Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘नऊच्या खाऊ’साठी कुठं कुठं जाऊ?

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या येत्या रविवारी (दि. ९) होणाऱ्या सभेसाठी एस. पी. कॉलेजचे मैदान उपलब्ध करून देण्यास शिक्षण प्रसारक मंडळीने सोमवारी नकार दिला. परिणामी, मनसेने अलका टॉकीजजवळील टिळक चौकात सभा घेण्याचा प्रस्ताव सादर केला.

रंगणार अर्पण!

$
0
0
प्रायोगिक रंगभूमीवर सातत्यानं वैविध्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या ध्यास या ग्रुपतर्फे ६ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत ‘अर्पण २०१४’ या थिएटर फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. दररोज सायंकाळी साडेसात वाजता सुदर्शन रंगमंच इथं एकांकिका सादर केल्या जाणार आहेत.

श्रीकांत वाघ यांची बाजी

$
0
0
‘आपली असो की दुसऱ्याची, रांगोळी पुसायची नसते,’ वाचल्याक्षणी मनाला पटणाऱ्या या ओळींना टी-शर्ट कॅलिग्राफी काव्यस्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. कवी श्रीकांत वाघ यांच्या या ओळी आहेत. ‘सिल्व्हर लाइन कॅलिग्राफी टी-शर्ट’ या कंपनीतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली होती.

‘अलॅक्रिटी’त रोबोंची टशन

$
0
0
विद्यार्थ्यांच्या तांत्रिक, क्रीडा आणि कलात्मक बुद्धीला वाव मिळावा तसंच, स्थानिक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसोबत आपली पात्रता आजमावता यावी, यासाठी ‘अलॅक्रिटी’ इव्हेंटचं आयोजन करण्यात येतं.

प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना नोटी​स

$
0
0
रासायनिक आणि जलप्रदूषण करणाऱ्या तीन कंपन्यांना ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळा’ने (एमपीसीबी) ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण करणाऱ्या उद्योगांची अचानक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी मंगळवारी दिली.

कल्पकतेची पहाट

$
0
0
सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक पातळीवर पुणं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपला ठसा उमटवतंच आहे. आता जाहिरातीतील सर्जनशीलतेतही शहराचं नाव दिसून येतंय. या क्षेत्रात पुण्यातलं टॅलेंट वाढत असून, मिलियन डॉलर किंवा कोटींमध्ये उलाढाल असलेल्या जाहिरात कंपन्यांमध्ये पुण्यातली नावं दिसू लागली आहेत.

संगतकार ते संगीतकार…

$
0
0
दिग्गज कलाकारांना साथ करणारा पुण्याचा निखिल महामुनी संगीतकार म्हणून मराठी सिनेमात पदार्पण करतोय. ‘नटी’ या आगामी सिनेमाचं संगीत त्यानं केलं आहे. पहिल्याच सिनेमाचं पहिलं गाणं ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासमवेत करून निखिलनं पदार्पणातच सिक्सर मारला आहे.

रंगली मेजवानी

$
0
0
सुगरणींना महासंधी देणारी ई टीव्ही मराठी प्रस्तुत ‘मेजवानी किचन क्वीन - २०१४’ या स्पर्धेची पुण्यातली प्राथमिक फेरी मोठ्या दिमाखात नुकतीच पार पडली. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या स्पर्धेचा मीडिया पार्टनर आहे.

दिग्गज कलाकारांचा ‘संजोग’

$
0
0
संजोग तबला विद्यालयाच्या शंकर कुचेकर यांच्या वतीनं येत्या ८ आणि ९ फेब्रुवारीला ‘संजोग संगीत महोत्सव’ आयोजित करण्यात आलाय. प्रसिद्ध कथक नृत्य कलाकार पं. राजेंद्र गंगाणी (राजस्थान) या महोत्सवाला विशेष उपस्थिती लावणार आहेत.

स्मार्टफोनवर ‘तारीख पे तारीख’

$
0
0
स्मार्टफोनवरील अॅप्सच्या दुनियेची सुप्रीम कोर्टालाही भुरळ पडली असून, वकिलांना आणि त्यांच्या पक्षकारांना दैनंदिन कामकाजाची इत्थंभूत माहिती देण्यासाठी कोर्टाने नवे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. मुंबई विभागाने ‘सुप्रीम कोर्ट केस’ या अॅपची निर्मिती केली आहे.

पालिकेचा पसारा आवरा

$
0
0
नियंत्रणाच्या पलीकडे जात असलेल्या शहरीकरणाच्या नियोजनासाठी प्रशासनाच्या नव्या पर्यायांचा, छोट्या आकाराच्या महापालिका स्थापन करण्याचा मार्ग अवलंबण्याची गरज नगररचना तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. नागरी सुविधा कार्यक्षमतेने उपलब्ध होण्यासाठी पालिकेचा पसारा आवरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

‘आधार’च्या सिलिंडरची रक्कम अजूनही खात्यातच

$
0
0
गॅस सिलिंडरचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेच्या (डीबीटीएल) अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारी घोषणेपुरताच मर्यादित राहिला आहे. प्रत्यक्षात मात्र आधार-बँक खाते आणि एलपीजी क्रमांकांची जोडणी केलेल्या ग्राहकांना विनाअनुदानित दरानेच सिलिंडर दिले जात असून, नंतर खात्यात रक्कम जमा होणार आहे.

समाविष्ट गावांचा निर्णय कोणाच्या पथ्यावर?

$
0
0
पुणे महापालिकेत ३४ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय राजकीयदृष्ट्या कोणत्या राजकीय पक्षाच्या पथ्यावर पडेल, याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. सकृद्दर्शनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-सेनेसाठी हा निर्णय अनुकूल ठरेल, असा अंदाज राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त होत आहे.

पुण्यातील २३ टोलनाके ‘अशांत’ घोषित करा

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) टोलविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या हद्दीतील २३ टोलनाके ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित करावे, यासाठी ग्रामीण पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवला आहे. दरम्यान, खेड शिवापूर टोलनाक्यावरील आंदोलनामुळे ६७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.

आयटी पार्क, एअरपोर्टला पीएमपीच्या एसी बस

$
0
0
आयटी पार्क आणि एअरपोर्टला जाणाऱ्या पुणेकरांना लवकरच प्रिमियम क्लासमधील एसी बसची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे पीएमपीकडून ही सेवा उपलब्ध करुन दिली जाणार असून त्यासाठी आठ ते दहा महिन्यांचा अवधी लागणार आहे.

चक्रीवादळाने अडवली थंडीची वाट

$
0
0
यंदाच्या थंडीच्या हंगामात हुडहुडी भरविणारी थंडी काही मोजकेच दिवस अनुभवायला मिळाली. नोव्हेंबर ते जानेवारी या ऐन थंडीच्या तीन महिन्यात २२ दिवस किमान तापमानाचा पारा दहा अंशांखाली उतरला.

‘नार्को’ची मागणी

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांची नार्को टेस्ट करण्यास परवानगी मिळावी म्हणून पुणे पोलिसांतर्फे मंगळवारी कोर्टात अर्ज करण्यात आला आहे.

पेशंटना ४२७ औषधे मोफत

$
0
0
सरकारी दवाखान्यात उपचार घेण्यास येणाऱ्या पेशंट आणि त्याच्या नातेवाइकांना यापुढे बाहेरून औषधे आणण्याची वेळ येणार नाही. पेशंटना कॅन्सर, डायबेटिस, बीपीसह हृदयविकाराशी संबंधित ४२७ प्रकारची औषधे आणि सलाइनसह विविध आजारांच्या ऑपरेशनचीही वैद्यकीय सामग्री चक्क मोफत मिळणार आहे.

अंटार्क्टिकावर पुण्याची मोहोर

$
0
0
अतिथंड हवामान आणि बहुतांश हिमाच्छादित असा अंटार्क्टिका खंड. आजूबाजूला केवळ बोटावर मोजण्याइतके संशोधक...अशा परिस्थितीत दोन-अडीच महिने राहून तिथे ‘स्नो गेज’,‘थर्मामीटर्स’ आणि हवामानविषयक संशोधनासाठी आवश्यक अन्य उपकरणे बसविण्याची अवघड कामगिरी, असे आव्हान स्वीकारून पुण्यातील दोन संशोधक आज (बुधवारी) अंटार्क्टिकाच्या मोहिमेवर रवाना होत आहेत.

‘पाळणा’ अधांतरी

$
0
0
दिवसभर नोकरीला गेल्यावर तुमचे मूल पाळणाघरात सुरक्षित असते का... त्यांच्या स्वच्छतेची, आहाराची काळजी घेतली जाते का.. पाळणाघरातील ताईंनी प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेतलय का.. असे प्रश्नच पालकांना पडत नाहीत की शहरातील सर्वच पाळणाघरे अद्ययावत, सुरक्षित आणि माफक दरात सुरू आहेत... असा संभ्रम महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images