Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पवार, कलमाडींनी लावली वाट

$
0
0
‘पीएमपीच्या बसला दरवाजा कोणत्या बाजूला असावा यावरून भांडणाऱ्या अजित पवार आणि सुरेश कलमाडी यांनी पुण्याची अक्षरशः वाट लावली आहे,’ असा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी केला.

सरकार विकणार जेनरिक औषधे

$
0
0
प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या पेशंटला जेनरिक औषधेच मोफत देण्यात येणार असल्याने त्यामुळे तीच औषधे पेशंटला देण्याचे आदेश आरोग्य खात्याने सरकारी डॉक्टरांना दिले आहेत.

बेनामी प्रॉपर्टीचा शोध

$
0
0
भारत-पाक युद्धानंतर पाकिस्तानमध्ये कायमस्वरूपी स्थायिक झालेल्या नागरिकांच्या राज्यभरातील बेनामी प्रॉपर्टीचा शोध घेण्यात येत असून पुण्यातील अशा प्रॉपर्टी शोधून काढण्याच्या सूचना ‘एनिमी प्रॉपर्टी ऑफ इंडिया’चे कस्टोडियन डी. साहू यांनी केली आहे.

आता कचरा ‘विखुरणार’

$
0
0
गेले सहा दिवस शहरभरात उभी राहिलेली ‘कचराकोंडी’ अखेर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मध्यस्थीने शनिवारी फुटली. संपूर्ण शहरभरातील कचरा फुरसुंगी आणि उरळी देवाची या एकाच भागात न येता विकेंद्रित व्यवस्था उभी करण्याचा निर्णय गावकरी व महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

जर्मन शैक्षणिक संधींचा उलगडला पट

$
0
0
जर्मन भाषा येत नसेल, तर जर्मनीत शिक्षणासाठी काही अडचणी येतात का... जर्मनीमध्ये शिकता शिकता नोकरी करता येते का... इंटर्नशिप कशी मिळवायची... तिथे संशोधनासाठी जायचे असेल, तर काय करायचे... ब्लॉक अकाउंट म्हणजे काय...

‘रवी मी’त रंगलेली ‘वसंत’संध्या

$
0
0
प्रख्यात गायक वसंतराव देशपांडे यांनी गायलेल्या या गाण्यानं कित्येक आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. मुलगी सासरी पाठवतानाची नेमकी भावना शब्दांप्रमाणेच आपल्या गायकीतूनही वसंतरावांनी उत्कटपणे पोहोचवली. त्याचाच प्रत्यय परत अनुभवता आला, तो ‘शुभ्र फुलांची ज्वाला’ या कार्यक्रमात.

ऐतिहासिक वास्तूंसाठी मिळणार निधी

$
0
0
‘राज्यातील सरकारी मालकीच्या ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी राज्य सरकारतर्फे विशेष निधीची तरतूद केली जाणार आहे. मुंबई आणि नागपूर येथील जिल्हा नियोजन समितीला ऐतिहासिक इमारतींच्या संवर्धनासाठी प्रत्येकी २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

टक्केवारीसाठीच सत्ताधाऱ्यांच्या नव्या योजना

$
0
0
‘राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोन्ही पक्ष विकासाच्या नावाखाली महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करत असून केवळ टक्केवारी खाण्यासाठीच ते राज्यात नवनव्या योजना राबवीत आहेत.

भोर औद्योगिक वसाहतीचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

$
0
0
‘भोरमधील औद्योगिक वसाहतीच्या अडचणींमागे कोणते झारीतील शुक्राचार्य आहेत यामध्ये मला जायचे नाही. परंतु, ज्या जमिनीमध्ये कुसळाशिवाय काहीही पिकत नाही, अशा वरकड जमिनीला विरोध कसा होतो, याचा शोध घ्यावा लागेल. वरकड जमिनीमध्ये औद्योगिक वसाहत उभी राहण्यासाठी निवडणूक झाल्यानंतर मार्ग काढू,’ असे आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी भोर येथे दिले.

नागरिकांचे शुद्ध पाण्यासाठी ठिय्या आंदोलन

$
0
0
राजगुरुनगर शहर व परिसरातील पाच गावांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी गेल्या आठ दिवसांपासून खेड पंचायत समितीसमोर चक्री उपोषणाला बसलेल्या तालुका काँग्रेसच्या वतीने रविवारी शहरातून मोर्चा काढून पुणे नाशिक महामार्गावरच जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आळंदी रोड ‘आरटीओ’ आवारात आग

$
0
0
आळंदी रोडवरील प्रादेशिक परिहवन कार्यालयाच्या (आरटीओ) आवारातील स्क्रॅप वाहनांना रविवारी सायंकाळी अचानक लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले आहे. फायर ब्रिगेडच्या जवानांनी दहा मिनिटांत आग आटोक्यात आणत मोठी दुर्घटना टाळली.

तलवारीचा धाक दाखवून पुणे-सातारा मार्गावर लुटले

$
0
0
पुणे-सातारा महामार्गावर गोगलवाडी फाट्यावर गाडीचे दिवे दुरुस्त करण्यासाठी उभ्या असलेल्या मोटारमालक व त्याच्या इतर तीन सहकाऱ्यांना अनोळखी इसमांनी तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रकमेसह एक लाख ३२ हजाराचा ऐवज लंपास केला.

हाय-वे वर थांबू नका.. तुम्ही असुरक्षित आहात

$
0
0
पुणे-सातारा महामार्ग, कात्रज-कोंढवा रोडवर रात्रीच्या वेळी गाडी थांबवली तर तुम्हाला लुटण्याची शक्यता अधिक आहे. गेल्या एक फेब्रुवारीपासून लुटमारीच्या पाच घटना घडल्या असून चोरट्यांना गजाआड करण्यास ग्रामीण तसेच शहर पोलिसांना अपयश येत आहे.

गैरसमज पसरविणारी आंदोलने नागरिकांनी ‘टोल’विली

$
0
0
रस्ते बांधताना सरकारने धोरणात्मक विचार करण्यात गैर काय? नेतृत्वावर टीका करत समाजात गैरसमज पसरवून आंदोलने झाली खरी. मात्र, त्याला जनतेचा पाठिंबा मिळाला नाही, अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ‘मनसे’च्या आंदोलनावर हल्लाबोल केला.

अतिरिक्त शिक्षक ८ महिन्यांपासून पगाराविना

$
0
0
महानगरपालिका मान्य खासगी शाळांमधील पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरलेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गेल्या वर्षीच्या जुलैपासून पगारापासून वंचित राहिले आहेत.

मेहुणीवर बलात्कार करणाऱ्याला सक्तमजुरी

$
0
0
पत्नीच्या प्रसूतीसाठी घरी आलेल्या मेहुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला सात वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रमुख न्यायाधीश कालिदास वडणे यांच्य कोर्टाने हा आदेश दिला.

‘ATM’ तक्रार निवारणास आठवड्याची मुदत

$
0
0
एटीएम मधील ट्रंझॅक्शन फेल झाली, किंवा चुकून कमी पैसे मिळाले, तर अशा तक्रारींची दुरुस्ती सात दिवसांमध्ये करणे आवश्यक आहे. मात्र, सात दिवसांमध्ये ही दुरुस्ती न झाल्यास बँकेकडून दररोज शंभर रुपयांनुसार ग्राहकाल भरपाई देण्याचा आदेश रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच दिला आहे.

आरोग्य विद्यापीठाचा अखेर जागेसाठीचा शोध संपला

$
0
0
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुणे विभागीय कार्यालयासह विविध अभ्यासक्रम चालविण्यासाठी औंध येथील आरोग्य खात्याच्या ताब्यातील सुमारे पावणेदोन एकर जागा देण्याचा तत्वतः निर्णय घेण्यात आला आहे.

शहरात ठिकठिकाणी कचराकुंड्या पेटविल्या

$
0
0
फुरसुंगी येथील उरुळी ग्रामस्थांनी सुरू केलेले कचरा आंदोलन मागे घेतल्याने शनिवारी रात्रीपासून कचरा उचलण्यास सुरुवात केल्याचा दावा पालिकेने केला आहे. मात्र, असे असले तरी रविवारी सकाळीच शहरातील बहुतांश भागातील कचराकुंड्या पेटविण्यात आल्याने अनेक रस्त्यांवर धुराचे लोट पहायला मिळत होते.

आधार तुटलेल्या डीपीची दुरवस्था

$
0
0
नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर सितेवाडी येथे असलेल्या बाराशे व्होल्टचा धोक्याचा निर्देश असलेली डीपी एका बाजूचा आधारक खांब तुटल्याने धोकादायक बनला आहे. डीपीची ही अवस्था गेल्या वर्षभरापासून अशाच स्थितीत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images