Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नऱ्हे रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई

$
0
0
शहरातील रस्ते आणि उड्डाणपुलांच्या कामासाठी अडथळे ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पालिकेने जोरदार कारवाई सुरू केली आहे. सिंहगड रोड ते नऱ्हे या रस्त्यावरील सर्व्हिस रोडमध्ये येणाऱ्या अतिक्रमणांवर सोमवारी कारवाई करून तब्बल २५ हजार स्क्वेअरफूट क्षेत्र मोकळे केले गेले.

कँटोन्मेंटची लँड पॉलिसी बदलणार

$
0
0
देशातील कँटोन्मेंटमधील १९९५ ची लँड पॉलिसी (जमीन वापर धोरण) बदलण्याचा विचार सध्या सुरू आहे. त्याअनुशंगाने डायरेक्टर जनरल रवीकांत चोप्रा यांनी पुणे, खडकी, देहूरोड आणि देवळाली कँटोन्मेटच्या सीईओंची बैठक सोमवारी (२० जानेवारी) खडकी कँटोन्मेंटमध्ये घेतली.

करार संपले; वापर बिनदिक्कत सुरू

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाने भाडेतत्त्वावर कराराने दिलेल्या जागांपैकी तब्बल १२० जागांचे करार संपले आहेत. केंद्र सरकारकडून करारनाम्यांना मुदतवाढ ​मिळाली नसल्याने संबंधित जागांचा काराराविनाच वापर करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.

चित्रपटसृष्टीचा इतिहास खुला होणार

$
0
0
भारतीय चित्रपटसृष्टीच्या समृद्ध इतिहासाचा ठेवा जतन करण्यासाठी मुंबईमध्ये उभारण्यात येत असलेल्या चित्रपट संग्रहालयाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. फेब्रुवारीमध्ये या संग्रहालयाचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे.

ई-कचरा विल्हेवाटीसाठी प्रकल्प हवा

$
0
0
‘सध्या ई-कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. ई-कचरा जाळल्यास त्यातून घातक वायू तयार होतात. त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी रोखायची असेल या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारण्यासाठी दबावगट तयार करण्याची गरज आहे,’ असे मत संगणकतज्ज्ञ आणि रोटरीचे प्रांतपाल डॉ. दीपक शिकारपूर यांनी व्यक्त केले.

शहरात दिवसभर ढगाळ हवामान

$
0
0
अरबी समुद्रात निर्माण झालेली चक्रीय स्थिती आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र यामुळे सोमवारी राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामान होते.

ज्युनिअरच्या शिक्षकांचे पुन्हा आंदोलनाचे हत्यार

$
0
0
वारंवार आंदोलन करूनही ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांच्या मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे पुणे विभागीय ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटनेने बारावीच्या परीक्षेच्या तोंडावर पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

संजय दत्तच्या पॅरोलवाढीला ‘मान्यता’

$
0
0
अभिनेता संजय दत्तला आणखी तीस दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. पत्नीचे आजारपण आणि आधीच्या पॅरोलमधील चांगल्या वर्तनाच्या हमीवर पोलिसांच्या अहवालावरून नव्याने पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली.

‘ससून’च्या विस्ताराचा अखेर मार्ग मोकळा

$
0
0
ससून हॉस्पिटलच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून, मंगळवार पेठेतील रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यातील सव्वादोन एकर जागा ससूनला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एसटीच्या खिडकीतून उडी मारल्याने मृत्यू

$
0
0
दिलीप बापू गव्हाणे (वय ५०, रा. रुकडी, हातकणंगले) यांनी पुणे-आजरा या बसच्या खिडकीतून उडी मारल्याने त्यांचा मृत्यू झाला. सातारा रस्त्यावरील बालाजीनगर येथील रविकिरण हॉटेलसमोर सोमवारी दुपारी पावणेतीन वाजता ही घटना घडली.

मनसेचेही आता ‘वॉर्म अप’

$
0
0
पक्षात निर्माण झालेली गटबाजी शमविण्याचा प्रयत्न करीत आगामी लोकसभा निवडणुकांसाठी पुन्हा एकदा संघटना मजबूत करण्यासाठी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’ने तयारी सुरू केली आहे. मनसेच्या शहर कार्यालयात सोमवारी शहर आणि जिल्हा कार्यकारिणीची ‘मॅरेथॉन’ बैठक झाली.

लाच स्वीकारताना अधिकारी अटकेत

$
0
0
अल्पबचत विभागाचे सहायक संचालक गुलाबराव मडावी आणि अधिकारी सुरेंद्र माळवदे यांना आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

शहराच्या मध्यवस्तीत विजेचा खेळखंडोबा

$
0
0
महापालिकेच्यावतीने सिंहगड रोडवर रस्ताखोदाईचे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून वीजवाहिनी तुटली. शहराच्या मध्यवर्ती परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे हाल झाले. आज (मंगळवारी) सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.

वीजदरातील कपातीचा दिलासा कधीपर्यंत?

$
0
0
वीजदरात कपात करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा लाभ किती काळ मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे दरकपातीचा दिलासा कधीपर्यंत राहील, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

भटक्या कुत्र्यांवर प्रशासनाची मेहेरनजर

$
0
0
शहरातील भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर होत असून, महापालिका प्रशासन मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेवकांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी केला. गेल्या अनेक वर्षांपासून शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या भेडसावत आहे.

जन्म-मृत्यू दाखल्याची पहिली प्रत लवकरच मोफत

$
0
0
जन्म-मृत्यू दाखल्याची पहिली प्रत नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत. मात्र, पुणे महापालिकेतर्फे त्यासाठी ‘सर्व्हिस चार्ज’ म्हणून २० रुपये घेतले जात होते.

‘LBT’ उत्पन्न जकातीपेक्षा अधिक

$
0
0
चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या आठ महिन्यांत जकातीच्या तुलनेत नगण्य वसुली असणाऱ्या ‘स्थानिक संस्था करा’ने (एलबीटी) नऊ महिन्यांनंतर एकूण उत्पन्नात आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. डिसेंबर २०१३ पर्यंत ‘एलबीटी’तून पालिकेला ९७८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

‘हत्या तपासाची हवी क्षणाक्षणाची माहिती’

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यापासून आम्हा कुटुंबीयांना हत्येची माहिती मिळेपर्यंत घडलेल्या घटनांची ‘मिनिट टू मिनिट’ माहिती मुक्ता आणि डॉ. हमीद दाभोलकर यांनी पुणे पोलिसांकडे मागितली आहे.

येवलेवाडी : सेना-NCP त जुंपली

$
0
0
महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या येवलेवाडीतील विकासकामांच्या शुभारंभासाठी आयोजित कार्यक्रमावरून पालिकेत शिवसेना, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सोमवारी जोरदार जुंपली.

पुण्याहून सुटणाऱ्या विमानांना विलंब

$
0
0
दिल्लीत वाढलेल्या धुक्याच्या तीव्रतेचा परिणाम सोमवारी पुण्यातील विमानसेवेवर झाला. दिवसभरात पुण्याहून सुटणारी आठ विमाने दहा मिनिटे ते सव्वातास उशिराने सुटली. पुण्याहून दिल्लीला रात्री जाणारे ‘गो एअर’चे विमान तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images