Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शहरात टाउनशिप फोफावणार

$
0
0
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील टाउनशिपवर जादा चटईक्षेत्राची खैरात करणाऱ्या सुधारित टाउनशिप नियमावलीला राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखविला आहे.

तपास जमत नसेल; तर पदमुक्त व्हा

$
0
0
‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासात आम्हाला विश्वासात न घेता जबाबदारी झटकून बोलण्याचा प्रकार निंदनीय आहे. त्यांच्या हत्येचा तपास जमत नसेल, तर पद खाली करा,’ असा इशारा डॉ. दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर यांनी सोमवारी सरकारी यंत्रणेला दिला.

दाभोलकर हत्या : अखेर २ अटकेत

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून नागोरी टोळीतील मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या आरोपींना सोमवारी सायंकाळी ठाणे जेलमधून अटक करण्यात आली. त्यांना मंगळवारी पुण्यात शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे.

‘ड्युफॅस्टॉन’वर जप्तीची कारवाई

$
0
0
गर्भारपणात बाळाची वाढ होण्यासाठी महिलांना दिल्या जाणाऱ्या ‘ड्युफॅस्टॉन’च्या ठराविक बॅचची औषधे बनावट आढळल्याने बारामतीनंतर दौंड तालुक्यातील केडगाव येथे किरकोळ औषध विक्रेत्यावर कारवाई करण्यात आली.

व्यावसायिक सिनेमांना FTII मध्ये ‘नो एंट्री’

$
0
0
मराठी चित्रपटांत सुवर्णकाळ निर्माण करणाऱ्या ‘प्रभात’च्या स्टुडिओच्या आवारात सध्या असलेली ‘फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (एफटीआयआय) अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांकरिता शूटिंगचे एक प्रमुख ‘लोकेशन’ ठरले आहे.

खासगी हॉस्पिटल स्टाफलाही आता पीएफ संरक्षणाचे कवच

$
0
0
पुण्यातील नर्सिंग होम, खासगी हॉस्पिटल आणि लहान दवाखाने यांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) संरक्षण नसल्याने, त्यांना भविष्यात आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) पुढाकार घेतला आहे.

सर्पदंशावरील इंजेक्शनचा तुटवडा

$
0
0
सर्पदंशाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्या तरी दुसरीकडे पेशंटला जीवदान देण्यासाठी औषध दुकानांसह खासगी क्लिनिक, हॉस्पिटलमध्ये प्रतिबंधात्मक इंजेक्शनचा गेल्या सहा महिन्यांपासून तुटवडा निर्माण झाला आहे.

लक्झरी-अॅपेरिक्षा धडकेत मायलेकीचा मृत्यू

$
0
0
घोडेगाव-भिमाशंकर रस्त्यावर पिंपळगाव घोडे येथे लक्झरी आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपेरिक्षाची समोरासमोर धडक होऊन मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. अॅपेरिक्षामधील चालकासह चार विद्यार्थिनींना गंभीर दुखापत झाली आहे. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला.

दीड लाखांचा ऐवज लंपास

$
0
0
हडपसर येथे अमनोरा टाउनशिपमधील टॉवर क्रमांक १५ मधील एका फ्लॅटचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी एक लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी कामिनी संजय वाजे (वय ३७, रा. अमनोरा टाऊनशीप टॉवर क्रमांक १५) यांनी हडपसर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

रेडीमेड कापडाच्या कारखान्यात चोरी

$
0
0
विद्यानगर येथील बंगल्यातील रेडीमेड कापड बनविण्याच्या कारखाना फोडून सव्वा लाखाचा ऐवज चोरीला गेला आहे. ही घटना रविवारी मध्य रात्री घडली असून, विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पर्यटन वाढविण्यासाठी आता ‘होम स्टे’

$
0
0
प्रेक्षणीय स्थळ असलेल्या परिसरात तुमचे घर आहे काय? किंवा एखादे रिकामे मोठे अंगण? आदरातिथ्य करायची तुम्हाला आवड आहे काय? मग महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाला (एमटीडीसी) येऊन भेटा आणि ‘होम स्टे’ योजनेत सहभागी व्हा!

प्रकल्पग्रस्त पुनर्वसनावर राज्याने आयोग नेमावा

$
0
0
राज्यातील धरणग्रस्त प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत राज्य शासनाने आयोगाची नेमणूक करावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि पुनर्वसन मंत्री यांच्याकडे करण्यात येणार आहे.

‘दुष्काळी भागात कारखाना म्हणजे वरदानच!’

$
0
0
‘पुरंदर तालुका हा कायम दुष्काळी तालुका म्हणूनच ओळखला जातो. अशा कोरडवाहू भागात धाडस करून खासगी साखर कारखाना सुरू करणे म्हणजे या भागाचा खरा कायापालट आहे; नव्हे ते वरदानच आहे,’ असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

विश्रांतवाडी-आळंदीपासून बीआरटी लांबच

$
0
0
विश्रांतवाडी-आळंदी आणि नगर रस्ता या मार्गावर मार्चमध्ये बीआरटी सुरू होणार असल्याची घोषणा महापालिकेने केली असली, तरी या रस्त्याची मंगळवारी पाहणी केली असता अजूनही बरेच काम पूर्ण करावे लागणार आहे, असे दिसून आले.

नव्या रेल्वे स्टेशनसाठी अधिक जागेची मागणी

$
0
0
हडपसर येथे नवीन रेल्वे स्टेशन तयार करण्याची योजना रेल्वेकडून तयार करण्यात आली असली, तरी उपलब्ध जागेमध्ये नवीन स्टेशन उभारणे शक्य नसल्याने या उपक्रमासाठी राज्य सरकारने जागा उपलब्ध करून देण्याची मागणी रेल्वेकडून करण्यात आली आहे.

करार संपलेल्यांना संस्थांना पुणे कँटोन्मेंटच्या नोटिसा

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाने भाडेतत्त्वावर दिलेल्या जागांच्या करारांचे नूतनीकरण करून घेण्याबाबत संबंधितांना नोटिसा देण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. बोर्डाने भाडेतत्त्वावर दिलेल्या १२० जागांचे करार संपले असून, कराराविना त्यांचा वापर सुरू आहे.

ऐन थंडीत मावळात पावसाची हजेरी

$
0
0
मावळातील काही भागात व लोणावळा परिसरात मंगळवारी सकाळी हलका पाऊस झाला. अचानक झालेल्या या पावसाने कामगार, विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

लोणावळ्यात चोरट्यांनी पोस्ट ऑफिस जाळले

$
0
0
लोणावळ्यात मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये चोरट्यांनी रोकड न मिळाल्याने, संतापून आग लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मंगळवारी पहाटे ही घटना घडली असून, यामध्ये या ऑफिसमधील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

समिती नियुक्तीचा निर्णय वेळकाढूपणाचा

$
0
0
पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रस्तावावर समिती नेमून राज्य सरकारने पुन्हा वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले आहे, अशी प्रतिक्रिया मंगळवारी (२१ जानेवारी) उमटली.

घाऊक विक्रेत्यांच्या औषधसाठ्याची तपासणी

$
0
0
परवानाधारक घाऊक विक्रेत्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना विकल्या जाणाऱ्या औषधांचा ‘हिशोब’ जुळत नसल्याचे उघडकीस आल्याने राज्यातील सर्व घाऊक औषध विक्रेत्यांकडील औषधसाठ्याची तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) केली जाणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images