Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मोक्याच्या जागा सभांना देण्याचा प्रस्ताव

$
0
0
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात सभा घेण्यासाठी अडचण होऊ नये, म्हणून गेल्या निवडणुकीत शहराच्या विविध भागांमध्ये देऊ केलेल्या अडीचशे जागा यंदाही सभांसाठी उपलब्ध करून देण्याबाबत पोलिस प्रशासन विचार करीत आहे.

विस्तारणा‍ऱ्या उपनगरांसाठी.... हवी स्वतंत्र महापालिका

$
0
0
हक्काच्या निधीसापासून वंचित राहिलेल्या पूर्व भागाला विकासाच्या गंगेत सामावून घेण्यासाठी हडपसर-हवेली स्वतंत्र महापालिकेची स्थापना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत सर्वपक्षीय आमदार, आजी-माजी नगरसेवक, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि नागरिकांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला.

नवीन पालिकेला पहिल्यापासूनच पाठिंबा – आढळराव पाटील

$
0
0
राजकीय, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक आघाडीवर नेतृत्व करणाऱ्या दिग्गजांची मांदियाळी पूर्व पुण्यात आहे. नवीन पुण्यासाठी नवीन महापालिका असावी, असे त्यांचेही ठाम मत आहे. या मोहिमेच्या निमित्ताने पूर्व पुण्याच्या विकासासंदर्भात या नेतृत्वाचा जाणून घेतलेला हा कल…

स्वतंत्र महानगरपालिकाच आम्हाला न्याय देईल

$
0
0
पुणे महानगर पालिकेला स्वत:च्या परिसराचा विकास करता येत नाही. वाढत्या बोजामुळे त्यांच्या विकासाला मर्यादा येत आहेत. रस्त्यावरील एका चेंबरचे काम चार वेळा करावे लागत आहे. अशा परिस्थितीत, आमच्या गावांचा कारभार पुणे महापालिका कसा करणार?

महायुतीच्या सत्तेचा आठवलेंचा दावा

$
0
0
केंद्रातील आघाडी सरकारने केलेल्या भ्रष्टाचारामुळे देशात महागाई वाढली. त्यांच्या सरकारने देशाचा सत्यानाश केला, असा आरोप करून महायुतीची सत्ता येईल,’ असा दावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी (आठ फेब्रुवारी) केला. महायुती सत्तेवर आल्यावर दलित-मुस्लिम-ख्रिश्चन-परप्रांतीय महासंघाने केलेल्या मागण्या मान्य करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

साखर खरेदीला मुहूर्त सापडेना

$
0
0
गेल्या सात महिन्यांत अनुदान मंजूर होऊनही राज्यातील रेशनकार्डांसाठीच्या साखर खरेदीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. टेंडर प्रक्रियेतील अटींमुळे साखर खरेदीत अडसर येत असल्याची टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने थेट कारखान्यांकडून साखर खरेदीचे धोरण स्वीकारावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

तीन वर्षांत २५ लाख व्हीआयपी?

$
0
0
सातारा रोडवरील खेड शिवापूर आणि आणेवाडी येथील टोलनाक्यांवरून गेल्या तीन वर्षांत तब्बल २५ लाख व्हीआयपी गेल्याचा ‘चमत्कार’ घडला आहे. याच दोन्ही टोलनाक्यांवरून अन्य ४० लाख वाहने टोल न भरता गेल्याचेही नोंदविण्यात आले आहे.

टोलचा रस्ता बंद!

$
0
0
‘टोल भरणाऱ्या सर्वसामान्यांशी सरकारला काही देणे-घेणे नाही. सरकारात बसलेले फक्त स्वतःच्या तुंबड्या भरताहेत. आम्ही काय यांना इलेक्शन फंड देत राहायचा काय’, असा सवाल करीत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पुण्यात टोलविरोधी तोडफोड आंदोलनाला ‘रस्ता बंद’ची जोड दिली.

भावनांना काव्यात गुंफणारा अवलिया

$
0
0
‘चौधवी का चांद हो या आफताब हो’, ‘दो हंसो का जोडा’, ‘मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे’ अशा काव्यातून मानवी भावनांची तरल गुंफण करणाऱ्या अवलियाचे विविधरंगी पैलू ‘एक कवी एक भाषा’ कार्यक्रमातून उलगडले. अविट गोडीच्या काव्यासह ज्येष्ठ कवी आणि उर्दू शायर शकील बदायुनी या उपेक्षित व्यक्तिमत्त्वाची माहिती रसिकांना या उपक्रमातून मिळाली.

यंदाचे वर्ष कमी पावसाचे

$
0
0
मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्यानंतर चालू वर्ष मात्र, सरासरीपेक्षा कमी पावसाचे ठरण्याची शक्यता आहे. मान्सूनवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या ‘एल निनो’ या घटकाच्या प्रभावामुळे यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान क्षेत्रातील ‘स्कायमेट’ या वेबसाइटने वर्तविला आहे.

दाटली गर्दी ओंकारेश्वरी!

$
0
0
‘आपल्या ओंकारेश्वराच्या मंदिराला नऊ कळस आहेत. त्या कळसाच्या खाली आठ घुमट आहेत. हे कळस आणि त्याखालच्या प्रत्येक घुमटावरील नक्षी वेगळी आहे. घुमटाच्या पाकळ्यांची संख्या वेगवेगळी आहे.

‘गॅस एजन्सीकडून ग्राहकांची लूट’

$
0
0
एजन्सीमधून घरगुती सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ग्राहकांना कॅशकॅरीचे रुपये कमी करण्यात येत नाहीत. यामुळे दररोज सरासरी दोन हजार रुपयांची लूट गॅस एजन्सीकडून होत आहे, असा आरोप करण्यात आला आहे. गॅस सिलेंडर घरपोच देणे एजन्सीला बंधनकारक आहे.

चाकणमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी

$
0
0
येथील आंबेडकरनगर येथे लहान मुलांच्या भांडणांच्या किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत चाकण महिला दक्षता समितीच्या सदस्यासह तीन महिला जखमी झाल्या, तर तीन दुचाकी गाड्यांची मोडतोड करण्यात आली. या हाणामारीत कोयता, लोखंडी गज, हॉकी स्टिक व लाकडी दांडक्यांचा वापर करण्यात आला.

भोरमधील सभेकडे नगरसेवकांची पाठ

$
0
0
भोर नगरपरिषदेच्या २०१३-१४ च्या सुधारित व २०१४-१५च्या वार्षिक अंदाजपत्रकावर चर्चा करून ते मंजूर करण्यासाठी घेतलेल्या सभेला सत्ताधारी गटाच्या सर्वच नगरसेवकांनी पाठ फिरवल्यामुळे सभा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षा दिपाली शेटे यांच्यावर ओढवली.

राजगुरुनगरमध्ये पाण्यासाठी रास्ता रोको

$
0
0
गेली अनेक वर्ष दूषित पाणी प्यावे लागत असलेल्या राजगुरुनगरवासीयांना कायमस्वरूपी पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी धूळ खात पडलेली कडूस प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. त्यासाठी रास्ता रोको करण्यात आले.

‘अन्नसुरक्षे’साठी बायोमेट्रिक पद्धत

$
0
0
अन्नसुरक्षा योजनेतील धान्य वितरणासाठी शिरूरच्या धर्तीवर बायोमॅट्रिक्स पद्धत अवलंबण्याबरोबरच या धान्याच्या वाटपावर ‘लक्ष’ ठेवण्यासाठी रेशन दुकानांच्या तपासण्या वाढविण्याची सूचना पुरवठा सचिव दीपक कपूर यांनी केली आहे.

HMV ची पर्मनंट लायसन्स परीक्षा भोसरीत

$
0
0
जड वाहनांचे पर्मनंट लायसन्स काढण्यासाठी आरटीओकडून घेण्यात येणारी चाचणी भोसरी येथील एसटी महामंडळाच्या ट्रॅकवर घेण्यात येणार आहे. येत्या १५ फेब्रुवारीपासून या उपक्रमाला सुरूवात होणार असल्याचे पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले.

मनमानी रिक्षाचालकांवर कारवाई

$
0
0
शहरात मनमानी करणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरोधात पुणेकरांनी गेल्या दहा महिन्यांत ९७७ तक्रारींची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) केली आहे. एकूण तक्रारींपैकी ६९७ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, रिक्षाचालकांकडून तीन लाख ६१ हजार ६२५ रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे.

दिलेल्या मुदतीत TDS भरा

$
0
0
गृहनिर्माण सोसायट्यांनाही टॅक्स डिडक्टेड अॅट सोर्स (टीडीएस ) लागू होतो. परंतु, सध्या पुणे शहरातील १५ ते १६ हजार सोसायट्यांपैकी केवळ एक ते दोन टक्के सोसायट्याच टीडीएस भरत आहेत.

रोमँटिक दिवसांसाठी आली गुलाबी हवा

$
0
0
उन्हाळ्याची चाहूल लागणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात पुण्यासह राज्यात थंडीचे पुनरागमन झाले आहे. राज्यातील सर्वात निचांकी तापमान (७.६ अंश सेल्सियस) नगर आणि नाशिक येथे नोंदले गेले; तर पुण्यात ७.८ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images