Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लष्करी वैद्यकीय सेवेचे ‘बाँडिंग’ महागले

$
0
0
आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमधील (एएफएमसी) मेडिकल अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना द्याव्या लागणाऱ्या बाँडच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एएफएमसीतून मेडिकल शिक्षण पूर्ण केल्यानंतरही लष्करात सेवा न करता खासगी प्रॅक्टिस करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अधिक रक्कम मोजावी लागेल.

नाट्य विभागांचे अनुदान प्रलंबितच

$
0
0
स्वतंत्र नाट्य विद्यापीठ सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या राज्य सरकारची विद्यापीठांच्या नाट्य विभागांना अनुदान देण्याची घोषणा हवेत विरली आहे. अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या विद्यापीठांच्या नाट्य विभागांना अनुदानाच्या कक्षेत आणून आर्थिकृष्ट्या सक्षम न करता राज्य सरकार वेगळे नाट्य विद्यापीठ उभारण्याचा विचार करते आहे.

किरणोत्सर्गी हल्ल्यांचाही आता ‘नेत्र’ घेणार वेध

$
0
0
शत्रूच्या कारवायांकडे गुप्त नजर ठेवत सीमाभागावर पहारा देणाऱ्या ‘नेत्र’ या मानवरहित टेहळणी यंत्रणेला आता ‘रेडिओलॉजिकल सेन्सर्स’चे सामर्थ्यही प्राप्त झाले आहे. किरणोत्सर्गाच्या माध्यमातून केले जाणारे हल्ले वेळीच थोपविणे यामुळे शक्य होईल.

भांडारकर संस्थेत हस्तलिखितांचे प्रदर्शन

$
0
0
दुर्मिळ हस्तलिखिते पुणेकरांना पाहता यावीत, त्याबद्दल माहिती मिळावी, म्हणून भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी हस्तलिखितांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेतील निझाम गेस्ट हाउसमध्ये सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन होणार आहे.

केंद्राने तारले; राज्याने मारले...!

$
0
0
आधार-बँक खाते आणि एलपीजी क्रमांकाच्या जोडणीचे सोपस्कार पूर्ण करून केंद्र सरकारच्या डीबीटीएल योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांना प्रोत्साहन मिळण्याऐवजी सिलिंडरच्या महागाईला तोंड देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

संमेलन युवक संघाचे...

$
0
0
विश्व विद्यार्थी व युवक संघाच्यावतीने (WOSY) पुण्यामध्ये ८ व ९ फेब्रुवारी रोजी शिवछत्रपती क्रीडासंकुलामध्ये एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ​त्या निमित्त...

प्रकल्प केंद्राकडे असल्याने दीडपट दंड कशासाठी?

$
0
0
महापालिकेबरोबर केलेल्या करारापेक्षा पालिका वाढीव पाणी खडकवासला धरणातून उचलत असल्याने या जादा पाण्याचा दीड पट दंड भरा, असे पत्र जलसंपदा विभागाने पालिकेला पाठ‌विले होते.

मानवी देहाचा सदुपयोग आवश्यक

$
0
0
मानवी देहाचा सदुपयोग कसा करता येईल, याचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत आचार्य गोविंददेव गिरी यांनी व्यक्त केले.

दिवाळखोरीमुळे कँटोन्मेंटने ठेव मोडली

$
0
0
जकातीचे उत्पन्न बंद झाल्यामुळे तिजोरी रिकामी झालेले पुणे कँटोन्मेंट बोर्ड दिवाळखोरीत निघाले आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीही निधी नसल्याने या महिन्यात बोर्डावर शेवटचा मार्ग म्हणून २९ कोटी रुपयांची ठेव मोडावी लागली आहे. बोर्डाच्या या आर्थिक परिस्थितीमुळे या वर्षभरात विकासकामे होण्याची शक्यता मावळली आहे.

परीक्षेनंतर हॉल तिकिटाचा गोंधळ

$
0
0
बारावीच्या प्रॅक्टिकलपूर्वी विद्यार्थ्यांना हॉल तिकीट वाटण्याच्या गडबडीत बोर्डाने अनेक विद्यार्थ्यांना चुकीची माहिती असणारी किंवा माहिती नसणारी हॉल तिकीट पुरविल्याचे समोर येत आहे.

अखेर बारावी प्रॅक्टिकल मार्गी

$
0
0
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षांना शहरात गुरुवारी सुरळीत सुरुवात झाली. शिक्षकांच्या बहिष्काराच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही कॉलेजांमधून आज (शुक्रवार) आणि उद्यापासून (शनिवार) प्रॅक्टिकल्स सुरू करण्याचे धोरण अवलंबिले असतानाच काही मोजक्या कॉलेजांनी बोर्डाच्या नियोजनानुसार गुरुवारपासूनच प्रॅक्टिकल्स सुरू केल्याने विद्यार्थ्यांनीही सुटकेचा निश्वास सोडला.

दिवसा उकाडा, रात्री गारठा

$
0
0
शहरात आता उन्हाळ्याची चाहूल लागू लागली असून पाऱ्याने गुरुवारी ३४ अंश सेल्सियसचा टप्पा गाठला आहे. दुपारी उन्हाचा कडाका वाढल्याने पुणेकर घामाघूम होऊ लागले आहेत. तसेच, शहरातील किमान आणि कमाल तापमानात मोठ्या प्रमाणावर फरक असल्याने दिवसा प्रचंड उकाडा आणि रात्री आणि पहाटे गारवा असे मिश्र हवामान अनुभवयास मिळत आहे.

‘ARDE’चे संशोधन लष्कर प्रदर्शनात

$
0
0
वैमानिकाला अपघातग्रस्त विमानातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी मदत करणारी ‘कॅनॉपी सेव्हेरन्स सिस्टिम’, पिनाका क्षेपणास्त्र, ग्रेनेड, विविध प्रकारच्या बुलेट्स फायर करणारी मल्टी कॅलिबर वेपन सिस्टिम, रणगाडाभेदी १२० मिमी व्यासाचे ‘एफएसएपीडीएस’ शस्त्र आदी पुण्यातील ‘शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्थे’ने (एआरडीई) विकसित केलेली शस्त्रास्त्रे दिल्लीत भरलेल्या ‘डिफेन्स एक्स्पो’मध्ये मांडण्यात आली आहेत.

‘जीवनदायी’ योजनेकडे पाठ

$
0
0
राज्य सरकारने निश्चित केलेल्या अत्यल्प सरकारी दरात गोरगरिबांना उपचार देणे आर्थिकदृष्टा तोट्याचे ठरत असल्याने खासगही धर्मादाय हॉस्पिटलकडून राजीव गांधी जीवनदया योजनेला ‘अॅडमिट’ करून घेण्यास नकार देण्यात येत आहे.

‘यूके’च्या अभ्यासासाठी स्कॉलरशिप

$
0
0
‘यूके’मध्ये पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी ब्रिटिश कौन्सिलतर्फे १० कोटी रुपयांच्या स्कॉलरशिप देण्यात येणार आहेत.

भारत सर्वाधिक उद्योगसंधीचा देश

$
0
0
‘अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येइतके मध्यमवर्गीय भारतामध्ये राहतात. त्यामुळे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत हा सर्वाधिक उद्योगसंधीचा देश आहे,’ असे मत अमेरिकेच्या एक्स्पोर्ट इम्पोर्ट बँकेचे अध्यक्ष फ्रेड हॉकबर्ग यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादीला तगडा उमेदवार सापडेना

$
0
0
गेली अनेक वर्षे लाल दिवा व पदे मिळविणाऱ्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी अनुत्सुकता दाखविल्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता नव्या पर्यायांचा शोध घेण्यात येत आहे. या शोधामध्ये जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के, जिल्हा परिषदेचे सदस्य मंगलदास बांदल व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन देवदत्त निकम यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.

...आता रंगणार ‘काटाकाटी’!

$
0
0
लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे शॉर्टलिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने इच्छुकांमध्ये काटाकाटीचे राजकारण रंगले आहे. सामाजिक समीकरणे, निवडून येण्याची शक्यता अशा आपल्याला अनुकूल कसोट्या लावून नावे पुढे सरकविण्यासाठी अनेकजण कार्यरत झाले आहेत.

नदीपात्रात राज यांची सभा

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी एस. पी. कॉलेजचे मैदान अद्याप उपलब्ध झाले नसतानाच, नदीपात्रात सभा घेण्यासाठी पोलिसांनी मनसेला परवानगी दिली आहे. सभेला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना, अद्याप जागेचा तिढा सुटलेला नाही.

पुणे कधी घेणार पिंपरीचा आदर्श?

$
0
0
सोसेल एवढाच भार घेण्याच्या पिंपरी-चिंचवडसारख्या छोट्या पालिकेचा आदर्श पुणे कधी घेणार, असा प्रश्न पूर्व भागातील ग्रामपंचायतींच्या दुरवस्थेमुळे उपस्थित होत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images