Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आवृत्त्यांमध्ये माहितीची तफावत

$
0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या (बोर्ड) बारावीच्या बायोलॉजीच्या पुस्तकांच्या दोन आवृत्त्यांमधील माहितीची तफावत आणि या पुस्तकांमधील माहितीचे ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकांपेक्षा वेगळा असणारा तपशील राज्यातील विद्यार्थ्यांना मेडिकल सीईटीच्या परीक्षेसाठी अडचणीत टाकणारे ठरू शकतो.

मुख्य इमारतीचा अस्तित्वासाठी लढा सुरूच

$
0
0
साडेपाच वर्षांहूनही अधिक काळ चाललेली दुरुस्ती प्रक्रिया आणि तब्बल ९ कोटी २८ लाख रुपयांचा खर्चही पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीला अद्यापही सुस्थितीत आणू शकलेला नाही.

ऑनलाइन परीक्षेत ‘गाइड’!

$
0
0
इंजिनीअरिंगच्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान विद्यार्थी केवळ गुगलच नव्हे, तर आपल्या ज्युनिअर सुपरवायझरच्या कृपेने थेट मोबाइल वापरून विषयतज्ज्ञांना किंवा आपल्याच शिक्षकांकडून प्रश्नांची उत्तरे विचारून घेत असल्याचेही आता समोर आले आहे.

केमिस्ट्रीच्या पर्यायाने ‘पीसीएम’वर अन्याय

$
0
0
इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशांसाठीच्या पात्रता निकषांत केमिस्ट्री विषयाला अन्य तीन पर्यायी विषयही ग्राह्य धरण्याबाबत बारावी सायन्सला ‘पीसीएम’ ग्रुप घेतलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.

दहा वर्षांनंतर पुण्यात गारपीट

$
0
0
राज्यात विविध भागात सुरू असलेल्या गारपिटीने गुरुवारी पुणेकरांनाही गारांचा प्रसाद दिला. सुमारे पंधरा मिनिटे झालेल्या गारपिटीने काही भागात जणू काश्मीरच अवतरल्याचा भास होत होता. वातावरणाचा गोठणबिंदू नेहमीपेक्षा खाली आल्याने ही गारपीट होत असून शुक्रवारीही पुण्यात तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.

पावसाचा तडाखा ७९९ कोटींचा

$
0
0
पावसाने अवेळी घातलेल्या धिंगाण्यामुळे पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधील फळबागा, शेती व घरांचे तब्बल ७९९ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला आहे.

वाहतूक पोलिसांची महामार्ग प्राधिकरणाला तंबी

$
0
0
कात्रज-देहूरोड बायपासवर दुरुस्तीची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची तंबी वाहतूक पोलिसांनी महामार्ग प्राधिकरणाला दिली आहे. या पुढील अपघातांमध्ये रस्त्यांची दुरवस्था कारणीभूत असली, तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

यासीन भटकळला शिवाजीनगर कोर्टात आणणार

$
0
0
दहशतवादविरोधी पथकाच्या अटकेत असलेल्या ‘इंडियन मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्या यासीन भटकळ यास जर्मन बेकरी स्फोटाच्या गुन्ह्यात अटक करून शुक्रवारी शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. यासीनला मोठ्या फौजफाट्यासह कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

बेकायदा बालसुधारगृह चालकाला अटक

$
0
0
कोंढवा परिसरात बेकायदा बालसुधारगृह चालविणाऱ्या आश्रम चालकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली असून, गुरुवारी त्याची जामिनावर सुटका झाली. या प्रकरणी महिला बालकल्याण विभाग आणि चाइल्ड लाइन संस्थेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पीएचडीच्या विद्यार्थ्यांना फटका

$
0
0
शोधनिबंध तपासून विद्यापीठाकडे जमा केलेल्या तसेच अंतिम मुलाखतीच्या प्रतिक्षेत असलेल्या पीएच.डीच्या काही विद्यार्थ्यांना नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने काढलेल्या पूर्व मुलाखत (प्री व्हायवा) नव्याने देण्याच्या फर्मानाचा फटका बसणार आहे.

आघाडीचा प्रचार मंगळवारपासून

$
0
0
लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या नावावर अद्यापही शिक्कामोर्तब झालेले नसताना निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची तयारी मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली आहे.

राष्ट्रवादीचे घोडे ‘मावळा’त अडले!

$
0
0
मावळ लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढण्याची आमदार लक्ष्मण जगताप यांची ठाम भूमिका आणि ‘आमचा बळीचा बकरा करू नका,’ असे म्हणणारे निष्ठावंत यांच्या कात्रीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडीचे घोडे अडले आहे.

पुणे भाजपसमोरचा पेच कायमच

$
0
0
पुणे लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवरून उभा राहिलेला पेच गुरुवारी झालेल्या बैठकीनंतरही सुटू शकलेला नाही. उमेदवारांच्या नावावर एकमत न होऊ शकल्याने पुणे व लातूर येथील उमेदवारनिश्चिती आणखी लांबणीवर पडणार आहे.

पर्यावरण आणि विकास सांगड हवी

$
0
0
शहराचा विकास कितीही वेगाने झाला, तरी त्याचे सार्वजनिक आरोग्य हे पूर्णतः पर्यावरणावर अवलंबून असते. पर्यावरण आणि विकास यांची सांगड घातल्याशिवाय शहराची प्रगती होऊ शकत नाही, हे सूत्र आज अनेक प्रगत देशांनीही मान्य केले आहे.

पासपोर्ट प्रक्रियेत नित्य विघ्ने

$
0
0
पासपोर्ट प्रक्रियाच्या जरा कुठे सुरळीत होते आहे, अशा निष्कर्षाला येईपर्यंत दर काही महिन्यांनी नवीन अडचणी पुढे येत आहेत. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या दोन महिन्यांपासून तत्काळ पासपोर्टसाठी अपॉइंटमेंटची अट घातली आहे.

यासीनला पोलीस कोठडी

$
0
0
दहशतवादविरोधी पथकाच्या अटकेत असलेल्या ‘इंडियन मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्या यासीन भटकळ यास जर्मन बेकरी स्फोटाच्या गुन्ह्यात चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शुक्रवारी सकाळी यासीनला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले.

मोहक कथक आविष्कार

$
0
0
चेहऱ्यावरील मधुर हावभाव, लयबद्ध घुंगुरनाद, हालचालींमधील सहजता यांनी सजलेला कथक नृत्याविष्कार नुकताच ज्योत्स्ना भोळे सभागृहात पाहायला मिळाला.

हेरिटेज वॉकमध्ये उलगडणार

$
0
0
तळ्यातला गणपती अर्थातच सारसबागेतलं सिद्धीविनायक गणेश मंदिर आणि परिसराला पुण्याच्या इतिहासात मानाचं स्थान आहे. पुण्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या ठिकाणाचे विविध पैलू दहाव्या हेरिटेज वॉकमध्ये उलगडणार आहेत.

यासिनला १४ दिवसांची पो.कोठडी

$
0
0
इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या आणि देशातील विविध बॉम्बस्फोट प्रकरणांमध्ये हात असलेला यासीन भटकळ याला शुक्रवारी पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात कडक पोलिस बंदोबस्तात हजर केले. कोर्टाने त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

साताऱ्यात तिरंगी लढत

$
0
0
सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, महायुतीकडून संभाजी संकपाळ आणि आपकडून राजेंद्र चोरगे निवडणूक रिंगणात आहेत. महायुतीऐवजी राजेंद्र चोरगेचे युवा मतदार आणि उदयनराजेंविरोधी नाराज गटाची संभाव्य मदत याच्या जोरावर उदयनराजेंना आव्हान देऊ शकतील, अशी चिन्हे आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images