Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गेल्या २ महिन्यांत १५५ सोनसाखळी हिसकावल्या

$
0
0
शहराच्या इतिहासात सोनसाखळी चोरांनी सर्वाधिक उच्छाद गेल्या दोन महिन्यांत मांडल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत १५५ सोनसाखळी हिसकावल्याचे गुन्हे दाखल झाले असून गेल्यावर्षी या कालावधीत केवळ ३७ गुन्हे दाखल झाले होते.

वेतन गैरव्यवहार थांबवा

$
0
0
पंचवीस वर्ष पूर्ण झालेल्या विनाअनुदानित तंत्रनिकेतनच्या (पॉलिटेक्निक) नावातून विनाअनुदानित शब्द काढून टाकण्यात यावा, विनाअनुदानित तंत्रनिकेतनमध्ये सुरू असलेला वेतन गैरव्यवहार थांबवण्यात यावा.

उच्च शिक्षणात बदलांची गरज

$
0
0
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर उंचावण्यासाठी शिक्षण संस्थांनी गुणवंत आणि सर्व प्रकारची कौशल्ये आत्मसात केलेले विद्यार्थी मनुष्यबळाच्या रुपाने निर्माण करणे आवश्यक आहे.

वीज दरवाढ मंजूर; ग्राहकांना झळ नाही

$
0
0
महावितरणला पाच हजार कोटी रुपयांची अंतरिम दरवाढ देण्यास राज्य वीज नियामक आयोगाने सोमवारी मान्यता दिली. मात्र, राज्य सरकारने दिलेल्या अनुदानामुळे या वाढीचा बोजा ग्राहकांवर पडणार नाही.

पोलिसांनी पकडलेली गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न

$
0
0
कात्रज-कोंढवा बायपासने हडपसरकडून चाललेली चोरीची इनोव्हा वाहतूक पोलिसांनी दक्षतेमुळे पकडली गेली. इनोव्हाच्या नंबरबाबत संशय आल्याने दोघा वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून ही कार ताब्यात घेतल्याची घटना गेल्या महिन्यात घडली होती.

पीएमपीच्या बसखरेदीला ‘ब्रेक’

$
0
0
कंपन्यांकडून प्राप्त झालेले अवाजवी दर आणि बसच्या रचनेमधील तफावत, यामुळे बसखरेदीसाठीचा प्रस्ताव पुन्हा केंद्र सरकारकडे पाठविण्याची सूचना पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) केली आहे.

दहावी हेल्पलाइन बंद

$
0
0
पुणे विभागीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइनची सुविधा पुरविण्यात आली आहे. मात्र, नंबर व्हेरिफिकेशनच्या टप्प्यावर आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे ही सुविधा अद्याप ‘अॅक्टिव्ह’च झाली नसल्याची बाब सोमवारीसमोर आली.

राहुल गांधी सांगतील तेथूनच लढणार

$
0
0
‘काँग्रेस नेते राहुल गांधी सांगतील, तेथून निवडणूक लढविण्यास आपण तयार असून उमेदवारीबाबत पक्ष देईल, तो आदेश आपण पाळू,’ असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनी सोमवारी सांगितले.

भूमिपूजनांची घाई; दिरंगाईने खर्च वाढत जाई

$
0
0
निवडणुकांच्या तोंडावर विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद‍्घाटन कार्यक्रमांचा धडाका सध्या जोरात असला, तरी शहराच्या विविध भागांत सध्या सुरू असलेल्या उड्डाणपुलांच्या कामांची कूर्मगती संपणार कधी, असा रोखठोक सवाल पुणेकरांकडून विचारला जात आहे.

हुडहुडी संपली; तापमान वाढणार

$
0
0
मागील दोन-तीन दिवस हुडहुडी भरविणारी थंडी आता कमी होऊ लागली असून सोमवारी पुण्यात तापमानात वाढ झाली. पुढील दोन दिवस पुण्यात आकाश अंशतः ढगाळ राहून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

नावाचा ‘पाळणा’ लांबलेलाच...

$
0
0
पुण्यासह विविध लोकसभा मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या राज्य निवड मंडळाची आज (मंगळवारी) मुंबईत बैठक होत आहे.

हद्दीलगतची गावे पालिकेत केव्हा?

$
0
0
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या आठवड्यात कोणत्याही दिवशी लागण्याची शक्यता असल्याने तत्पूर्वी शहराच्या हद्दीत ३४ गावांचा समावेश करण्याचा रखडलेला प्रश्न सरकार मार्गी लावणार का, याबद्दल उत्सुकता आहे.

१६५२जणांना ‘१०८’चे जीवनदान

$
0
0
‘इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस’मुळे (ईएमएस) राज्यात गेल्या महिनाभरात तब्बल १६५२ पेशंटचा जीव वाचविणे शक्य झाले आहे. हृदयविकाराचा झटका वा अपघातामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या पेशंटसाठी ‘गोल्डन अवर’मधील उपचारांची गरजही त्यामुळे स्पष्ट झाली आहे.

‘बीडीपी’त बांधता येणार घरे

$
0
0
महापालिकेच्या समाविष्ट गावांतील जैववैविध्य उद्यानासाठी (बीडीपी) आरक्षित जमिनीवर चार टक्के बांधकाम परवानगी देण्याची शिफारस नगर रचना विभागाने केली आहे.

बारामतीत ‘मॅच फिक्सिंग’

$
0
0
बारामतीत लढतीपूर्वीच मॅच फिक्सिंग झाले असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत, अशा शब्दांत शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी मंगळवारी आपली नाराजी व्यक्त केली.

वकिलाने केला विनयभंग

$
0
0
शिवाजीनगर कोर्टात प्रॅक्टिस करत असलेल्या एका सीनियर वकिलाविरुद्ध त्याच्याकडे ऑफिस अ​सिस्टंट म्हणून काम करीत असलेल्या तरुणीने विनयभंग आणि मारहाणीची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

साहित्यकृतींवर आधारित वुमेन फिल्म फेस्टिव्हल

$
0
0
जागतिक महिलादिनानिमित्त आयाम, आशय फिल्म क्लब आणि एनएफएआय यांच्यातर्फे ७ ते ९ मार्च या कालावधीत वुमेन फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. महिला लेखिकांच्या साहित्यकृतींवर आधारित सिनेमांसह चर्चासत्र, व्याख्याने, प्रकाशन, पुरस्कार वितरण आदी विविध कार्यक्रम यानिमित्त होणार आहेत.

कंगना, अमृताच्या शुभेच्छा

$
0
0
येत्या शनिवारी (८ मार्च) शनिवारवाडा येथून सकाळी आठ वाजता ही खास रॅली सुरू होणार आहे. मागच्या वर्षीही या रॅलीला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. मयूर कॉलनीतल्या जोग शाळेतून सुरू झालेली ही रॅली शनिवारवाड्याला पोहोचली होती.

अलौकिक काव्यप्रतिभेचा पुन्हा मिळणार प्रत्यय

$
0
0
‘दशरथा घे हे पायसदान’, ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती कुश-लव रामायण गाती’ अशा भावगर्भ रचना करणारे महाराष्ट्राचे ‘आधुनिक वाल्मीकी’ गजानन दिगंबर माडगुळकरांच्या अलौकिक काव्यप्रतिभेचा आनंद संगीतप्रेमींना पुन्हा मनसोक्त अनुभवता येणार आहे.

कबाडी अनकटला मुंबईत दाद

$
0
0
बीएमसीसी कॉलेजच्या टीमनं नुकतंच ‘कबाडी अनकट’ हे नाटक मुंबईच्या झेस्ट फेस्टिव्हलमध्ये सादर केलं. नाटकाचा विषय, सादरीकरण आणि अभिनयाला उपस्थितांची दाद मिळाली. एनसीपीए या प्रायोगिक थिएटरतर्फे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images