Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

धोम धरणात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

$
0
0
साताऱ्यातील धोम धरण परिसरात मित्रांसह फिरण्यास गेलेल्या दिघी येथील ‘आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या (एआयटी) विद्यार्थ्याचा पाण्यात बडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

शि. द. फडणीस यांना सृजन कोहिनूर पुरस्कार

$
0
0
‘जगात भरपूर दुःख आहे. हे दुःख कमी करण्याची क्षमता अध्यात्म आणि विनोद या दोनच गोष्टींमध्ये आहे. आपल्या चित्रांनी आयुष्यभर लोकांना दुःख विसरायला लावणाऱ्या फडणीसांचा सत्कार ही कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी आहे,’ असे उद्‍गार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांनी काढले.

भोळे यांना स्वरवंदना

$
0
0
ज्योत्स्ना भोळे यांच्या गायकीचा स्पर्श झालेल्या अनेक गीतं, नाट्यपदं त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं पुन्हा एकदा ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळाली. पत्रकार संघात रंगलेल्या भोळे यांच्या गाण्यांच्या स्पर्धेच्या दिवशी १८ ते ८० वयोगटातल्या स्पर्धकांनी सादरीकरण केलं.

गाण्यांतून उलगडणार प्रेमाचा ‘कॅलिडोस्कोप’

$
0
0
नवरा-बायकोच्या या गमतीशीर विषयावरच्या भांडणादरम्यान या नवऱ्याचे वडील प्रेक्षकांशी थेट संवाद साधत म्हणतात, ‘लव्ह’ काय आणि ‘अरेंज’ काय, लग्न या बिंदूपाशी येऊन पोहोचल्यानंतर पुढचा प्रवास हा नेहमी सारखाच असतो आणि यानंतर लगेचच सुरू होतं एक सुंदर भाव फुलवणारं गाणं...

‘संतबानी’चा सांगीतिक लाभ

$
0
0
गायक रघुनंदन पणशीकर आणि गायिका डॉ. रेवती कामत यांनी गायलेल्या रचनांच्या ‘संतबानी’ या अल्बमचं प्रकाशन प्रसिद्ध गायिका शुभा मुद्गल यांच्या हस्ते होणार आहे. येत्या सहा मार्चला कर्नाटक हायस्कूलच्या श्रीमती शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृहात संध्याकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

नृत्य आणि विनोदाचा तडाखेबंद सोहळा

$
0
0
हास्यसम्राट प्रा. अजितकुमार कोष्टी यांच्या विनोदाचे फवारे, ‘डान्स महाराष्ट्र डान्स’चा महाविजेता पुण्यकर उपाध्ये याचा ‘लुंगी डान्स’ आणि उपविजेती ऋतुजा जुन्नरकरच्या लावणीने ‘स्पार्क-१४’ हा सांस्कृतिक सोहळा रंगला.

बिर्याणी आणि कबाबचा ‘अॅम्ब्रोसिया’त रुबाब

$
0
0
गेल्या वीस वर्षांपासून पुण्यामध्ये सुरू असलेल्या ‘अॅम्ब्रोसिया’ने कात टाकली असून नवा साज धारण केला आहे. ‘फान्जीपानी’ या रेस्तराँमध्ये आता उत्तर प्रदेशातील अवध तसेच अरेबियन देशांमधील पाककृती ‘सर्व्ह’ करण्यास प्रारंभ केला आहे.

स्वरतीर्थामध्ये रसिक तल्लीन

$
0
0
दुपारच्या कडकडीत उन्हानंतर संध्याकाळचा, मनामनात चैतन्य जागवणारा सुखद गारवा, निसर्गही उन्हाच्या काहिलीनंतर रात्री सुखावलेला आणि रात्री कानावर पडणारा लोभस बागेश्री अशा सुखद वातावरणात पुणेकर तल्लीन झाले होते.

इतिहास जपणाऱ्या वर्तमानाचा वॉक!

$
0
0
आपलं चतुःश्रृंगीचं मंदिर म्हणजे इतिहास आणि आधुनिकता याचा सुंदर मिलाफ आहे. इथं २५० वर्षांपूर्वीची विहीर आहे, तसंच तिच्यावर बसवलेलं सुंदर आणि परिसराला शोभा देणारं सुंदर कारंजंही आहे.

सोशल मीडिया, की अफवांचा बाजार?

$
0
0
गेले चार दिवस ‘व्हॉट्स अॅप मेसेंजर’च्या शेकडो ग्रुप्समधून हा मेसेज फिरू लागला आणि वाचणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. परस्परांकडे अगदी पोलिसांकडेही याबाबत विचारणा होऊ लागली. अखेर काही काळाने ही अफवा असल्याचं लक्षात आलं.

वर्षभर का नसतो… ‘ओपन डे’?

$
0
0
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कुतूहल निर्माण व्हावे, त्याला खतपाणी मिळावे, यासाठी दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिनी विविध उपक्रम आयोजिण्यात येतात. राज्यातील विविध संशोधन संस्था या दिवशी विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतात. या दिवशी हजारो विद्यार्थी संस्थांना भेट देत असल्यामुळे या संस्थांमध्ये जणू जत्राच भरते.

... तो करतोय थकीत बिलांसाठी जनजागृती

$
0
0
महावितरणची घरगुती, कृषि व व्यावसायिक कारणांसाठीची थकीत वीजबिलाची रक्कम कोट्यवधीच्या घरात आहे. ही थकीत असलेली वीजबिलाची रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणला मोठी कसरत करावी लागत आहे.

जल आराखड्याचे काम सुरू

$
0
0
राज्याच्या प्रत्येक भागातील पाण्याची उपलब्धता, पाण्याचा वापर, वितरण आणि पीकपद्धती यांचा अभ्यास करून राज्याचा जल आराखडा तयार करण्याचे काम राज्य सरकारने हाती घेतले आहे.

तीन तासांत रेल्वे तिकीटाचे रिफंड!

$
0
0
तुम्ही जर रेल्वेचे तिकीट काढले असेल आणि काही कारणाने तुमचा प्रवास रद्द झाला तर गाडी सुटल्यानंतर तीन तासांमध्येच तुम्हाला तिकीटाची रक्कम रिफंड घ्यावी लागणार आहे. रेल्वेमंत्रालयाने एक मार्चपासून या नवीन नियमाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.

ऑनलाइन फसवणूक : बँक, मोबाइल कंपनीलाही भरपार्इ

$
0
0
ऑनलाइन बँकिंग फसवणुकीत मोबाइल कंपनीलाही जबाबदार धरले जाऊ शकते. ऑनलाइन बँकिंग फसवणूकप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एका दाव्यात स्टेट बँक ऑफ ​इंडिया आणि व्होडाफोन मोबाइल कंपनीला प्रत्येकी सहा लाख रुपयांची नुकसानभरपाई तक्रारदाराला देण्याचा आदेश मंत्रालयातील माहिती तंत्रज्ञान निवाडा विभागाचे मुख्य सचिव राजेश अगरवाल यांनी दिला आहे.

‘माझ्या हकालपट्टीचा आरोप चुकीचा’

$
0
0
दलित पँथरमधून कार्याध्यक्ष यशवंतभाऊ नडगम यांची हकालपट्टी केल्याचा आरोप होत असून आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे चुकीचे आणि खोटे आहेत. गेल्या १५ वर्षांपासून आपण संघटनेशी एकनिष्ठ आहोत. दिवंगत नेते नामदेव ढसाळ यांनी स्वतः विविध पदांवर निवड केल्याची पत्रे आपल्याला दिली होती.

सावकारी कायद्याची नियमावली महिनाभरात

$
0
0
गरीब शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या खासगी सावकारांवर कारवाई करण्यासाठी मंजूर केलेल्या सावकारी विरोधी कायद्याची नियमावली तयार करण्याचे काम सुरू झाले असून येत्या महिनाभरात ही नियमावली तयार होणार आहे.

रेल्वे ति‌किट रिफंड आता ३ तासांमध्येच

$
0
0
तुम्ही जर रेल्वेचे तिकीट काढले असेल आणि काही कारणाने तुमचा प्रवास रद्द झाला तर गाडी सुटल्यानंतर तीन तासांमध्येच तुम्हाला ति‌िकटाची रक्कम रिफंड घ्यावी लागणार आहे. रेल्वेमंत्रालयाने एक मार्चपासून या नवीन नियमाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.

जनतानगरमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

$
0
0
येरवड्यातील जनतानगर येथे एका शाळकरी विद्यार्थ्याने रविवारी रात्री आत्महत्या केली. सुफीयान गािलब शेख (वय १५) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

नागोरी व खंडेलवाल यांना गुन्ह्यातून वगळण्याचा अहवाल

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकाच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोघांविरुद्ध पुरावे न सापडल्यामुळे त्यांना या गुन्ह्यातून वगळयात यावे, असा अहवाल चतुश्रृंगी पोलिसांनी कोर्टात सादर केला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images