Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

हडपसर-जेजुरी मार्गाच्या रुंदीकरणाला स्थगिती

$
0
0
तक्रारदार शेतकऱ्यांच्या अटी व मागण्या पूर्ण केल्याशिवाय हडपसर-जेजुरी दरम्यान राज्य महामार्ग क्र. ६४च्या रुंदीकरणाच्या कामास सुरुवात न करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले.

रेशनकार्डांच्या अचानक तपासणीचे आदेश

$
0
0
बनावट रेशनकार्डांना आळा घालण्यासाठी रेशनकार्डांची ‘रँडम’ पद्धतीने तपासणी करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच रेशनकार्ड वितरणातील त्रुटींना जबाबदार असलेल्या किंवा गैरव्यवहार करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचाही आदेश देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या शेतात दूषित पाण्याची ‘गंगा’

$
0
0
साखर कारखान्यांनी सोडलेल्या दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांना बसणारे फटके राज्याला काही नवे नाहीत. या प्रकाराला सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा कारखानाही अपवाद ठरलेला नाही.

पोलिसांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न हवेत

$
0
0
पोलिसांचे आयुष्य हे अत्यंत खडतर आहे. पोलिसांचे मनोबल आणि जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत, अशी अपेक्षा राज्याचे माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांनी व्यक्त केली.

पोलिस असल्याची बतावणी करून लुटले

$
0
0
पोलिस असल्याची बतावणी करून तपासणी करण्याचे सांगून वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि इतर दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. चिट्टीमल्ला राजेश्वर राव (वय ६२) यांनी याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव येथील एसबीआय बँकेच्या एटीएमबाहेर चिट्टीमल्ला राव मंगळवारी थांबले होते.

अतिक्रमण कारवाईमुळे तणाव

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील अगरवाल कॉलनीकडे जाणाऱ्या नाल्यावरील रस्ता खचल्याच्या प्रकरणानंतर जान महंमद रस्त्यावरील २० अनधिकृत स्टॉल काढण्याची कारवाई बोर्डाने बुधवारी केली.

बेकायदा व्यावसायिकांवर कारवाई

$
0
0
शहरात छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्यांना लायसन्स उपलब्ध करून देणाऱ्या विभागाचे कामकाज पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा सुरू केले आहे.

सरकारचा वायदा १२ आठवड्यांचा

$
0
0
सरकारी कार्यालयांमध्ये गाऱ्हाणी घेऊन येणाऱ्या जनतेची निवेदने, समस्यांची पत्रे आणि तक्रार अर्जांची केवळ रद्दी होऊ नये यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलली असून, अशा अर्जांवर बारा आठवड्यांमध्ये कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

जमिनीच्या वादातून खुनाचा प्रयत्न

$
0
0
महंमदवाडी रोडवर दुचाकीवर चाललेल्या तरुणावर लोखंडी कोयता, गजाने मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी चौघा आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

रस्त्याच्या कामांसाठी जादा दराने टेंडर

$
0
0
डिफर्ड पेमेंटने रस्त्यांचे काम देण्यासाठी महापालिका प्रशासनाने राबविलेल्या टेंडर प्रक्रियेत ही सर्व टेंडर २५ ते ३० टक्के जादा दराने आल्याने ही प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांच्याकडे करण्यात आली आहे.

मनसेला ‘एसपी’चे मैदान नाहीच!

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या रविवारची सभा एस. पी. कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यास परवानगी देण्यात आली नसल्याची स्पष्टोक्ती शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेकडून देण्यात आली.

राजगुरुनगरमध्ये विषमज्वराची साथ

$
0
0
गेल्या पंधरा दिवसांपासून दूषित पाण्यामुळे राजगुरुनगर आणि लगतच्या चांडोली परिसरात विषमज्वराचे शंभरपेक्षा अधिक पेशंट आढळून आले आहेत. या पेशंटवर शासकीय, तसेच काही खासगी हॉस्पिटलांमध्ये उपचार सुरू आहेत.

स्वारगेट ते ‘लोखंडवाला’ मार्गावर व्होल्वो

$
0
0
पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर व्हावा, म्हणून स्वारगेट ते लोखंडवाला कॉम्प्लेक्स मार्गावर व्होल्वोसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव एसटीने तयार केला आहे. हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी एसटीच्या मुख्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.

बेकायदा फ्लेक्सवर पोलिसांची टाळाटाळ

$
0
0
शहरात बेकायदा होर्डिंग, फ्लेक्स उभारून शहर विद्रूप करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी महापालिकेच्या वतीने बेकायदा होर्डिंग उभारणाऱ्यांच्या तक्रारी पोलिसात केली जाते. मात्र, लेखी तक्रार देऊनही पोलिस गुन्हे दाखल करत नसल्याची कैफियत अतिरिक्त महापालिका आयुक्त राजेंद्र जगताप यांनी मांडली.

वाढीव पाणी कोटा देण्यास नकार

$
0
0
शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी वाढीव पाण्याचा कोटा देण्याची महापालिकेची मागणी बुधवारी जलसंपदा खात्याने फेटाळून लावली.

पुण्यात प्रथमच रक्तदान महाअभियान

$
0
0
तुम्हाला माहितीये...एका वर्षात आपल्या शहरात एक लाख २५ हजार रक्ताच्या बाटल्यांची गरज असते, आपण या मागणीला अपुरे पडतो. रक्तदानातही पुणेकर मागं नाहित हे दाखवून देण्याची एक छान संधी आपल्याला मिळणार आहे.

कॉलेजच्या विद्यार्थ्यांत मारामारी

$
0
0
‘माझ्यासमोर भांडणे करून दाखवा,’ अशी चिथावणी कॉलेजच्या प्रार्यायांनी ‌दिल्याने कॉलेजमधील दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडणे होऊन ते दोन्ही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. रास्ता पेठेतील राजा धनराजगिरी कॉलेमध्ये हा बुधवारी हा प्रकार घडला. या प्रकरणी कॉलेजच्या प्राचार्यांसह एका विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जन्म-मृत्यू दाखल्याची पहिली प्रत मोफत

$
0
0
जन्म-मृत्यू दाखल्याची पहिली प्र‌त मोफत देण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, बुधवारपासून दाखल्यांची पहिली प्रत मोफत देण्याची अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली. यामुळे दाखल्याच्या पहिल्या प्रतीसाठी मोजावे लागणारे वीस रुपये आता नागरिकांना द्यावे लागणार नाहीत.

‘ससून’च्या सहा वॉर्डांच्या नूतनीकरणास मान्यता

$
0
0
ससून हॉस्पिटलमधील तिसऱ्या मजल्यावरील सहा वॉर्डांचे नूतनीकरण करण्यास श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गपणती टस्टच्या प्रस्तावाला राज्य सरकारने गुरुवारी मान्यता दिली. त्याबाबतचे अध्यादेशही सरकारने जारी केले असल्याने चार कोटी रुपये खर्चाच्या कामास सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वेगळ्या नाट्य विद्यापीठाची आवश्यकताच काय?

$
0
0
दिल्लीला एनएसडीसारखा आंतरराष्ट्रीय ख्यातीची नाट्यशास्त्राचे शिक्षण देणारी संस्था आणि राज्यभरात विविध विद्यापीठांमध्ये स्वतंत्र नाट्यशास्त्र विभाग असताना अजून एका नाट्य विद्यापीठाची गरज काय, असा सवाल विद्यापीठांच्या नाट्य विभागांनी उपस्थित केला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images