Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

४६ कचरागाड्यांची हडपसरमध्ये तोडफोड

0
0
हडपसर औद्योगिक वसाहतीमधील अजिंक्य कचरा प्रोसेस डेपोच्या मागे असलेल्या महापालिकेच्या व्हेइकल डेपोमध्ये उभ्या असलेल्या ४६ कचरा गाड्यांच्या काचा सोमवारी काही अज्ञात तरुणांनी फोडल्या.

कचरा प्रश्न पुन्हा पेटणार

0
0
उरुळी देवाची येथील कचरा डेपोत येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या सोमवारी ग्रामस्थांनी परत पाठविल्याने शहरातील कचरा कोंडी पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. उरुळी देवाची येथील ग्रामस्थांनी पुन्हा सुरू केलेल्या या कचरा बंद आंदोलनामुळे तीन हजार टन कचरा शहरात पडून असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

१० विद्यापीठांना फेरमूल्यांकन नको?

0
0
राज्यातील किमान दहा विद्यापीठांनी राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद अर्थात ‘नॅक’कडून फेरमूल्यांकन करून घेण्याबाबत अनास्था दाखवली आहे. यात पुण्यातील दोन विद्यापीठांचाही समावेश आहे.

शिक्षण मंडळाच्या कम्प्युटर खरेदीवर ठपका

0
0
महापालिकेच्या शिक्षण मंडळाने एक कोटी रुपयांची कम्प्युटर खरेदी करताना बाजारपेठेतील दरांची चौकशी केली नसल्याचा ठपका विभागीय आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात ठेवण्यात आल्याचे समजते.

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये राडा

0
0
एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये लोकसभेसाठी आघाडीच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे पुणे जिल्हा परिषदेत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने सोमवारी जोरदार राडा झाला.

‘मनसे’तही राजचा ‘टीआरपी’ घटला!

0
0
माध्यमविश्वातील ‘टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट’बरोबरच (टीआरपी) पक्षामध्येही ‘राजशब्दा’ची किंमत घटल्याची चित्र सोमवारी शहरभर पाहण्यास मिळाले असून राज ठाकरे यांनी तंबी दिल्यानंतरही सभेचे फलक ‘जैसे थे’च होते.

रॅली निम्हणांची; खर्च पालिकेच्या डोक्यावर

0
0
‘सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, लेक वाचवा’ यासाठी आमदार महोदयांनी काढलेल्या सायकल रॅलीच्या स्वागताचा खर्च पालिकेच्या बोकांडी टाकण्यात आला आहे. पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी आमदार विनायक निम्हण यांनी काढलेल्या रॅलीचे स्वागत पुणे शहरात करण्यात आले.

दोघांच्या भांडणात रावतांचा लाभ?

0
0
पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीसाठी आमदार गिरीश बापट व शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांच्यात सुरू असलेल्या सारीपाटाच्या खेळात आता माजी खासदार प्रदीप रावत यांच्या उमेदवारीचा डाव टाकला जात आहे.

क्रीडा संघटनांना चाप लावण्यासाठी संहिता

0
0
राज्यात क्रीडा आयोग, क्रीडा निवडणूक आयोग, क्रीडा नैतिकता आयोग आदींसारख्या संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्याच्या क्रीडा संहितेमध्ये करण्यात आला आहे.

समारंभांसाठी वेळ; शहरविकासाचा ‘खेळ’

0
0
जाहीर आणि खासगी कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी पुण्यात येणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुण्याच्या प्रश्नांसाठी आचारसंहितेपूर्वी तरी वेळ देणार आहेत काय?

छोट्या पालिका लालफितीत

0
0
एका पालिकेवर बोजा वाढविण्याऐवजी, विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून छोट्या महापालिकांच्या स्थापनेची व्यवहार्यता तपासण्यासाठी घेतलेला पुढाकार राज्य सरकारच्या लालफितीच्या कारभारात अडकला आहे.

आज ठरणार ‘मेड फॉर इच अदर’ जोडी

0
0
स्वतःला ‘जोडी नंबर वन’ समजणाऱ्या वीस जोड्या आज हॉटेल रामी ग्रँडमध्ये भेटणार आहेत. एकमेकांशी स्पर्धा करणार आहेत आणि त्यातून सापडेल खरी ‘जोडी नंबर वन’.

रस्तेखोदाईचा आढावा घेणार महापालिका

0
0
शहरातील मोठ्या रस्त्यांपासून ते छोट्या गल्ली-बोळांपर्यंत सर्वच कंपन्यांतर्फे रस्तेखोदाई सुरू असून, त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. मंगळवारच्या स्थायी समितीच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटल्यानंतर शहराच्या सर्व भागांतील रस्ते खोदाईचा सविस्तर आढावा घेऊन कामे पूर्ण झालेल्या ठिकाणी तातडीने डांबरीकरण करण्याच्या सूचना पालिका आयुक्त विकास देशमुख यांनी दिल्या.

‘उसन्या’ प्राध्यापक-डॉक्टरांना दणका

0
0
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या (एमसीआय) तपासणीपुरती कॉलेजमध्ये प्राध्यापकी करणाऱ्या ‘उसन्या’ डॉक्टरांवर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने कडक कारवाई केली असून, ११ डॉक्टरांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत.

कचऱ्याने केली पुणेकरांची कोंडी

0
0
शहरात वारंवार उद्भवणाऱ्या कचरा समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्लास्टिक आणि थर्माकोल वापरावर कठोर बंधने घालण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांसह थर्माकोलचा वापर आणि विक्री करणाऱ्यांवर बुधवारपासून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

बँकेत जमा होणार रॉकेलचे अनुदान

0
0
घरगुती गॅस सिलिंडरचे अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असली, तरी रॉकेलचे अनुदान मात्र रेशनकार्डधारकांच्याच बँक खात्यात जमा होणार आहे. रॉकेलच्या अनुदानासाठी बँक खाती उघडण्याचे पुणे विभागाचे पन्नास टक्के काम पूर्ण झाले आहे.

‘बालगंधर्व’मध्ये आंदोलनाचा प्रयोग

0
0
एरवी कोणत्याही भूमिकेत शिरून आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांना स्तब्ध करणाऱ्या रंगकर्मींनी जोरदार घोषणाबाजी करुन, मागण्यांचे फलक घेऊन बालगंधर्व रंगमंदिराच्या तिकीट खिडकीवर आंदोलनाचा नाट्यप्रयोग रंगविला.

बिबट्याचे दर्शन सर्वेक्षणात नाही

0
0
पुणे परिसरातील जंगलांमध्ये चिंकारा, काळवीट, लांडगे आणि कोल्ह्यांची संख्या वाढली असली, तरी बहुचर्चीत बिबट्याने अद्याप एकाही वनाधिकाऱ्याला दर्शन दिलेले नाही. गावातील जनावरे बिबट्याकडून शिकार होत असताना वन विभागाच्या सर्व्हेक्षणात पुरावे मिळूनही बिबट्या कोणालाही दिसलेला नाही.

राजमाची, सुधागडही होणार अभयारण्य

0
0
उत्तम जैववैविध्य, दुर्मिळ वनौषधी, वैविध्यपूर्ण पक्षी, कीटक आणि बिबट्यासह इतर वन्यप्राण्यांचे वास्तव्य असलेल्या राजमाची आणि सुधागडलाही लवकरच अभयारण्याचा दर्जा मिळणार आहे.

हवी हेक्टरी २ कोटी रुपये भरपाई

0
0
तळेगाव औद्योगिक वसाहतीच्या दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनासाठी हेक्टरी दोन कोटी रुपये मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हा मोबदला देतानाच २२ टक्के विकसित जमीनही मिळावी, असा प्रस्ताव शेतकऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images