Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शहर वाढले अन् वाहतूक कोंडीही!

0
0
शहराचा विस्तार वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला पूर्व पुण्यातील वाहतूक समस्यांच्या कोंडीमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. पुण्याहून सोलापूर आणि बारामतीला जोडणाऱ्या या रस्त्यांवर ये-जा करणाऱ्या वाहनांच्या संख्येमध्ये दररोज वाढ होत असली, तरी या ठिकाणचे रस्ते आणि वाहतुकीचा प्रश्न मात्र ‘जैसे थे’ स्थितीतच आहे.

अधिक सोयींसाठी हवी नवी महापालिका

0
0
पुणे महापालिकेमध्ये सध्या हडपसर परिसराचा आवाज अधिक बुलंद आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा पालिकेतील सत्ता मिळविल्यानंतर महापौर होण्याचा मान वैशाली बनकर यांना मिळाला. पूर्व पुण्याच्या पालिकेबाबत त्यांनी व्यक्त केलेल्या भावना...

मेट्रोसाठी कर्जातून निधी

0
0
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय नगरविकास खात्याने तत्त्वतः मान्यता दिल्यानंतर प्रकल्पाच्या रकमेच्या ५० टक्के निधी कर्जरूपातून उभारण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी दिली.

प्रॉपर्टी टॅक्सच्या ‘हरकतीं’साठी नागरिकांना नोटिसा

0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाने यावर्षीपासून प्रॉपर्टी टॅक्सच्या दरामध्ये पाच टक्क्यांपासून ते दहा टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याने नागरिकांवरील टॅक्सचा बोजा वाढणार आहे. नवीन दराने कर आकारणीबाबत नागरिकांच्या हरकती आणि सूचना असल्यास त्या देण्यासाठी बोर्डाकडून संबंधित नागरिकांना नोटिसा पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

‘भामा-आसखेड’साठी ५९ कोटी मंजूर

0
0
शहराच्या पूर्वभागाला भामाआसखेड धरणातून पाणी देण्यासाठी ५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, येत्या आठ दिवसांत हा निधी महापालिकेला मिळणार आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या विस्तारीकरणासाठीही केंद्र सरकारने निधी मंजूर केला आहे.

कीर यांच्या लिखाणानेच वाचक चरित्रांकडे

0
0
‘चरित्रनायकाच्या आयुष्यातील विविध घटनांची योग्य खातरजमा झाल्याशिवाय डॉ. धनंजय कीर यांनी कोणाच्याही चरित्राचे लेखन केले नाही. त्यांनी नेहमीच सत्याच्या जवळ जाणारे लिखाण केले. मराठी वाचकांना चरित्र, आत्मचरित्रांकडे वळविण्यात डॉ. कीर यांचा मोलाचा वाटा आहे. अशी चरित्रे मराठीत आल्यानेच मराठी साहित्य प्रगल्भ झाले,’ असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक डॉ. अरुण टिकेकर यांनी व्यक्त केले.

कंत्राटी वीज कामगारांचे आंदोलन मागे

0
0
कंत्राटी वीज कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार संघटना आणि व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींची समिती नियुक्त करावी, असा प्रस्ताव गुरुवारी देण्यात आला. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.

२५ हजार पक्ष्यांची नोंद

0
0
नष्ट होत असलेला अधिवास, अन्नाचा तुटवडा आणि कीटकनाशकांच्या वाढत्या वापराचा परिणाम पक्ष्यांवर होत आहे. अस्तित्त्वाची लढाई लढणाऱ्या १८१ जातीच्या २५ हजार १६० पक्ष्यांची नोंद यंदाच्या राज्यव्यापी गणनेमध्ये झाली आहे.

नव्या पालिकेची तहान सहज भागेल

0
0
पूर्व पुण्यासाठी स्वतंत्र महापालिका झाल्यास पाण्याची तहान भागविण्यासाठी वर्षाकाठी चार ते पाच टीएमसी पाण्याची गरज लागणार असल्याचे सांगितले असले, तरी शहराच्या पूर्व भागासाठी भामा-आसखेड प्रकल्पातून मंजूर झालेले अडीच टीएमसी पाण्यामुळे ही तहान भागू शकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

‘व्हॅलेंटाइन’ हवा सैन्यदलांतला

0
0
आयुष्यभरचा जोडीदार निवडताना डॉक्टर-इंजिनीअरिंग, आयटी-सॉफ्टवेअरची लाट असली, तरी आता ‘मेन इन युनिफॉर्म’, अर्थात लष्करातील अधिकारी आपला ‘व्हॅलेंटाइन’ असावा, अशी क्रेझही तरुणींमध्ये वाढते आहे. शिस्तबद्ध, ‘रॉयल’ जीवनशैली, आधुनिक विचारांचे कौटुंबिक वातावरण, अधिकाऱ्यांच्या पत्नींना मिळणारा आदर आदी कारणांमुळे लष्करी अधिकाऱ्याच्या गळ्यात वरमाला टाकण्याकडे विवाहेच्छुक उच्चशिक्षित तरुणींचा कल वाढत आहे.

५० बाल-युवा कलाकारांचा ‘गुंजन’ सोहळा

0
0
डॉ. रेवती कामत, अपर्णा केळकर आणि संध्या धर्म यांच्या शिष्यपरिवारातर्फे ‘गुंजन’ हा ५० बाल आणि युवा कलाकारांचा अभिजात संगीत-नृत्याविष्कार सादर होणार आहे. या तिघींसह चैतन्य कुंटे यांचाही या कार्यक्रमाच्या मूळ संकल्पना आणि निर्मितीत सहभाग आहे.

स्वच्छतेच्या गावाला एक भेट...

0
0
गांधीजी आणि त्यांचं कार्य याची माहिती सगळ्यांनाच असते. स्वातंत्र्यलढ्यासोबत त्यांनी आणखी एक लढा तितक्याच तीव्रतेनं दिला होता, तो होता अस्वच्छतेच्या विरोधातला. पर्यावरणाच्या रक्षणासाठीचा. गांधीजींचं पर्यावरणाच्या आणि स्वच्छतेच्या बाबतीतलं योगदानही मोठं आहे.

वीजबिले होणार शंभर टक्के अचूक

0
0
चुकीच्या वीजबिलांमुळे हैराण होणाऱ्या राज्यातील लाखो वीजग्राहकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. मानवी हस्तक्षेप पूर्णपणे टाळणारी सेंट्रल मीटर सिस्टीम येत्या काळात लागू करण्यात येत असल्याने शंभर टक्के अचूक वीजबिले मिळणार आहेत.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळ लवकरच वन्यजीव अॅकॅडमी

0
0
वनसंवर्धनाच्या चळवळीत वनकर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अपडेट ठेवण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळ लवकरच वन्यजीव अॅकॅडमी, तर इको टुरिझमला चालना देण्यासाठी चिखलदरामध्ये पर्यटन प्रशिक्षण अॅकॅडमी सुरू होईल, अशी घोषणा राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम यांनी शुक्रवारी केली.

आरोग्य केंद्रांना डॉक्टर देणार मोफत औषधे

0
0
प्राथमिक आरोग्य केंद्रांत येणाऱ्या गरीब पेशंटला चांगल्या दर्जाची औषधे सहजरित्या उपलब्ध व्हावी यासाठी शहरातील विविध पॅथींचे डॉक्टर आता औषध कंपन्यांकडून मिळणारी औषधे थेट या केंद्रांसाठी मोफत देणार आहेत.

हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट उघड

0
0
म्हाळुंगे येथील राज लॉजिंग अँड रेस्टॉरंट या हॉटेलवर छापा टाकून पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील तरुणींकडून चालविल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या गुन्ह्यात चार मुलींची सुटका करण्यात आली असून, चौघांना अटक करण्यात आली आहे.

रेल्वेचे प्रवासी घटले

0
0
पुण्याहून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना कायमच गर्दी असल्याचे चित्र असले, तरी दुसऱ्या बाजूला लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांनी प्रवास करणाऱ्यांची संख्या चार टक्यांनी कमी झाली आहे.

सीए परीक्षा पुढे ढकलल्या

0
0
आगामी लोकसभा निवडणुकांमुळे सीएच्या परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. सीएची इंटरमिजीएट परीक्षा २७ मे ते २८ जून दरम्यान घेण्यात येणार आहे. कॉमन प्रोफेशनल टेस्ट २२ जून रोजी होणार आहे. सीएची अंतिम परीक्षा २६ मे ते नऊ जून दरम्यान होणार आहे. देशामध्ये १५७ सेंटरवर ही परीक्षा होणार आहे.

बोर्डातर्फे समुपदेशन सेवा

0
0
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण आल्यास तो वेळीच दूर व्हावा, आणि त्यांना नैराश्यातून बाहेर पडता यावे, यासाठी त्यांना तज्ज्ञ समुपदेशकांची मदत मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फोनवरून समुपदेशनाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संजय दत्तचा पॅरोल अर्ज मंजूर करण्याची शिफारस

0
0
बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तला आणखी एकदा पॅरोल मंजूर करावा, अशी शिफारस मुंबई पोलिसांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे पाठविलेल्या अहवालात केली आहे. या पॅरोलबाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नाही.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images