Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘टीडीआर’ प्रक्रियेत भ्रष्टाचार

0
0
विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) देण्याचे काम वेळखाऊपणाचे असल्याने सर्वसामान्य जागा मालकांना टीडीआरसाठी पालिकेत हेलपाटे मारावे लागतात. टेबलाखालून पैसे घेतल्याशिवाय फाइल पुढे सरकत नसल्याचा थेट आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभागृहात केला.

डॉक्टर नेमताहेत ‘मार्केटिंग मॅनेजर’

0
0
स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात अथवा प्रचार करण्यावर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलनं (एमएमसी) चाप लावल्यानं छोट्या क्लिनिकच्या फिजिशियनपर्यंत पोहोचण्याबरोबरच त्यांच्यामार्फत आपल्याकडे पेशंट यावेत यासाठी आता वैद्यकनगरीतील नामवंत डॉक्टरांनी खास ‘मार्केटिंग मॅनेजर’च नेमले आहेत.

‘आप’चे कार्यकर्ते माझ्या संपर्कात

0
0
आम आदमी पक्षाचे काही कार्यकर्ते आपल्या संपर्कात असून, आपल्याला पाठिंबा देऊ इच्छित असल्याचा दावा पक्षाकडून उमेदवारी न मिळालेल्या धडाकेबाज माजी सनदी अधिकारी अरुण भाटिया यांनी गुरुवारी केला आहे. अशा कार्यकर्त्यांनी आपल्याशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन भाटिया यांनी फेसबुकच्या माध्यमातून केले आहे.

शिक्षण मंडळ होणार नामधारी

0
0
केंद्र सरकारच्या ‘मोफत व सक्तीचा शिक्षण कायदा २००९’ची (आरट‌ीई) अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाल्याने शिक्षण मंडळे, प्राधिकरण, तसेच शिक्षण समित्यांना दिलेले अधिकार संपुष्टात येणार असल्याचे संकेत शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.

मुख्याध्यापकाला फासली शाई

0
0
शाळेची फी अवाजवी वाढविल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकाला शाई फासल्याचा प्रकार मोशी येथे घडला. साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निदर्शने करत शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी केली.

‘मीराभाभीं’च्या नावाची शिफारस?

0
0
आगामी निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे संभाव्य उमेदवारांच्या यादीत खासदार सुरेश कलमाडी यांच्या पत्नी मीरा कलमाडी यांच्याही नावाची शिफारस केंद्रीय निवड मंडळाकडे झाल्याची चर्चा आहे.

‘देववाणी’त रंगतेय नाट्यस्पर्धा

0
0
रात्री अभ्यास करत खोलीत बसलेली असताना अचानक येणाऱ्या आवाजाने ती खिडकीपाशी जाते. तिच्यासमोर घडतो एक सामूहिक बलात्कार. त्या धक्क्यानं तिची वाचा जाते आणि या भीषण घटनेचा परिणाम तिच्या कुटुंबावरही होतो.

मोहक स्वरांचा ‘राजम्’ आविष्कार

0
0
कधी दोन, तर कधी तीन स्वरांचा मेळ घालत स्वराविष्काराची आगळीच झलक दाखवणाऱ्या त्या व्हायोलिननं संपूर्ण सभागृह थक्क झालं होतं. व्हायोलिनवरचे ते सूर प्रत्येकाच्या कानात, मनात आणि हृदयात गुंजत होते, ते चिरकाल टिकण्यासाठीच.

अंधश्रद्धेपासून मानवी नात्यांपर्यंत

0
0
अंधश्रद्धेच्या विरोधात खंबीरपणानं लढा देणाऱ्या युवामनापासून ते आजी-नातीतल्या हळूवार नात्यापर्यंत आणि जपानी कथेपासून ते समाजातल्या कष्टकरी वर्गाचं उपेक्षितपण उलगडणारे कलाविष्कार फिरोदियाच्या तिसऱ्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरले.

अग्निटोच्या उद्‍घाटनाचा धमाका

0
0
ढोल-ताशांच्या गजरात आणि फ्लॅश मॉबच्या जल्लोषात मॉडर्न इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटतर्फे आयोजित ‘अग्निटो’ या मॅनेजमेंट फेस्टचं उद्‍घाटन शुक्रवारी झाले.

जाणू संभाजी उद्यानाचं वैभव

0
0
काही गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण असल्या, तरी अति परिचयामुळे तशा वाटेनाशा होतात. आपल्या संभाजी उद्यानाबाबत असंच झालंय. आपल्या दृष्टीनं बाग म्हणजे खेळणं आणि भेळ खाणं. त्याशिवाय तिथं वृक्षसंपदा जपलेली असते, ती आपल्या परीनं नक्कीच वैशिष्ट्यपूर्ण असते, हे आपण विसरून गेलोय.

परदेशी विद्यापीठांप्रमाणे गुणवत्ता सुधारावी

0
0
‘विद्यापीठ पातळीवरील गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध कंपन्यांनी पुढाकार घेतल्यास परदेशी विद्यापीठांच्या तुलनेत भारतीय विद्यापीठ आघाडीवर राहतील,’ असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.

‘व्हीआयपीं’च्या लगीनघाईने सर्वसामान्यांचा मात्र खोळंबा!

0
0
‘आगीतून पडून फुफाट्यात’ म्हणजे नेमके काय याचा प्रत्यय पुणेकरांना नुकताच मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आंबेगावनजीक आला. या महामार्गाला अगदी खेटूनच असणाऱ्या दोन गार्डन मंगल कार्यालयांमधील वऱ्हाडींची वाहने रस्त्यावर आल्याने नऱ्हे उड्डाणपूल ते कात्रज चौकापर्यंतच्या चार किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर दुतर्फा प्रचंड वाहतूक कोंडी पाहण्यास मिळाली.

माळढोकसाठी संवर्धनात्मक प्रजनन प्रकल्प

0
0
माळढोक पक्ष्यांचे धोक्यात आलेल्या अस्तित्वाची दखल घेत त्यांच्या संवर्धनासाठी राज्यात ‘संवर्धनात्मक प्रजनन प्रकल्प’ सुरू करण्यास राज्य वन्यजीव मंडळाने हिरवा कंदील दाखविला. या प्रकल्पासाठी नान्नझ अभयारण्यातील जागा आणि वीस कोटी रुपयांची तरतूद करण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले.

‘टोकन’ जप्त करण्याची अट बेकायदा

0
0
मुदतीत पैसे दिले नाही तर करार रद्द करून भरण्यात आलेली रक्कम (टोकन) जप्त करण्यात येईल, अशी अट बांधकाम व्यावसायिकांकडून करारात नमुद करणे बेकायदेशीर असल्याचे ग्राहक न्यायमंचाने एका केसचा निकाल देताना स्पष्ट केले.

पुणे ते गोवा सायकल शर्यत आज

0
0
द जायंट स्टारकेन डेक्कन क्लिफहँगर पुणे ते गोवा सायकल शर्यतीला आजपासून (शनिवार) सुरुवात होत आहे. पुणे ते गोवा अशा ६४३ किलोमीटरच्या शर्यतीत दहा सायकलपटू सहभागी होत आहेत. न थांबता ३२ तासांत ही शर्यत पूर्ण करण्याचे आव्हान या सायकलस्वारांसमोर असणार आहे.

श्रेयवादावरून ‘दादां’चे विरोधकांना ‘चिमटे’

0
0
‘विरोधकांची सत्ता असलेल्या ठिकाणी, ते ठरवतील तोच पाहुणा येतो. परंतु, पुण्यात उद्घाटन समारंभांचे राजकारण केले जात आहे. ही दुटप्पी भूमिका चालणार नाही’, अशा शब्दांत अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या उद्घाटनावरून सुरू असलेल्या श्रेयवादाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चिमटा काढला.

शिक्षणासाठी पुणेच ‘हॉट डेस्टिनेशन’

0
0
परदेशी विद्यार्थ्यांची भारतात शिक्षण घेण्यासाठी पुण्यालाच सर्वाधिक पसंती मिळते आहे. भारतातील शहरांपैकी सर्वाधिक विद्यार्थी पुण्यात राहत आहेत. इंटरनॅशनल कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर) या केंद्र सरकारच्या संस्थेच्या माध्यमातून पुण्यात ४२ देशांतील सुमारे नऊशे विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत असून, त्यात अफगाणिस्तानातील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

जुन्या ‘शिवनेरी’ घेणार ‘विश्रांती’

0
0
एसटीच्या ताफ्यामध्ये असणाऱ्या पाच वर्षांपुढील शिवनेरी व्होल्वो गाड्या काढण्याचा निर्णय घेण्यात आला. एसटीकडे असणाऱ्या एकूण ९० शिवनेरीपैकी २५ बसेस बदलण्यात येणार आहेत.

ठाणेदार होण्यासाठी ‘फिल्डिंग’

0
0
पोलिस आयुक्तालयातील रिक्त झालेल्या २४ पोलिस ठाण्यांच्या प्रमुखपदी वर्णी लावण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. निवडणुका तोंडावर आल्याचे लक्षात घेता आपलाच ‘अधिकारी’ त्या ठिकाणी असावा, यासाठीही दादा, बाबा, आबांकडून आयुक्तालयातील फोन खणखणू लागले आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images