Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

इंग्रजीच्या पेपरमध्ये कॉपीची पंचाहत्तरी!

$
0
0
राज्यभरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डातर्फे शुक्रवारी घेण्यात आलेल्या इंग्रजीच्या पेपरमध्ये ७५ विद्यार्थ्यांवर कॉपी केसप्रकरणी कारवाई करण्यात आली. यात सर्वाधिक २० कॉपी केस नागपूर विभागामध्ये नोंदविण्यात आल्या असून, त्याखालोखाल पुणे विभागामध्ये १७ कॉपी केस नोंदविण्यात आल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली.

मॉडरेटरना पोलिसांकरवी बाहेर काढले

$
0
0
पेपर तपासणीच्या कामासाठी पुणे विभागीय मंडळाच्या कार्यालयात आलेल्या इंग्रजी विषयाच्या चीफ मॉडरेटर्सना बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलिसांकरवी शुक्रवारी बाहेर काढले.

काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता

$
0
0
यंदाच्या मोसमात थंडीचा पुरेपुर अनुभव घेतल्यानंतर आता कडक उन्हाळ्याचीही चाहूल लागली आहे. दरम्यान, राज्यात ढगाळ वातावरण असून, शनिवारी संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी हजेरी लावण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

महाराष्ट्रात मराठी-कन्नड सुखाने नांदतात

$
0
0
‘कर्नाटकातील लोकांना वाटते, की महाराष्ट्रात केवळ मराठीच बोलली जाते. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. महाराष्ट्रात मराठी कन्नड सुखाने नांदत आहेत. त्यामुळे भाषा माणसांना जोडते याचा प्रत्यय महाराष्ट्रात वावरताना येतो,’ असे मत ज्येष्ठ कन्नड लेखिका वैदेही यांनी व्यक्त केले.

मतदान केंद्राबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्र निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या निवडणुकीत संवेदनशील मतदान केंद्राबाहेर प्रथमच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. या कॅमेऱ्याद्वारे टिपले जाणारे फुटेज तपासण्यासाठी स्वतंत्र कंट्रोल रूम तयार केली जाणार आहे.

अकरा तासांच्या चर्चेनंतर बजेट मंजूर

$
0
0
बजेटमध्ये सत्ताधाऱ्यांना एक न्याय आणि विरोधकांना वेगळा न्याय लावून केलेला भेदभाव, पूर्ण न होणाऱ्या मांडण्यात आलेल्या योजना आणि त्यासाठी करण्यात आलेली फसवी तरतूद असे महापालिकेचे बजेट असल्याची टीका विरोधकांनी केली.

‘आप’तर्फे आजपासून ‘झाडू चलाओ’ अभियान

$
0
0
आम आदमी पक्षातर्फे निवडणूक चिन्ह असलेल्या झाडूच्या माध्यमातून केवळ कचराच नव्हे तर भ्रष्टाचार आणि अन्य गैरकारभारही झाडून काढण्यासाठी आजपासून (शनिवार) ‘झाडू चलाओ’ अभियान राबविण्यात येणार आहे.

अश्विनी कदम यांनी पाठिंबा काढला

$
0
0
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनमानी कारभाराला कंटाळल्याचा आरोप करून अपक्ष नगरसेविका अश्विनी कदम यांनी त्यांना दिलेला पाठिंबा शुक्रवारी काढून घेतला.

राज्यकर्त्यांनी केला जनभावनेचा आदर

$
0
0
आधुनिक शहर वसवून विकासाच्या गंगेत सहभागी होण्याचा समान हक्क मिळवून देऊन, पूर्व पुण्यासाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्यासाठी नागरी चळवळीच्या माध्यमातून आग्रही भूमिका घेतली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळीच या सर्वपक्षीय जनभावनेचा आदर केल्याने त्याचे उत्स्फूर्त स्वागत होत आहे.

पालकनीती मासिक बंद करण्याचा निर्णय

$
0
0
बदलती कुटुंबव्यवस्था, बालक-पालक नातेसंबंधांचा गेल्या २७ वर्षांपासून वेध घेत असलेल्या पालकनीती या मासिकाचा प्रवास थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन पिढीकडून मिळणारा अत्यल्प प्रतिसादासह इतरही काही व्यावहारिक समस्यांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

नियोजन फसले अन् बाप्पांचे कार्यकर्ते रुसले

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची धास्ती घेऊन कार्यक्रम उरकून घेण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा प्रकार शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) अंगलट आला. संयोजकांचे नियोजन फसल्यामुळे रुसलेल्या कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की ओढवली.

प्लास्टिक पिशवीसाठी मोजा पंधरा रुपये

$
0
0
फळांपासून ते किराणामालापर्यंत कोणत्याही गोष्टीची खरेदी केल्यावर मिळणारी प्लास्टिक बॅग यापुढे ग्राहकांना १५ रुपयांना विकतच घ्यावी लागणार आहे.

जोधपूर-यशवंतपूर एक्सप्रेसमध्ये लूट

$
0
0
जोधपूर-यशवंतपूर एक्सप्रेसमध्ये चौरट्यांनी धुमाकूळ घालत चार लाखांचा ऐवज लुटण्याचा प्रकार शुक्रवारी रात्री वसई रोड ते पुण्याचा दरम्यान झाला.

दिल्लीच्या व्यावसायिकाला अटक

$
0
0
पुणे महानगरपालिकेची बनावट टॅक्स पावती तसेच एका खासगी बँकेचे बनावट अकाऊंट डिटेल्स दाखवून पासपोर्ट मिळवणाऱ्या दिल्लीतील उद्योजकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली.

नागरिकांनो, शास्ती कर भरू नका

$
0
0
‘अनधिकृत बांधकामांबाबतचा तिढा सुटेपर्यंत नागरिकांनी शास्ती कर भरू नये, असे आवाहन महापौर मोहिनी लांडे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी (२० फेब्रुवारी) केले. मिळकतकराच्या थकबाकी वसुलीसाठी बँड वाजविण्याचा प्रकार ताबडतोब बंद करा, असे आदेशही महापौरांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

‘एमपीएससी’च्या ‘मॅनेजमेंट’मुळे इंजिनीअर अडचणीत

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या उपशिक्षणाधिकारी गट ‘ब’ आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ‘ब’च्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने दोन्ही परीक्षांसाठी अर्ज केलेले इंजिनीअर उमेदवार अडचणीत आले आहेत.

खासगी सावकारीच्या विरोधात १९३ तक्रारी

$
0
0
खासगी सावकारांनी शेतजमीन बळकाविल्यापासून चक्रवाढ दराने व्याज आकारणी केल्यापर्यंतच्या सुमारे १९३ तक्रारी सावकारी विरोधातील कायदा लागू झाल्यानंतर अवघ्या महिन्याभरात सहकार खात्याकडे आल्या आहेत.

निवडणूक ओळखपत्रात चुकांचा डबलबार

$
0
0
निवडणुका तोंडावर आल्या, तरी मतदारांची नावे आणि अचूक ओळखपत्रे देण्यास यंदाही सरकारी यंत्रणा असमर्थ ठरली आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात आशा कांबळे यांचे छायाचित्र स्वतःच्या ओळखपत्राबरोबरच भागीरथी टकले यांच्या ओळखपत्रावरही प्रसिद्ध झाले आहे.

मतदार यादीसाठी छायाचित्रे द्या

$
0
0
मतदार यादीत छायाचित्रे नसलेल्या तब्बल साडेसात लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याची कसरत निवडणूक कर्मचाऱ्यांना करावी लागत असून मतदारांनी आपली छायाचित्रे ‘मतदार मदत केंद्रा’त द्यावीत, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपूर्वा वानखेडे यांनी केले आहे.

खंडाळ्यात दोघांवर जीवघेणा हल्ला

$
0
0
जुन्या भांडणाच्या कारणावरून कामगार नेते व लोणावळा शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विजय पाळेकर व तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष गिरीष खेर यांच्या मुलांवर सातजणांनी जीवघेणा हल्ला केला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>