Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

भाषेची अस्मिता प्रत्येकानेच जपावी

$
0
0
‘आजच्या इंग्राजळलेल्या युगात, मराठी भाषेची अस्मिता प्रत्येकाने जपण्याची गरज आहे. तरच मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या प्रमुख कार्यवाह डॉ. माधवी वैद्य यांनी केले. भोरमध्ये साहित्य परिषदेच्या ६१ व्या शाखेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्या वेळी डॉ. वैद्य बोलत होत्या.

चाकणजवळ बिबट्याचा थरार

$
0
0
चाकणजवळील बिरदवडी या गावात बुधवारी सकाळच्या सुमारास बिबट्या घुसल्याने ग्रामस्थांची एकच धांदल उडाली व पळापळ सुरू झाली. अचानक व अनपेक्षितपणे आलेल्या या आगंतुक पाहुण्याच्या आगमनाने गावकऱ्यांची एकच भंबेरी उडवली होती.

पुण्याचा प्रतिनिधी कोण होणार?

$
0
0
लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्याने लोकप्रतिनिधींची धावपळ सुरू असताना, पुण्यातील काही उमेदवार मात्र सध्या मतदानाच्या अंतिम टप्प्यात येऊन ठेपले आहेत. पर्यावरणप्रेमींच्या मतदानावर त्यांचे भवितव्य अवलंबून असून यातील काहींना पुणे जिल्ह्याचा ‘मानचिन्हा’चा किताब मिळणार आहे.

‘महिलांनी नेटवर्किंग वाढविण्याची गरज’

$
0
0
‘महिलांमध्ये ‘नेटवर्किंग’ शून्य असून त्यांनी संघटीत होणे गरजेचे आहे. बसमध्ये किंवा लोकलमध्ये कोणी महिलांची छेड काढली, तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्याविरुद्ध सर्व महिला एकवटल्यास पुन्हा असे कृत्य करण्याची कोणाचीही हिम्मत होणार नाही,’’ असे मत राज्य निवडणुक आयोगाच्या आयुक्त नीला सत्यनारायण यांनी बुधवारी मांडले.

चालकाला बेदम मारहाण करून कार पळवली

$
0
0
कात्रज-देहूरोड बायपास तसेच कात्रज-कोंढवा रोडवर कार चालकांना मारहाण करत कार पळवून नेणारी टोळी गेल्या काही महिन्यांपासून सक्रिय आहे. आतापर्यंत या आरोपींनी चार चारचाकी वाहने पळवून नेली असून पोलिसांना त्यांना पकडण्यात पूर्णतः अपयश आले आहे.

‘गोदावरी’च्या प्रदूषण देखरेखीसाठी समिती

$
0
0
कुंभमेळा आणि गोदावरी नदीतील प्रदूषणासंदर्भात देखरेख करण्याची जबाबदारी उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीला देण्यात आली आहे. या कमिटीने पर्यावरण रक्षणाचे काम सक्षमतेने हाताळले नाही तर या समस्येवर नवीन स्वरुपातील याचिका दाखल करण्याची परवानगी मिळेल, असे सांगून राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने संभाजी ब्रिगेडला याचिका मागे घेण्याची सूचना दिली.

महात्मा टेकडी विकायची आहे..!

$
0
0
बायोडायर्व्हसिटी पार्कचे आरक्षण आणि सरकारी नियमांपासून सुटका मिळविण्यासाठी महात्मा सोसायटी टेकडीवरील जमीनधारकांनी टेकडी विकायला काढली आहे. तब्बल १२५ एकर जागेत ही टेकडी पसरली आहे.

‘ट्रायल’ झाली, ‘रन’ कधी?

$
0
0
आळंदी रोडसह नगररोडवरील बीआरटी मार्गावर बुधवारी महापालिका प्रशासनाने ‘ट्रायल रन’ घेतली. यामध्ये बीआरटी मार्गाशेजारील रोडवरील गतिरोधक काढून टाकण्यात यावेत, अशी सूचना वाहतूक पोलिसांनी केली.

सासू-सासऱ्यांनी ५० हजार भरपाई द्यावी

$
0
0
पतीकडून झालेली फसवणूक आणि सासू सासऱ्यांनी केलेल्या छळाविरुद्ध् विवाहितेने दाखल केलेल्या केसमध्ये कोर्टाने तिच्या सासू सासऱ्यांना तिला प्रत्येकी २५ हजार रुपयांची भरपाई द्यावी तसेच तिला सासरी राहू द्यावे, असे आदेश दिला.

एकोणीस वर्षांत दोन वेळा किडनी ट्रान्स्प्लांट

$
0
0
तुम्हाला किडनीचा आजार आहे, हे समजल्यावर खचून जाऊ नका. आजाराशी लढण्याची मानसिक तयारी, कुटुंबीयांचा पाठिंबा, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन असेल, तर उत्तम आयुष्य जगता येते… हा सल्ला दिला आहे, १९ वर्षांत दोन किडनी ट्रान्स्प्लांट होऊन आज उत्तम सर्वसाधारण आयुष्य जगणाऱ्या प्रशांत भोंडे यांनी.

आजी-आजोबांना मिळणार ‘केअरटेकर’

$
0
0
वयानुसार येणारे विविध आजार आणि थकलेल्या शरीरामुळे दैनंदिन कामे पूर्ण न करू शकणाऱ्या ‘आजी-आजोबां’ची काळजी यापुढे प्रशिक्षित केअरटेकर घेणार आहेत.

‘ब्रेनडेड’च्या नातेवाइकांचा अवयवदानास नकार

$
0
0
‘ब्रेनडेड’ पेशंटच्या किडनीसह अन्य अवयव गरजू पेशंटला देणे शक्य असतानाही नातेवाइकांकडून किडनी देण्यास नकार मिळत असल्याने अशा पेशंटला जीवदान मिळणे अशक्य झाले आहे.

ऑनलाइन परीक्षेत होतेय घरबसल्या कॉपी

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या ऑनलाइन परीक्षेदरम्यान होणारे ‘गुगलिंग’ समोर येण्यापाठोपाठ, विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या रुमवर वा घरी बसूनही ऑनलाइन परीक्षा दिल्याचे समोर आले आहे.

विद्यापीठात शंभर कोटींची विकासकामे

$
0
0
पुणे विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांच्या माध्यमातून तब्बल शंभर कोटींची कामे येत्या वर्षभरामध्ये पूर्णत्त्वाला येण्याची आशा आहे. विद्यापीठाच्या आवारामधील सार्वजनिक स्वच्छतागृहांपासून ते अगदी जागतिक दर्जाच्या कँटीन- टेनिस कोर्टपर्यंतच्या कामांचा यात समावेश आहे.

कोट्यवधीच्या खर्चाचे काय झाले?

$
0
0
गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत कॉलेजांमधून घेतल्या जाणाऱ्या विविध कार्यशाळा, परिषदा आणि परिसंवादांच्या कोट्यवधीच्या खर्चाचा नेमका उपयोग काय झाला, हे शोधणारी कोणतीही यंत्रणा पुणे विद्यापीठाकडे नसल्याचे विद्यापीठानेच दिलेल्या एका उत्तरातून स्पष्ट होत आहे.

मतदानादिवशी परीक्षा घेऊ नका

$
0
0
लोकसभेच्या निवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणार असल्यामुळे त्या दिवशीच्या परीक्षा घेऊ नयेत, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरव राव यांनी मंगळवारी पुणे विद्यापीठास दिल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या स्पष्ट सूचनांमुळे अनेक विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

बनावट पासपोर्टप्रकरणी ठाण्यातील एकाला अटक

$
0
0
बनावट कागदपत्रांचा वापर करून पासपोर्ट मिळविल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी ठाणे येथील एकाला इंटरपोलच्या मदतीने अटक केली आहे. कोर्टाने त्याला १४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. शामराव रामदास कोरडे (३८, रा. ठाणे पश्चिम) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

‘बीआरसी कव्हरिंगमध्ये ९२ लाखांचा गैरव्यवहार’

$
0
0
शहरातील विविध रॅम्पमधून कचरा गोळा करणाऱ्या बीआरसी गाड्यांवर कव्हरिंग आणि लिचेटरोधक दरवाजे पुरविण्याच्या कामांमध्ये तब्बल ९२ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

स्त्री स्वातंत्र्याविषयीचा ‘सँडकॅसल’!

$
0
0
प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा महाल असावा, अशीच इच्छा असते. मात्र, शीलासारखी स्त्री गृहिणी म्हणून खरोखरंच सुखी असते का? जाहिरात क्षेत्रात असल्यामुळे भक्कम पगार असलेला नवरा आणि सुंदर, गुणी मुलगी यांच्याच गरजांकडे पाहाणं एवढंच एखाद्या गृहिणीसाठी पुरेसं असतं का? की तिलाही स्वतःची काही स्वप्नं असतात?

मानवी भावबंध मांडणारी अॅनाची गोष्ट

$
0
0
कॅथलिक बोर्डिंग स्कूलवरून टीनएजर अॅना सुट्ट्यांमध्ये स्वतःच्या घरी येते आणि तिला समजतं, की वडील घर सोडून गेले आहेत. लहानपणीचाच मित्र असलेल्या एका प्रिस्टच्या आधाराने तिची आई स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images