Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पेपर सेटरना वाटतो कम्प्युटरचा जाच

0
0
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा कारभार हायटेक करण्याचा प्रयत्न विद्यापीठाच्याच पेपर सेटरसाठी कमालीचा त्रासदायक ठरला आहे. ‘विद्यापीठाचा पेपर सेट करण्यासाठी कम्प्युटरची सक्ती आम्हाला टायपिस्ट बनविण्याचाच प्रकार आहे,’ अशी टीका प्राध्यापकांकडून करण्यात येत आहे.

‘कन्व्हेन्शन सेंटर’ही मेट्रोने व्हावे ‘कनेक्ट’

0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत मोशी येथे बांधण्यात येणाऱ्या जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रापर्यंत (कन्व्हेन्शन सेंटर) मेट्रोचा मार्ग उपलब्ध असावा, असा प्रस्ताव पुढे येत आहे. या सेंटरच्या डिझाइनमध्येच मेट्रोसाठी योग्य जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचना केली गेली आहे.

सायकल योजनेला ‘ब्रेक’

0
0
महापालिकेतील अधिकारी आणि स्थायी समितीने घेतलेल्या वेळकाढूपणाच्या धोरणाचा फटका पालिकेच्या सायकल योजनेला बसला आहे. लोकसभेची आचारसंहिता सुरू झाल्याने एक कोटी रूपये खर्च करून महापालिका प्रशासनाने खरेदी केलेल्या हजारो सायकली पुढील काही महिने धुळखात पडणार आहेत.

निम्म्या शहरात अघोषित पाणीकपात

0
0
वडगाव बुद्रुक परिसरातील कॅनॉलवर पूल बांधण्याचे काम सुरू करण्यात आल्याने कॅनॉलमधून सोडले जाणारे पाणी गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आले आहे. यामुळे पर्वतीसह लष्कर जलशुद्धीकरण केंद्रात कमी पाणी उपलब्ध होत असल्याने सहकारनगर, धनकवडी, पद्मावतीसह कॅम्प परिसर, पुणे स्टेशन, हडपसर या भागांतील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.

गुलाबराव पोळ यांचा राजीनामा?

0
0
पुण्याचे माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा आहे. तीन महिन्यांचा नोटीस पिरिअड वगळण्याची विनंतीही त्यांनी राज्य सरकारला केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, पोळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.

मोहिते-पाटलांच्या घरात चोरी

0
0
घोरपडी येथून उदयसिंह मोहिते-पाटलांच्या पत्नीचे ‘एटीएम’कार्ड चोरून त्याद्वारे गेल्यावर्षभरात ‘एटीएम’मधून नऊ लाख रुपये काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही चोरी त्यांच्याच नोकराने केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्यावर कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गडकरी-मुंडे गटांत पुन्हा धुसफूस

0
0
भारतीय जनता पक्षातील नेत्यांमधील भाऊबंदकी काही महिन्यांनंतर पुन्हा उफाळून आली आहे. माजी अध्यक्ष नितीन गडकरी आणि पक्षाचे संसदीय उपनेते गोपीनाथ मुंडे यांच्या गटांत पुन्हा धुसफूस सुरू झाली आहे.

लक्ष्मणभाऊ NCPच्या वळणावर?

0
0
मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेतलेले आमदार लक्ष्मण जगताप पुन्हा स्वगृही परतण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवावी, यासाठी स्वतः अजित पवार शिष्टाई करीत असल्याचे समजते.

ऑनलाइन परीक्षा, ऑनलाइन कॉपी

0
0
पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंगच्या ऑनलाइन परीक्षांदरम्यान विद्यार्थी थेट गुगलचा वापर करून ऑनलाइन कॉपी करत आहेत! ‘जी-मेल’वरून पाठविलेल्या प्रश्नांच्या स्क्रीन शॉट्सच्या माध्यमातून सर्रासपणे हे गैरप्रकार सुरू असून कॉलेजमधील ‘मॉक टेस्ट्स’दरम्यान ‘ऑनलाइनसाठी’चे प्रश्न परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांच्या हाती लागल्याचे प्रकाशात आले आहे.

तंत्रज्ञानाने रोखली असती गारपीट

0
0
हजारो कोटी रुपयांचे नुकसान करणारी गारपिटीसारखी नैसर्गिक आपत्ती तंत्रज्ञानाच्या साह्याने रोखता आली असती का, या चर्चेला आता तोंड फुटले आहे. रॉकेट अथवा विमानाच्या मदतीने गारपिटीच्या ढगांमध्ये क्षार फवारून या आपत्तीची तीव्रता कमी करता येणे सहज शक्य आहे.

'बारणेंना पैसे घेऊन उमेदवारी'

0
0
मावळ मतदारसंघात खासदार गजानन बाबर यांना डावलून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर केल्याने नाराज झालेल्या बाबर यांनी लगेचच शिवसेना सोडत लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढविणार असल्याचे जाहीर केले. पक्षश्रेष्ठींनी पैसे घेऊन बारणे यांना उमेदवारी दिल्याचा आरोपही बाबर यांनी केला.

आज रंगणार स्त्रीविषयक कविता, गीतं

0
0
जागतिक महिला दिनानिमित स्त्री विषयक कविता आणि गीतांचा ‘गंगा बहती चली जाए रे’ हा दृक-श्राव्य कार्यक्रम आज (दि. १३) संध्याकाळी सहा वाजता पत्रकार भवन इथं होणार आहे. स्वरभूमी संस्थेनं याची निर्मिती केली आहे.

उलगडणार भावे काकांचं योगदान

0
0
‘गेली १४ वर्षे मी रंगभूषाकार भावे काकांना ओळखतो आहे, आत्तापर्यंत माहिती असणारे साडेचार लाख मेकअप त्यांनी केले आहेत, माहिती नसणाऱ्यांची संख्याही कदाचित तेवढीच असू शकते.

धमाकेदार ‘निर्भय’ महोत्सव

0
0
‘मुंगळा’, ‘चम चम करता है ये नशिला बदन’, ‘परदेसियां’, ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘साजरी गोजिरी’, ‘हात नका लावू माझ्या साडीला’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’, ‘डिपांग डिपांग’ यांसारख्या धमाकेदार गाण्यांनी आणि वैशाली सामंत यांच्या मधाळ आवाजानं रसिकांना डोलायला लावलं.

बसंतरंगातली अनोखी मैफल

0
0
नांदी, संतरचना, राग बसंत, चक्रधार, भैरव-बहार अशा शास्त्रीय, उपशास्त्रीय रचनांनी रंगलेल्या ‘बसंतरंग’ या बहारदार मैफलीला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. गांधर्व महाविद्यालयात रंगलेल्या या मैफिलीत युवा गायक-वादकांची जुगलबंदी दाद घेणारी ठरली.

क्रिमिनल प्रॅक्टिस नकोच

0
0
एखादी महिला गुन्हेगारी संदर्भात खटला लढवते आहे, असं चित्र फारसं दिसत नाही. क्रिमिनल प्रॅक्टिस करणाऱ्या महिला वकील कमी दिसतात. त्यामागे त्यांची काही कारणंही आहे.

एक पाऊल मतदानाच्या जागरासाठी...

0
0
त्यांना परिवर्तन हवंय, तरुणांनी अधिकाधिक मतदान करावं यासाठी ते रस्त्यावर उतरणार आहेत, यासाठी त्यांना हवी आहे तुमची साथ, तुम्ही मतदान करणारे असाल आणि त्यासाठी जनजागृती करायची इच्छा असेल, तर असे कार्यकर्ते म्हणून तुमचं स्वागत केलं जाणार आहे.

दक्षिणात्य संगीताचा आस्वाद घेण्याची संधी

0
0
खास दाक्षिणात्य शैलीतील संगीताचा आस्वाद पुणेकरांना घेता येणार आहे. ‘बॅनयन ट्री इव्हेंट्स’तर्फे दक्षिणायन’ या सांगीतिक कार्यक्रमाचं आज (दि. १३) आयोजन करण्यात आलं आहे.

रंगभूषेला उज्ज्वल भवितव्य

0
0
वयाच्या ६८व्या वर्षीही तरुणांच्याच उत्साहाने पडद्यामागे वावरणारे ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारा ‘रंगभाषाकार’ हा माहितीपट ‘इप्टा’ या संस्थेने तयार केला आहे. आज (१३ मार्च) सायंकाळी ६ वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात त्याचे स्क्रीनिंग होणार आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी चिन्मय पाटणकर यांनी साधलेला संवाद…

पाषाण तलावावर जलपर्णी वाढली

0
0
पाषाण तलाव परिसरात जलपर्णी वाढल्याने तलाव परिसरात समस्यांमध्ये वाढ झाली असून, पाषाण तलावाजवळील वस्तीमध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे.पाषाण तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात दूष‌ीत पाणी सोडण्यात येत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images