Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आता शरद पवारांची मध्यस्थी

$
0
0
शहरात निर्माण झालेली कचराकोंडी फोडण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही याला यश न आल्याने कचरा प्रश्नात आता थेट केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी लक्ष घातले आहे.

प्लास्टिकवर निर्बंध आणण्याचा प्रस्ताव

$
0
0
शहरामध्ये वारंवार उद्भवणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी थर्माकोल आणि प्लास्टिकवर निर्बंध आणण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडण्यात येणार आहे. आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच प्लास्टिक, थर्माकोलवर बंदीचे सूतोवाच विकास देशमुख यांनी केले होते.

आता आर्किटेक्चरमध्येही रोबोटिक्स

$
0
0
रोबोटिक्स ही संकल्पना चित्रपटानंतर केवळ मोठ्या इंडस्ट्रीपुरती मर्यादित राहिली नसून आर्किटेक्चरमध्येही त्याचा वापर होऊ लागला आहे. याच तंत्रज्ञानाचा आधार घेऊन सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेनुसार उघडझाप होऊ शकणारी भिंत अर्थात इंटरअॅक्टिव्ह पॅनेलचे मॉडेल ‘डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्टचर फॉर विमेन’च्या विद्यार्थिनींनी सादर केले आहे.

कचरा प्रकल्पांचे ऑडिटच नाही

$
0
0
शहरातील छोट्या रस्त्यांपासून ते अनेक मोठ्या प्रकल्पांपर्यंत केल्या जाणाऱ्या खर्चाचे ‘ऑडिट’ होत असताना, हंजरसह शहरातील एकाही बायोगॅस प्रकल्पाचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’च अद्याप एकदाही झालेले नाही.

वीजबिले होणार अचूक

$
0
0
चुकीचे मीटर रीडिंग... घरे बंद असल्याने सरासरी रीडिंग... आणि अंदाजे बिले... चुकीच्या वीजबिलांमुळे हैराण होणाऱ्या राज्यातील लाखो वीजग्राहकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. मानवी हस्तक्षेपाला पूर्णपणे फाटा देणारी सेंट्रल मीटर सिस्टीम येत्या काही काळात लागू करण्यात येत असल्याने शंभर टक्के अचूक वीजबिले मिळणार आहेत.

९०% सोनोग्राफी केंद्रात त्रुटी

$
0
0
राज्यातील चारही दक्षता पथकाने अचानकपणे तपासणी केलेल्या सोनोग्राफी केंद्रांमध्ये अद्यापही एफ फॉर्म अपूर्ण, रजिस्टरमध्ये पेशंट नोंदणी अर्धवट यासारख्या त्रुटी पुन्हा आढळल्या आहेत.

नव्वद टक्के सोनोग्राफी केंद्रांत त्रुटी

$
0
0
राज्यातील चारही दक्षता पथकाने अचानकपणे तपासणी केलेल्या सोनोग्राफी केंद्रांमध्ये अद्यापही एफ फॉर्म अपूर्ण, रजिस्टरमध्ये पेशंट नोंदणी अर्धवट यासारख्या त्रुटी पुन्हा आढळल्या आहेत. त्यामुळे तपासणी केलेल्या ३२७ पैकी ९० टक्के सोनोग्राफी केंद्रांना दक्षता पथकाने संबंधित जिल्ह्याच्या सिव्हील सर्जनमार्फत नोटीस जारी केल्या आहेत.

सामाजिक बदलांची मुहूर्तमेढ गरजेची

$
0
0
लोकमान्य टिळकांना हवे असलेले स्वराज्य आपल्याला मिळालेले असले, तरी सुराज्य मिळविण्यासाठी आपल्याला अद्यापही झगडावेच लागत आहे. त्यासाठीच्या सामाजिक बदलांची मुहूर्तमेढ शहरांमधूनच रुजविणे गरजेचे असल्याचे मत केपीआयटी टेक्नोलॉजीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिशेखर उर्फ रवी पंडित यांनी शनिवारी व्यक्त केले.

कँटोन्मेंट मलनिस्सारण प्रकल्पाला केंद्राच्या मान्यतेची प्रतीक्षा

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाकडून बुटी स्ट्रीट येथे उभारण्यात येणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पाचा अहवाल अंतिम मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्र सरकारकडून मान्यता मिळाल्यास हा प्रकल्प मार्गी लागू शकणार आहे.

खेळाडू हल्ला; अटकपूर्व जामीन फेटाळला

$
0
0
टेनिसमध्ये देशाच्या संघात खेळणाऱ्या विक्रम साबळे या १६ वर्षीय खेळाडूवर खुनी हल्ला केल्याप्रकरणी एकाचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. ए. काझी यांच्या कोर्टाने हा जामीन फेटाळला.

पोलिसावर वार करणारे अटकेत

$
0
0
खडकी रेल्वे स्थानकावर संशयास्पदरित्या फिरत असताना कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसावर दगडफेक करून आणि ब्लेडने वार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी एका नेपाळी नागरिकांसह दोघांना अटक केली आहे.

सोनसाखळी हिसकावल्याचे शहरात ३ गुन्हे

$
0
0
आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पायी चाललेल्या आजींच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावण्यात आले आहे. या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आशा अनंत यमकनमडी (वय ६५, रा. कर्वेनगर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

खेळाडू हल्ला; अटकपूर्व जामीन फेटाळला

$
0
0
टेनिसमध्ये देशाच्या संघात खेळणाऱ्या विक्रम साबळे या १६ वर्षीय खेळाडूवर खुनी हल्ला केल्याप्रकरणी एकाचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. ए. काझी यांच्या कोर्टाने हा जामीन फेटाळला.

राज्याच्या महसूल वाढीसाठी परदेशींची बदली

$
0
0
‘पिंपरी- चिंचवडच्या आयुक्तपदावर श्रीकर परदेशी यांना मीच आणले होते. मात्र, राज्याचा महसूल वाढवणे, आणि मुद्रांक शुल्क विभागाचा कारभार पारदर्शी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुचविल्यानुसार परदेशी त्यांची तेथे बदली करण्यात आली आहे,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

‘PMP’चे ब्रेक अभिनव चौकात फेल

$
0
0
टिळक रोडवरील अभिनव चौकात ‘पीएमपी’च्या कार्यालयीन कामासाठी वापरल्या जाणाऱ्या बसचे अचानक ब्रेक फेल झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. बसचालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे दुर्घटना टळली. एका घटनेत एका दुचाकीचा चुराडा झाला.

प्रभाकर वाघेरे यांचे नगरसेवक पद धोक्यात

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रभाकर वाघेरे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करावे, तसेच त्यांच्या जातवैधतेबाबत फेरतपासणी करावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे वाघेरे यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे.महापालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक ४५ मधून प्रभाकर वाघेरे राष्ट्रवादी पक्षातर्फे निवडून आले होते.

थंडीची तीव्रता आणखी वाढणार

$
0
0
शहर आणि परिसरात शनिवारी किमान तापमानात पुन्हा घट झाली, तर बोचऱ्या वाऱ्यांमुळे दिवसभर गारवा कायम राहिला होता. गेल्या दोन दिवसांपासून दिवसभर जाणवणाऱ्या बोचऱ्या वाऱ्यांचा प्रभाव कायम असताना, आगामी दोन-तीन दिवसांत थंडीची तीव्रता आणखी वाढणार असल्याचे संकेत पुणे वेधशाळेने दिले आहेत.

विद्यापीठाला १० लाखांचा ‘खड्डा’

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी अपेक्षित मान्यवरांचे ‘बिझी श्येड्युल’ यंदा विद्यापीठाला आठ ते दहा लाख रुपयांच्या खर्चात टाकणारे ठरण्याची शक्यता आहे. एरवी विद्यापीठ वर्धापनदिनाला जोडून असणाऱ्या पदवीदान समारंभासाठी यंदा या मान्यवरांच्या तारखा न मिळाल्याने विद्यापीठाला पदवीदान समारंभासाठी नव्याने मांडव उभारावा लागणार आहे.

‘भामा- आसखेड’चा मार्ग मोकळा

$
0
0
भूसंपादन, विविध सरकारी खात्याच्या परवानग्या यामध्ये अडकून पडलेल्या भामा-आसखेड धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पाचा मार्ग आता पूर्ण मोकळा झाला आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी पिंपरी-चिंचवड पालिका आणि आळंदी नगरपरिषदेने तातडीने ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिले.

'त्या' भामट्यांना कोठडी

$
0
0
फ्लॅट विक्रीची ग्राहकांकडून रक्कम गोळा करून बँकेत जमा न करता वाही मंत्रा व्हेंचर्स यांची नऊ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कोर्टाने त्यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images