Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शहरात उद्या पल्स पोलिओ मोहीम

0
0
शहर आणि परिसरात येत्या रविवारी (२३ फेब्रुवारी) पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार असून, पाच वर्षापर्यंतच्या तब्बल सव्वा तीन लाख मुलांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट आहे.

उचलली जीभ लावली टाळ्याला

0
0
‘निवडणुका आल्या, की एखाद्या राजकीय पक्षाला लक्ष्य करून भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात, प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जातो. आरोप करणाऱ्यांनी पुरावेही द्यावेत, त्याची नक्की चौकशी केली जाईल; पण उचलली जीभ लावली टाळ्याला, अशा स्वरूपात वाट्टेल ते आरोप करू नयेत,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी आम आदमी पार्टीने केलेल्या आरोपांचे खंडन केले.

विधान परिषद निवडणूक

0
0
शिवसेनेच्या पुण्यातील आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह विधान परिषदेच्या आठ सदस्यांची मुदत येत्या एप्रिल महिन्यात संपुष्टात येणार असल्याने लोकसभा निवडणुकीबरोबरच विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगण्याची चिन्हे आहेत.

नवीन पालिकेला 'दादा' अनुकूल

0
0
वेगाने विस्तारणाऱ्या पुण्यात नागरिकांना अधिक कार्यक्षमतेने पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी नवीन महानगरपालिका स्थापन करण्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अनुकूलता दर्शविली.

ऑस्ट्रेलियास आंब्याची निर्यात

0
0
हापूस आंब्याची चव परदेशातील नागरिकांच्या पसंतील उतरू लागली असल्याने यंदाच्या हंगामात ऑस्ट्रेलियामध्ये आंब्याच्या निर्यातीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांमध्ये आंब्याच्या निर्यातीला सुरवात होणार होती.

कार दरीत कोसळून अपघात; तीन ठार

0
0
पुणे - नाशिक रस्त्यावर वाकीमध्ये वॅगन आर आज (शनिवार) सकाळी गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार झाले.

चाकणजवळ अपघातात ३ जण ठार

0
0
धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने भरधाव गाडी खोल ओढ्यातील दगडांवर कोसळून झालेल्या अपघातात पिंपरी-चिंचवडमधील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर झाले. पुणे-नाशिक महामार्गावर चाकणजवळच्या वाकी गावात रोहकल फाट्याजवळ शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला.

‘व्हॅलेंटाइन डे’ला पतीच्या मदतीने प्रियकराचा खून

0
0
पूर्वीचा प्रियकर पत्नीला त्रास देतो म्हणून पती-पत्नीने त्याचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मुळशी येथील बांबुर्डे येथे त्याचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पौड पोलिसांनी तळेगाव येथील एका जोडप्याला अटक केली आहे.

स्वस्ताईच्या स्वप्नाला ब्रेक?

0
0
मोठा गाजावाजा करून मांडलेल्या फळे व भाजीपाला विनियमनाचे धोरण महिन्याभरातच लागू होण्यापूर्वीच अडगळीला गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या विरोधामुळे या धोरणाच्या मार्गात अडथळे आले असून, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘राष्ट्रवादी’ला चुचकारण्याचे धोरण घेण्यात आल्याने काँग्रेसनेही या विषयावर आस्ते कदम जाण्याचे ठरविल्याचे समजते.

कोणता झेंडा घेऊ हाती...?

0
0
वर्षानुवर्षे जोपासलेली धर्मनिरपेक्षतेची पताका फडकवत ठेवायची, की काँग्रेसविरोध पुढे रेटायचा...? समाजवादी विचारांचे चेहेरे लोकसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या यादीत दिसू लागल्यामुळे राज्याच्या अन्य भागांप्रमाणेच पुण्यातील समाजवादी परिवारातही हा ‘डायलिमा’ उभा राहिला आहे.

प्लास्टिक पिशवीसाठी मोजा १५ रुपये

0
0
फळांपासून ते किराणामालापर्यंत कोणत्याही गोष्टीची खरेदी केल्यावर मिळणारी प्लास्टिक बॅग यापुढे ग्राहकांना १५ रुपयांना विकतच घ्यावी लागणार आहे. तसेच, प्लास्टिक आणि थर्माकोलच्या थाळ्या आणि ग्लासवरही पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेने शुक्रवारी घेतला.

अखेर बोर्डाला आली जाग

0
0
हॉल तिकीट नसल्याने शाळेतील रोल नंबरनुसारच प्रॅक्टिकल्स देणाऱ्या पुणे विभागातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने आता हॉल तिकीट उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विभागातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना येत्या मंगळवारी (२५ फेब्रुवारी) हॉल तिकिटांचे वाटप करण्याविषयीची सूचना बोर्डाच्या पुणे विभागीय मंडळाने शनिवारी प्रसिद्धीस दिल्याने आता विद्यार्थी आणि पालकांसोबतच शिक्षकांच्याही जिवात जीव आला आहे.

‘एलबीटी’विरोधात पुणे बंद

0
0
स्थानिक स्वराज्य संस्था कराची (एलबीटी) अंमलबजावणी जाचक पद्धतीने होत असल्याचा आरोप करीत ‘फेडरेशन ऑफ ट्रेड असोसिएशन्स ऑफ पुणे’ने येत्या सोमवारी (२४ फेब्रुवारी) पुणे बंदचा इशारा दिला आहे.

‘बीआरटी’ची डेडलाइन पुन्हा पुढे

0
0
आळंदी आणि नगररोडवरील जलद बस वाहतूक (बीआरटी) सुरू करण्यासाठी आणखी एक ‘डेडलाइन’ उलटून गेली आहे. या दोन्ही बीआरटी मार्गांवर स्वयंचलित दरवाजे बसविण्याचे काम अद्यापही अपूर्ण असून, काही ठिकाणी तर दरवाजांच्या काचाही फोडण्यात आल्या आहेत.

या हृदयीचे, त्या हृदयी... व्हाया इंटरप्रिटर

0
0
तसं बघायला गेलं, तर ‘त्यां’च्यासमोर देशाच्या माजी राष्ट्रपती बोलत होत्या. पण, त्यांचे भाषण- विचार ‘त्यांना’ ‘त्या’च्या मदतीशिवाय समजतच नव्हते. ‘त्या’च्या साइन लँग्वेजमधूनच ‘त्यां’ना माजी राष्ट्रपतींनी आपल्याला शुभेच्छा दिल्याचेही समजले. माजी राष्ट्रपतींच्या शाब्दिक शुभेच्छांमुळे उपस्थित सामान्य नागरिकांच्या टाळ्या निश्चितच वाजल्या.

आधी गावे; मग पालिका

0
0
शहराच्या हद्दीलगतच्या ३४ गावांचा समावेश पुणे महापालिकेत करून त्यानंतरच, नव्या पुण्यासाठी नवी महापालिका स्थापन करण्यासाठीच्या हालचालींना गती मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यास अत्यंत कमी कालावधी राहिला असल्याने तत्पूर्वी स्वतंत्र महापालिकेचा निर्णय घेण्याऐवजी आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यादृष्टीने सकारात्मक पावले टाकली जातील, अशी चिन्हे आहेत.

एक शाम साहिर के नाम...

0
0
‘तुम ना जाने किस जहां में खो गये...’ या गाण्याचे सूर टिळक स्मारक मंदिरात घुमले आणि क्षणार्धात साहिर लुधियानवी या शायरानं उपस्थितांना झपाटून टाकलं. प्रसिद्ध गीतकार व शायर साहिर लुधियानवी लिखित हिंदी गाण्यांचा एक आगळावेगळा कार्यक्रम नुकताच टिळक स्मारक मंदिरात झाला.

दुर्मिळ वाद्यांची सुरेल अनुभूती

0
0
मधुमती राग सुंद्रीवर सादर करत दुर्मिळ वाद्य महोत्सवाला सुरुवात झाली. डॉ. प्रमोद गायकवाड यांनी सादर केलेल्या या सुंद्रीवादनाला त्यांच्या पत्नी आणि मुलगी नम्रता गायकवाड या दोघींनी साथ केली. त्यांना नितीन गायकवाड यांनी तबल्याची साथ केली.

अवनीच्या बाहुलीचे कित्ती कित्ती कपडे

0
0
अवनी कर्वेनं तिच्या बाहुलीसाठी भरपूर कपडे शिवले आहेत. शिवणकामाची आवड असल्यामुळे तिनं स्वतःच्या हातांनी हे कपडे अगदी मन लावून तयार केले आहेत. त्यात फ्रॉक, स्कर्ट, टॉप, गाउनपासून अगदी शर्ट-पँटपर्यंत प्रचंड व्हरायटी आहे.

जिवे मारण्याच्या प्रयत्न : तिघांना अटक

0
0
पूर्ववैमनस्यातून बिगारी काम करणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. कोर्टाने त्यांना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. राजू शंकर धोत्रे ( ३२), सुनील शंकर धोत्रे ( ३५) आणि अनिल शंकर धोत्रे ( ३३, सर्वजण रा. जुनी वडारवाडी) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images