Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

कुतुहलासाठी खटाटोप अन् साकारला टेलिस्कोप

$
0
0
दररोज आकाशातून खुणावणाऱ्या ग्रह ताऱ्यांमुळे जागलेले कुतुहल...ते शमविण्यासाठी नववीच्या विद्यार्थ्यांनीच स्वतः टेलिस्कोप बनवण्यासाठी केलेला खटाटोप....त्यासाठी घासलेल्या काचा आणि रंगवलेले पाईप...आयुका आणि ज्योतिर्विद्या संस्थेच्या मार्गदर्शनातून साकारलेला टेलिस्कोप आणि त्यातून गुरू आणि चंद्र पाहताना खुललेली कळी....

निवडणुकीमुळे टळणार वीज दरवाढ

$
0
0
विजेच्या दरात वाढ करण्याबाबत महावितरणने सादर केलेला प्रस्ताव मान्य झाला, तरी राज्य सरकारने दिलेल्या अनुदानाच्या ‘सलाइन’मुळे ग्राहकांना या दरवाढीचा फटका बसणार नाही, असे स्पष्ट झाले आहे.

पुणेकरांसाठी ‘ऐतिहासिक खजिना’

$
0
0
सोन्याच्या अक्षरांच्या सहाय्याने काही भागाचे लेखन केलेली ‘शिवलिलामृता’ची दुर्मिळ आणि तितकीच ऐतिहासिक प्रत... एका काश्मिरी स्कॉलरने शारदा लिपी वापरून भूर्जपत्रावर लिहिलेली ऋग्वेदसंहितेची प्रत... अशा एक ना अनेक पुरातन हस्तलिखिते, पोथ्या आणि दस्तऐवजांचा संग्रह प्राच्यविद्यासंशोधक, अभ्यासक आणि हौशी पुणेकरांसमोर शनिवारी खुला झाला.

सर्दी, खोकला, तापाने पुणेकर त्रस्त

$
0
0
गेल्या आठवडाभरापासून दिवसा उकाडा आणि रात्री थंडी अशा दुहेरी वातावरणातील विषाणूंच्या बदलामुळे सर्दी, ताप, खोकला आणि उलट्याने पुणेकर त्रस्त झाले आहेत. गेल्या दहा वर्षांत प्रथमच अशा लक्षणांचे पेशंट आढळून येऊ लागल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

एसटी नको, नेत्यांच्या गाड्या जाळा

$
0
0
‘कोणत्याही आंदोलनात आंदोलनकर्त्यांकडून रस्त्यावर एसटीच्या बस जाळण्यात येतात; मात्र सर्वसामान्यांची एसटी जाळण्यापेक्षा नेत्यांच्या गाड्या जाळा,’ असा सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. एसटी सर्वसामान्यांची गाडी आहे. त्यामुळे या गाड्या जाळून आपण एसटीचे नुकसान करीत आहोत.

‘राज’बाण कोणाच्या दिशेने?

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे कथित मोदी मॅजिक...,आम आदमी पक्षाचे अॅट्रॅक्शन...आणि सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने केलेले गीअर अप... अशा राजकीय परिस्थितीत पुन्हा आव्वाज देणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बाण कोणाच्या दिशेने सुटणार, याबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे.

कट्ट्यावर अवतरला सिंह!

$
0
0
‘संध्याकाळनंतर असाच टॉर्च घेऊन आम्ही काही जण हॉटेलच्या आवारात भटकायला गेलो. झाडं फार दाट नसल्यामुळे लांबपर्यंत त्याचा प्रकाश पोहोचत होता आणि एकदम त्या प्रकाशात सहा डोळे दिसले. ते डोळे आमच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होते.

गुरुवारपासून आवाज ‘ज्ञानक्रांती’चा!

$
0
0
एखाद्या स्पर्धेचं उद्‍‍घाटन नेहमीच लोकांच्या नजरेसमोर राहाणाऱ्या व्यक्तीच्या हस्ते करण्यात येतं. संबंधित क्षेत्रातील त्या व्यक्तीची कामगिरीही त्याला कारणीभूत असतेच; पण बहुतेक वेळा ही माणसं चेहऱ्यानेही माहिती असतात आणि त्याचमुळे त्यांच्या केवळ नावानं आपण त्या कार्यक्रमाला गर्दी करतो. ज्ञानक्रांती खुली एकांकिका स्पर्धा मात्र याला अपवाद आहे.

संकल्प सिद्धीस जातोय?

$
0
0
वर्षाच्या सुरुवातीला केलेले दिनक्रमाविषयीचे अनेकांचे संकल्प वर्षभरात कोसळलेले असतात. कारणं काहीही असोत, ते पूर्ण होत नाहीत. फेब्रुवारी महिना ही खरी वेळ आहे, तुम्ही संकल्पाच्या दिशेने प्रवास करताय, की नाही, हे पाहाण्याची. याच संकल्पांची ही गोष्ट...

देखणा नृत्य नजराणा

$
0
0
‘सुपनवा में आओ ना हरी, मोरी लागी तरस बुझाओ’ ही राग चारुकेशीमधील बंदीश एका वेगळ्याच बीट्सवर सादर होत होती. प्रख्यात गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शिष्या आणि वास्तुविशारद अनिता कुलकर्णी यांच्या आवाजातील या गाण्यावर भरतनाट्यम् नृत्य कलाकार परिमल फडके आणि कथक नृत्यांगना शीतल कोळवळकर यांनी सुरेख सहसादरीकरण केलं.

शनिवारवाड्यावर रंगला लोककलांचा सोहळा

$
0
0
‘खेळ मांडियेला वाळवंटी ठायी, नाचती वैष्णव भाई रे’ या लता मंगेशकर यांच्या स्वरातील अभंगावर अमृता गोगटेनं सुरेख नृत्याविष्कार सादर केला. अभंग, भजन, लावणी, पोवाडा यांसारखे महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले नानाविध कलाप्रकार ‘मिस्टिकल पुणे’ या कार्यक्रमात नुकतेच सादर झाले.

धास्तावलेल्या वरमायांना ‘अनुरूप’चा दिलासा

$
0
0
‘मुलगा स्वतंत्र व्यवसाय करणारा नको, गलेलठ्ठ पगाराची नोकरीच हवी’, ‘मुलगा गोरा नको, सावळाच हवा’, ‘फ्लॅट कमीत कमी टू बीएचके तरी असलाच पाहिजे’, ‘मुलगा डिफेन्समधला नको, आयटीतील भक्कम पगाराचा हवा’, ‘मुलीला लग्नाच्या आधीपासूनच नोकरी हवी, तीही चांगल्या पगाराची’, ‘मुलीनं नोकरीही करावी आणि घरही सांभाळावं...’

१२ फेब्रुला मनसेचा रास्ता रोको

$
0
0
राज्यात टोलप्रश्नी रान उठवून टोलनाक्यांची फोडाफोडी केल्यानंतर आता रस्त्यावरची लढाई लढण्याची तयारी मनसेने केली आहे. टोलसह इतर अनेक प्रश्नांची जंत्री घेऊन मनसे येत्या १२ फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी पुण्यात केली.

आवक वाढल्याने पालेभाज्यांचे दर स्थिर

$
0
0
गारठ्याची कमी अधिक होणारी तीव्रता, दिवसा उकाड्याचा जोर अशा परिस्थितीत बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पालेभाज्यांबरोबरच अन्य भाज्यांचे दर स्थिर आहेत.

समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न

$
0
0
‘चित्रपट बनवणे हे माझ्यासाठी एक सामाजिक कार्य आहे. ‘राज, राहुल आणि प्रेम’ या पलिकडे जाऊन पिस्तुल्या, जब्या यांच्या माध्यमातून आपल्याभोवतीच्या समाजातील वास्तव मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे,’ असे मत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी रविवारी व्यक्त केले.

घर सांभाळू न शकणाऱ्यांनी राज्याच्या गप्पा मारू नयेत

$
0
0
‘ठाकरे बंधूंना स्वतःचे घर नीट सांभाळता येत नसेल, तर त्यांनी राज्याच्या गप्पा करू नयेत’, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सासवड येथील राष्ट्रवादीच्या निवडणूकपूर्व मेळाव्यात रविवारी केली. आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेससोबत सर्वांनी विश्वासाने काम करावे, असेही त्यांनी सुचविले.

ग्राहकांना ‘कॅशकॅरी’ची सवलत द्यावी

$
0
0
गॅस एजन्सीमधून घरगुती सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ग्राहकांना ‘कॅशकॅरी’ची रक्कम कमी करण्यात येत नसल्याने एजन्सीचालकांकडून दररोज सरासरी दोन हजार रुपयांची लूट केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सुखासाठी बौद्धधर्माचे आचरण

$
0
0
‘समाजसुखासाठी बौद्ध धर्माचे आचरण करावे,’ असे आवाहन थायलंड येथील भंते फराकिम फंकम यांनी येथे केले.

ब्रँड पुणे विद्यापीठ

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या बाबतीत बोलायचे, तर गेल्या काही काळामध्ये वरील सर्व विषयांवर काही ना काही निमित्ताने ही चर्चा होतेच आहे. जोडीने व्यवस्थेत काही कालसुसंगत बदलही घडत आहेत. या बदलांना असलेला सामाजिक आशयही महत्त्वाचा आहे. मात्र, आता तेवढ्यावरच थांबून चालणार नाही.

अपघातप्रवण चालकांना प्रशिक्षण बंधनकारक

$
0
0
पाचपेक्षा अधिकवेळा अपघात करणाऱ्या चालकांना प्रशिक्षण घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. प्रशिक्षणानंतर घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये चालक दोन वेळा अनुत्तीर्ण झाल्यास त्याला कामापासून दूर ठेवण्याचा निर्णय एसटीकडून घेण्यात आल्याचे समजते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images