Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शेडगे आणि कार्यकर्त्यांना अटक

$
0
0
पुणे-बेंगळुरु महामार्गावरील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर टोलच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेचे शहराध्यक्ष बाळा शेडगे यांच्या सह नऊजणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली. त्यांना कोर्टाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

पुण्यात थंडी कायम; पारा ८ अंशांवर

$
0
0
मंगळवारी हुडहुडी भरायला लावणाऱ्या थंडीनंतर बुधवारी तापमानात आणखी घट झाल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढला. स्थानिक पातळीवरील निरभ्र वातावरण आणि उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे शहरातील तापमानात काहीशी घट होऊन बुधवारी ८.७ अंश सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.

वडगाव बुद्रुकमध्ये अतिक्रमण

$
0
0
महापालिकेच्या दोन विभागांमधील समन्वयाच्या अभावी वडगाव बुद्रुक येथील ३५ ते ४० एकर जागेवर पाणी सोडण्याची वेळ येणार आहे. या भागात डोंगरमाथ्यावरील गायरान जमीन अद्यापही पालिकेने ताब्यात न घेतल्याने आजूबाजूच्या लोकांनी अतिक्रमण करून आपली ‘दुकाने’ थाटली आहेत.

नव्या बसमुळे प्रवासी हैराण

$
0
0
पुणेकरांच्या करातून ‘पीएमपी’च्या ताफ्यात नवीन बसेस दाखल झाल्या असतानाच दुसऱ्या बाजूला या बसेस सातत्याने बंद पडण्याचे प्रकार होऊ लागल्याने ‘पीएमपी’चे प्रवासी हैराण झाले आहेत.

कचऱ्याचे ढीग साठले

$
0
0
शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात आलेल्या उरूळी देवाची येथील हंजर प्रकल्पाचे वीजबील थकल्याने महावितरण कंपनीने या प्रकल्पाची वीज मंगळवारी तोडली. गेल्या दोन दिवसांपासून कचऱ्यावर कोणतीही‌ प्रक्रिया होत नसल्याने शहरातील कचराकुंड्या भरून वाहत आहेत.

‘आधार’ला दुरुस्तीचा टेकू

$
0
0
आधार कार्डांमधील चुका दुरुस्त करण्याची व्यवस्था लवकरच उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात अशी दुरुस्तीची ७० केंद्रे सुरू करण्यात येत आहेत.

वसंतराव पाडगावकर यांचे निधन

$
0
0
बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी महाव्यवस्थापक (जनरल मॅनेजर) वसंतराव पाडगावकर (९७) यांचे वृद्धापकाळाने आज (गुरुवार) सकाळी निधन झाले.

पोलिसांना वाली नाही

$
0
0
पोलिसांनी कितीही त्याग केला, २४ तास काम केले तरीही समाज, माध्यमे किंवा अन्य, कोणीही वेळ पडल्यावर पोलिसांच्या बाजूने उभे राहत नाही.

राज ठाकरेंचा प्रवास टोल न भरताच!

$
0
0
राज्यातील आपल्या कार्यकर्त्यांना ‘टोल’फोड मोहिमेचे आदेश देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई-पुणे प्रवास टोल न भरताच केला. किंबहुना, ‘राडा’ टाळण्यासाठी कंत्राटदारांनीच दहा मिनिटं टोल नाके बंद ठेवून राज यांच्या ताफ्याला विना-टोलच जाऊ दिलं.

लोकलचे ‘स्वतंत्र टर्मिनन्स’ कागदावर

$
0
0
पुणे ते लोणवळा दरम्यान ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या ५० हजारापर्यंत जाऊन पोहोचली असली तरी त्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र ​टर्मिनन्स उभारण्याबाबत रेल्वेकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने लोकलचे प्रवासी वैतागले आहेत.

अवघा रंग एकचि झाला

$
0
0
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याकडून उत्तम तालीम घेऊन स्वरांवर प्रेम करत त्यांची मांडणी करणारे जयपूर-अत्रौली घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर यांच्याशी महोत्सवाचं आयोजन, त्यांचा गानप्रवास आणि किशोरीताईंकडून मिळालेली शिकवण याविषयी साधलेला संवाद...

राज ठाकरेंवर तिसरा गुन्हा दाखल

$
0
0
राजगुरूनगर येथील टोलनाका फोडल्याप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर खेड पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल झाला आहे. याआधी पुणे ग्रामीण पोलिस हद्दीतील लोणी काळभोर, राजगड येथे गुन्हा दाखल झाला होता.

इमर्जन्सी मेडिकलने तिला जीवदान

$
0
0
अपघातग्रस्त, जखमींना ‘गोल्डन अवर्स’मध्ये उपचार देण्यासाठी ‘इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’तंर्गत (ईएमएस) प्रत्यक्षात पेशंटपर्यंत अॅम्ब्युलन्स पोहोचली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे यांच्यासमोरच प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातच एका पोलिस महिलेला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी तिला अॅम्ब्युलन्समधील डॉक्टरांनी तिला गोल्डन अवर्समध्ये उपचार दिल्याने तिला जीवदान मिळाले.

नेट-सेटचे स्वरूप पुन्हा बदलणार?

$
0
0
प्राध्यापक होण्यासाठीची किमान पात्रता असणाऱ्या ‘राष्ट्रीय पात्रता परीक्षा’ (नेट) आणि ‘राज्य पात्रता परीक्षे’चे (सेट) स्वरूप पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे. या दोन्ही परीक्षांचे सध्या असणारे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचे स्वरूप पूर्वीप्रमाणेच, म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रश्नांसोबतच दीर्घोत्तरी प्रश्नांचा समावेश होण्याविषयीच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

पंढरपुरकरांना मिळणार सांस्कृतिक मेजवानी

$
0
0
आषाढी कार्तिकीला विठुभक्तांचा मेळा अनुभवणाऱ्या पंढरपुरकरांना नाट्यसंमेलनानिमित्ताने सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. एकांकिका, दशावतार, लावणी, व्यावसायिक नाटके असे वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम चार दिवस रंगणार असून, मराठी चित्रपटनाट्यसृष्टीतील अभिनेत्यांची संगीत मैफल आणि ‘आनंद गंधर्व’ आनंद भाटे यांची नाट्यसंगीत मैफल संमेलनाचे आकर्षण ठरेल.

दूरदर्शन दाखविणार शॉर्टफिल्म, माहितीपट

$
0
0
व्यावसायिक चित्रपटांच्या धर्तीवर आता शॉर्टफिल्म आणि माहितीपट छोट्या पडद्यावर दाखविण्याची चळवळ सुरू होणार आहे. दूरदर्शनने शॉर्टफिल्म आणि माहितीपटांसाठी वेगळी वेळ राखून ठेवण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला असून, फेब्रुवारीअखेरपर्यंत त्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

मुदतवाढीच्या सूचनेचे प्राचार्यांकडून स्वागत

$
0
0
प्राचार्यपदाची मुदत पाचवरून दहा वर्षे करण्याच्या सूचनेचे प्राचार्यांनी स्वागत केले आहे. प्राचार्यपदाचा भार सांभाळण्यासाठी यामुळे अधिकाधिक उमेदवार तयार होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

वनक्षेत्राची ‘ब्लू प्रिंट’ लवकरच

$
0
0
वन्यप्राण्यांबरोबरच वनसंपदा आणि जंगलातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी वन विभागातर्फे राबविण्यात आलेल्या ‘ट्रान्सेक्ट लाइन’ पद्धतीमुळे लवकरच भीमाशंकरसह पुण्यातील सर्व टेकड्याची ‘ब्लू प्रिंट’ उपलब्ध होणार आहे.

कोर्टात उभारणार एटीएम सेंटर

$
0
0
शिवाजीनगर कोर्टात येणारे पक्षकार आणि वकिलांच्या सोयीसाठी कोर्टाच्या आवारात लवकरच एटीएम सेंटर सुरू करण्यात येणार आहे. हे एटीएम सेंटर कोर्टाच्या कामकाजाच्या वेळेत सुरू राहणार आहे, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र उमाप यांनी दिली.

टोलच्या जाचातून मावळवासीयांची सुटका

$
0
0
‘मावळ तालुका टोलमुक्त करा,’ या मागणीसाठी मावळ तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने गुरुवारी सकाळी जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाक्यावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images