Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हिमालयाचं अतरंगी विश्व

$
0
0
भारताचा अभिमानदंड असणारा हिमालय आणि हिमालयाच्या कुशीत वसणाऱ्या रंगीबेरंगी निसर्गापासून मानवी जीवनाचे विविध कंगोरे टिपणारं अतरंगी विश्व बुधवारी पुणेकरांसमोर खुलं झालं.

तरुणांनी घेतला शिष्यवृत्तीचा वसा

$
0
0
शिष्यवृत्ती परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांना सोप्या युक्त्यांनी गणित शिकवण्याचा प्रयोग पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांची गणिताची नावड, प्रॅक्टिकलवर नसलेला भर आणि परीक्षेची भीती यांसारखी काही निरीक्षणं या विद्यार्थ्यांनी केली.

सिंहगड रोडवर चार फ्लॅट फोडले

$
0
0
सिंहगड रोड, सनसिटी येथे वेगवेगळ्या सोसायट्यांतील चार फ्लॅट फोडून सुमारे सव्वातीन लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. या सर्व घरफोड्या मंगळवारी दुपारी ११ ते पावणेचार या दरम्यान घडल्या आहेत.

गांधीभवनाजवळ सोनसाखळी हिसकावली

$
0
0
कोथरूड येथील आनंदवन सोसायटीत विद्या वसंत काळपांडे (६०, रा. गांधीभवन, कोथरूड) यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला.

इंटरनेटवरून सेक्स रॅकेट

$
0
0
इंटरनेटवरील ‘एस्कॉर्ट’च्या वेबसाइटवरून वेश्याव्यवसाय करणाऱ्या एका एजंटला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली तर दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

पुणे-मनमाड रेल्वे चार वर्षांनंतरही तोट्यात

$
0
0
प्रवाशांकडून कायम मिळत असणाऱ्या कमी प्रतिसादामुळे चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली पुणे-मनमाड एक्स्प्रेस अद्यापही तोट्यात धावत असल्याचे समोर आले आहे. पुण्याहून कल्याणमार्गे मनमाडला जाणारी ही गाडी सुपरफास्ट करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

एलबीटी वसुलीसाठी खासगी कंत्राटदार

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्यास केंद्र सरकारकडून ​सहमती दर्शविण्यात आली असली, तरी बोर्डाकडे एलबीटी वसुलीसाठी मनुष्यबळ नाही. त्यामुळे खासगी कंत्राटदारामार्फत एलबीटी जमा करण्याबाबत प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

शिरूरच्या निवडणुकीत आतापासूनच रंग

$
0
0
शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात प्रचारयुद्ध सुरू झाले असून कोणत्या उमेदवाराचे किती शिक्षण झाले, यावरून प्रचाराचा धुराळा उठविला जात आहे. शिवसेनेने पाच वर्षांतील विकास कामांचा मुद्दा उचलून धरला आहे तर राष्ट्रवादीने विकास दाखवा अशी विचारणा केली आहे.

‘राष्ट्रवादी’चा पेच कायम

$
0
0
एकापाठोपाठ एक इच्छुक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमधील पेच वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत थेरगाव येथे मेळावा होणार असून, येथील भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

कामगार मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा

$
0
0
बांधकामावरील कामावर सुरक्षिततेचे उपाय न केल्यामुळे तेथे काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शशिधरण रामकृष्णन (वय ५९, रा. काळेवाडी) असे मृताचे नाव आहे. थॉमस वैद्ययन (४८, रा. साई नामदेव पार्क, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे.

पुरंदर तालुक्याला पावसाने झोडपले

$
0
0
पुरंदर तालुक्यातील पश्चिम डोंगरी भागाला गुरुवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने झोडपून काढले. पावसामुळे चांबळी, भिवरी, बोपगाव, सोमुर्डी आणि अस्करवाडी तसेच दौंडज, राख, नावळी, वाल्हा, कोळविहीरे या गावांत शेतातील उभी पिकी भुईसपाट झाल.

पुणे विभागात ९० टक्के लाभार्थींना ‘अन्नसुरक्षा’

$
0
0
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारने (युपीए) गरीबांना अत्यल्प दरात धान्य देण्यासाठी सुरू केलेल्या अन्नसुरक्षा योजनेचा पुणे विभागातील नव्वद टक्के म्हणजे सव्वाकोटी जनतेने लाभ घेतला आहे.

तू ‘मनसे’ ऐलान प्रिये मी सावध ‘धनुष्यबाण’ प्रिये

$
0
0
कवी नारायण पुरी यांची ही रचना सध्याच्या राजकीय परिस्थितीचे नेमके वर्णन करते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय कोपरखळ्या, सामाजिक परिस्थितीवर मार्मिक टिप्पणी करत अंतर्मुख करणाऱ्या राज्यभरातील कवींना पुणेकरांची उत्स्फूर्त दाद मिळवली.

वृक्ष संवर्धन समितीत कार्यकर्त्यांनाच संधी

$
0
0
महापालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीच्या सदस्यांची नियुक्ती करताना सामाजिक संस्थांच्या नावाखाली राजकीय पक्षाश‌ी संबधित कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना प्राधान्य देण्यात आल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या निवडीमुळे ही वृक्ष संवर्धन समिती‌ नसून कार्यकर्ता संवर्धन समिती असल्याची जोरदार चर्चा पालिकेत सुरू झाली आहे.

चार लाख रुपयांची ब्राउन शुगर जप्त

$
0
0
पुणे स्टेशन परिसरात ब्राऊन शुगरीची विक्री करण्यासाठी आलेल्या उत्तर प्रदेशातील दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी अटक केली. या दोघांकडून चार लाख रुपये किमतीची २६५ ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली.

ससूनच्या मनोरुग्णाची इमारतीवरून सुटका

$
0
0
ससून हॉस्पिटलमधील बर्न वॉर्डात उपचार घेत असलेल्या एका पेशंटची पाण्याच्या टाकीवरुन सुटका करण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. विलास भागीनाथ संकपाळ (वय ३२, रा. पिंपळे गुरव, राजीव गांधी नगर) असे त्याचे नाव असून तो मनोरुग्ण असल्याचे उघडकीस आले.

वाहनांच्या फेटनेस चाचणीला ‘ब्रेक’

$
0
0
वाहनांची फिटनेस चाचणी घेण्यासाठी आवश्यक सुविधा नसल्यामुळे तपासणी बंद ठेवण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एकदा फिटनेस चाचणीसाठी घेण्यात येणारे कॅम्प कोर्टाचा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

लालफितीत अडकले सीसीटीव्ही कॅमेरे

$
0
0
एसटी बसस्थानकांची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी शहरातील सर्व स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना लालफितीमध्ये अडकल्याने सर्व स्थानकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे समोर आले आहे.

तुरुंगाधिकारी भरतीत प्रक्रियेत गोंधळ

$
0
0
तुरुंगाधिकारी भरतीची निवड यादी बनविताना झालेल्या गोंधळामुळे एका क्लर्कला निलंबित करण्यात आले. कॉम्प्युटरवर उमेदवारांच्या गुणांची यादी करताना हा गोंधळ झाला असल्याचे जेल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

माहितीपटातून उलगडले भावेकाका

$
0
0
‘असा एकही अनुभवी रंगकर्मी नाही, ज्यानं भावे काकांकडून चेहरा रंगवून घेतलेला नाही’, ‘भावेकाका म्हणजे एक संस्थाच आहे’, ‘चेहरा कसाही असो, त्यामध्ये त्या पात्राचा जिवंतपणा आणण्याचं काम भावे काकांचं’, ‘कलाकार कितीही टेन्शनमध्ये असला, तरी ग्रीन रूममध्ये काकांना पाहताच त्याला बरं वाटायचं,’ ‘अभिनय येत नसला, तरी एखादी व्यक्ती भावेकाकांच्या मेक-अपनंतर उत्तम भूमिका वठवू शकेल,’ असे एक ना अनेक गौरवोद्गार नामवंत कलाकारांकडून ऐकायला मिळाले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images