Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राज ठाकरे येता, टोल फ्री झाला रस्ता

0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एक्स्प्रेस-वेने पुण्याला येणार असल्याने गुरुवारी सकाळी एक्स्प्रेस वेवरील सर्व टोलनाक्यांवरील टोलवसुली काही मिनिटे बंद ठेवत आयआरबी कंपनीने संघर्षाऐवजी नमती भूमिका घेतली. राज ठाकरे यांच्या आगमनामुळे शेकडो वाहनांना टोल फ्रीचे भेट मिळाल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत होते.

टोल बंद होण्यासाठी एसटी होणार आक्रमक

0
0
टोलमुळे एसटीला दरवर्षी सोसावा लागणारा सुमारे १०० कोटी रुपयांचा भुर्दंड कायमचा बंद व्हावा, यामागणीसाठी एसटी कामगार संघटनेने चक्का जाम आंदोलन करण्याचे ठरवले आहे.

आरोग्य खात्यात आता संचालकाऐवजी ‘आयुक्त’

0
0
राज्याच्या आरोग्य खात्याचा कारभार सांभाळणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील संचालक अधिकाऱ्याऐवजी आता ‘आयएएस’पदाच्या व्यक्तीलाच आयुक्तपदी बसविण्याच्या जोरदार हालचाली आरोग्य खात्यात सुरू आहेत.

इंटरनेट वापरात ब्रॉडबँडपेक्षा मोबाइल ‘स्मार्ट’

0
0
‘मोबाइलवरून इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून मोबाइलवरील इंटरनेट वापराने ब्रॉडबँडवरून होणाऱ्या इंटरनेटच्या वापरालाही मागे टाकले आहे. देशभरात दरमहा दोन कोटी स्मार्टफोनची विक्री होत असून महाराष्ट्रात (मुंबई वगळता) दरमहा पाच लाख स्मार्ट फोन विकले जात आहेत.

पुलाच्या रखडलेल्या कामाला अखेर मुहूर्त

0
0
लोणावळ्यातील व्हीपीएस विद्यालयाच्या विद्यार्थी आणि नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हीपीएस शाळेजवळील रेल्वे पादचारी उड्डाण पूल गेले चार वर्षांपासून धोकादायक झाल्यामुळे वापरण्यास बंद करण्यात आला होता.

हडपसर-हवेलीसाठी हवी स्वतंत्र महापालिका

0
0
हक्काच्या निधीसापासून वंचित राहिलेल्या पूर्व भागाला विकासाच्या गंगेत सामावून घेण्यासाठी हडपसर-हवेली स्वतंत्र महापालिकेची स्थापना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत सर्वपक्षीय आमदार, आजी-माजी नगरसेवक, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि नागरिकांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला.

भाजप-संघामध्ये संवाद साधणारे नेते नाहीत

0
0
‘पूर्वीचे नेते संघ आणि भारतीय जनसंघ यांच्यामध्ये समतोल ठेवत होते. आजच्या परिस्थितीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामध्ये संवाद साधणारे नेते दिसत नाहीत,’ अशी खंत माजी केंद्रीय राज्यमंत्री जयवंतीबेन मेहता यांनी व्यक्त केली.

स्वारगेटमधून बाहेर पडणाऱ्या बसेसची नोंदणी बंद

0
0
स्वारगेट बसस्थानकाच्या आउटगेटवर बसवण्यात आलेले बॅरिकेड तुटण्याचे प्रकार सातत्याने झाले आहेत. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या बसेसची नोंदणी करण्याचे काम बंद झाले आहे. नोंदणी पुन्हा सुरु करण्यासाठी बसस्थानकावर स्वयंचलित बॅरिकेड्स बसवण्याचा प्रस्ताव एसटीने मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठवला आहे.

… आणि डोळ्यांसमोर बस खाक झाली

0
0
अपघात किती भयानक असू शकतो... हे मी कधीच विसरू शकणार नाही. अजूनही माझ्या डोळ्यासमोर जळणारी बस दिसते आहे. आम्हाला वाचवा, अशा आरोळ्या ऐकू येत आहेत... जीव मुठीत धरून पळणे काय असते, ते मी अनुभवले…

‘टेट’मधील ३८ प्रश्न रद्द

0
0
शिक्षक पात्रता परीक्षेमधील (टेट) ३८ प्रश्न रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. त्यासोबतच परीक्षेच्या दोन्ही पेपरमधील १९ प्रश्नांचे पर्यायही चुकीचे आढळून आल्याने, परिषदेतर्फे या परीक्षेसाठीचा ‘कट ऑफ’ही नव्याने जाहीर करण्यात येणार आहे.

अन्नसुरक्षा योजना उद्यापासून

0
0
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा योजनेस उद्यापासून (शनिवार) प्रारंभ होत आहे. शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील ५३ लाख नागरिकांना दरमहा तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दोन व तीन रुपये किलो दराने मिळणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर ही योजना सुरू होणार असल्यामुळे सर्वांचेच लक्ष योजनेकडे लागले आहे.

यंदाचे वर्ष कमी पावसाचे

0
0
मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्यानंतर चालू वर्ष मात्र, सरासरीपेक्षा कमी पावसाचे ठरण्याची शक्यता आहे. मान्सूनवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या ‘एल निनो’ या घटकाच्या प्रभावामुळे यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान क्षेत्रातील ‘स्कायमेट’ या वेबसाइटने वर्तविला आहे.

कलमाडींची ‘डिनर डिप्लोमसी’?

0
0
शहरातील काही नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांनी खासदार सुरेश कलमाडी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सोमवारी रात्री पाहुणचार घेतल्याचे समजते. कलमाडी यांनी दिलेल्या भोजनाच्या निमित्ताने शहरातील राजकारणाबाबत नेमक्या कोणत्या चर्चा शिजल्या, याचा तपशील समजू शकला नाही.

‘ईव्हीएम’वर ब्रेल लिपीत पक्षांची चिन्हे

0
0
अंध मतदारांना मतदान करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सवर (ईव्हीएम) ब्रेल लिपीतील पक्षांची चिन्हे उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी झाल्यास लाखो अंध मतदारांना मतदान करणे सोयीचे होणार आहे.

पोलिस कोठडी नको; आरोपींचा कोर्टाकडे अर्ज

0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी मनीष नागोरी व विकास खंडेलवाल यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात प्रगती नसल्याने आपली पोलिस कोठडी वाढवू नये, अशी याचिका आरोपींनी बुधवारी कोर्टात दाखल केली.

मनसेची रणनीती आज ठरणार

0
0
राज्यभरात ‘टोल’वरून ‘राडा’ सुरू करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आज (शुक्रवार) होणाऱ्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात निश्चित होण्याची शक्यता आहे.

ग्राहकांची मनस्तापातून सुटका

0
0
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीने गुरुवारी घेतलेल्या निर्णयामुळे डीबीटीएल योजनेमध्ये नोंदणी न केलेल्या तब्बल १८ लाख कुटुंबांची गेल्या तीन महिन्यांमधील मनस्तापातून सुटका होणार आहे.

जवानाची आत्महत्या

0
0
लष्कराच्या आर्टिलरी विभागातील अजय पांडुरंग पाटील (वय २२) या जवानाने घोरपडी येथील लष्कराच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत लष्करातर्फे ‘कोर्ट ऑफ एन्क्वायरी’ करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

अकरावी प्रवेशात बोगस टक्केवारी

0
0
कॉलेजकडे जमा करण्यात आलेल्या गुणपत्रिका आणि प्रवेश समितीने वेबसाइटवर जाहीर केलेली टक्केवारी यामध्ये तफावत आढळली आहे. बड्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठीच ही बोगसगिरी करण्यात आल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात येत असून या कॉलेजचे ‘कट्-ऑफ’ नावापुरतेच असल्याचा दावा केला जात आहे.

नेट-सेटचे स्वरूप पुन्हा बदलणार?

0
0
प्राध्यापक होण्यासाठीची किमान पात्रता असणाऱ्या ‘राष्ट्रीय पात्रता परीक्षा’ (नेट) आणि ‘राज्य पात्रता परीक्षे’चे (सेट) स्वरूप पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे. या दोन्ही परीक्षांचे सध्या असणारे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचे स्वरूप पूर्वीप्रमाणेच, म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रश्नांसोबतच दीर्घोत्तरी प्रश्नांचा समावेश असणारे होण्याविषयीच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images