथील बायपास पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले.

संगीत मंदारमालाची पन्नाशी

$
0
0
‘जयशंकरा गंगाधरा’, ‘सोहम् हर डमरू बाजे’ अशा सदाबहार नाट्यपदांमुळे संगीत रंगभूमीवर ‘माइलस्टोन नाटक’ ठरलेले ‘संगीत मंदारमाला’ येत्या रविवारी पन्नाशीचा टप्पा गाठत आहे.

जत्रा फेस्टिव्हल!

$
0
0
जत्रा हा गावोगावचा मोठा आनंदाचा ठेवा. वर्षानुवर्ष ग्रामदेवतेच्या जत्रेला गर्दी करणारे, मनोरंजन करणारे आणि जत्रेच्या ओढीनं शहरातून गावाकडे धावणारे गावकरी आहेत.

सेवाकर चुकविल्याप्रकरणी संचालकाला कोठडी

$
0
0
ग्राहकांकडून गोळा केलेला पस्तीस कोटींचा सेवाकर न भरल्याप्रकरणी यू. बी. इंजिनीअरिंग लिमिटेडच्या कार्यकारी संचालकाला केंद्रीय उत्पादन आणि सेवा शुल्क विभागाने अटक केली आहे.

बीआरटी मार्ग तात्पुरता बंद करा

$
0
0
दोन ठिकाणी सुरू असणारी उड्डाणपुलांची कामे आणि एका ठिकाणी सुरू असणारे भुयारी मार्गाचे काम यामुळे पुणे-सातारा रस्त्यावर वाहन चालवणे धोकादायक बनत चालले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील बीआरटी मार्ग तात्पुरता बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

वनविभागाचे आता… जागते रहो!

$
0
0
वृक्षसंवर्धन आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून वन विभागाने अनेक सकारात्मक पावले उचलली आहेत. वनमजुरही टेकड्यांवर सातत्याने गस्त घालत आहेत, तरीदेखील टेकड्यांवर गैरप्रकार होत असतील तर यापुढे संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, अशा शब्दांत पुणे विभागाचे उपवनसंरक्षक राजेंद्र कदम यांनी निसर्गप्रेमींना आश्वासन दिले आहे.

बापूसाहेब लोणकर यांना पंतप्रधान जीवन रक्षा पदक

$
0
0
बस चालक संतोष माने निष्पापांना उडवत चालला असताना त्याचा पाठलाग करून थांबविण्याचा प्रयत्न करणारे पोलिस कर्मचारी बापूसाहेब लोणकर यांना ‘पंतप्रधान जीवन रक्षा पदका’ने सन्मानित करण्यात आले आहे.

मराठी भाषा भवन साकारण्याचा मार्ग मोकळा

$
0
0
मराठी भाषा भवन साकारण्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील रंगभवनची जागा मराठी भाषा विभागाला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, सांस्कृतिक कार्य विभागाच्या अखत्यारित असलेली ही जागा महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यांतर्गत हस्तांतरित करण्याच्या सरकारी अध्यादेशामुळे मराठी भाषा भवन उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कामांच्या ‘अतिक्रमणा’मुळे बीआरटी पुन्हा जीवघेणी

$
0
0
स्वारगेट चौक आणि शंकरमहाराज मठाजवळ सुरू असणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामामुळे या रस्त्यावरील ‘बीआरटी’चा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे उर्वरित रस्त्यावर वाढलेल्या वाहतुकीच्या ताणामुळे ट्रॅफिक जॅम आणि अपघातांची समस्या वाहनचालकांसमोर उभी आहे.

बारामतीत मनसे इच्छुक नाही?

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे), जनसुराज्य पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या तिसऱ्या आघाडीनंतरही बारामती लोकसभा मतदार संघातून मनसे निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे राजकीय गोटातून सांगण्यात आले.

जगतापांचा आमदारकीचा राजीनामा

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा गुरुवारी (२० मार्च) दिला आहे. त्यामागील कारणमीमांसा शुक्रवारी (२१ मार्च) स्पष्ट करू, असे जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

मतदार हेल्पलाइन...ऑफलाइन आणि ऑनलाइन!

$
0
0
मतदार यादीतील नाव शोधण्यापासून मतदानविषयक माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेली मतदार हेल्पलाइन आज दिवसभर ‘ऑफलाइन’ राहिली. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर मात्र निवडणूक यंत्रणेने हालचाली करून ही हेल्पलाइन सायंकाळी ‘ऑनलाइन’ केली.

‘ट्रॅक रेकॉर्ड’ घेणार विद्यार्थ्यींची माहिती

$
0
0
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे परिपूर्ण ‘ट्रॅक रेकॉर्ड’ तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने लवकरच ‘स्टुडंट्स मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टिम’ लागू करण्यात येणार आहे.

राज्यभरात उन्हाचा कडाका वाढला

$
0
0
ऐन उन्हाळ्याच्या दिवसातल्या गारपिटीनंतर आता राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. गुरुवारी महाबळेश्वर वगळता संपूर्ण पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान ३५ अंशांच्या वर नोंदले गेले. पुण्यातही तापमानात वाढ होऊन ३७.३ अंश सेल्सियस इतके कमाल तापमान नोंदले गेले.

तत्काळ पासपोर्टसाठी नागरिकांचा विशेष मेळा

$
0
0
तत्काळ पासपोर्टची अपॉइंटमेंट मिळण्यासाठी नागरिकांच्या अडचणींची दखल घेऊन पुणे पासपोर्ट कार्यालयाने येत्या २२ आणि २९ मार्चला खास तत्काळच्या अर्जदारांसाठी ‘पासपोर्ट मेळा’ आयोजित केला आहे. यामुळे दोन मेळ्यामध्ये तब्बल दोन हजार अर्जदारांना अॅपाटइंटमेट घेण्याची संधी मिळणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images