Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ब्राह्मोस, आकाश, लाँचर व्हेईकल

$
0
0
लष्कराची वाहने सामान्यांना पाहण्याची संधी क्वचितच मिळते. ब्राह्मोस, आकाश, मोबाइल लाँचर व्हेइकल, रणगाडा आदी जवळून पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे.

शाळा बंद आंदोलनाचा इशारा

$
0
0
शालेय पोषण आहार योजनेच्या कामातून मुख्याध्यापकांना मुक्त करण्यात असमर्थता दर्शविणाऱ्या राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या वक्तव्याचा मुख्याध्यापक संघटने बुधवारी निषेध केला.

बँकांच्या संपाला पुण्यात प्रतिसाद

$
0
0
बँकिंग क्षेत्रातील प्रस्तावित सुधारणांना विरोध करण्यासाठी आणि नव्या वेतन करारासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांना दिलेल्या एक दिवासाच्या लाक्षणिक संपाच्या हाकेला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

दुधाचे दर दोन रुपयांनी वाढले

$
0
0
दूध पावडर उत्पादकांनी दुधाच्या खरेदी दरामध्ये वाढ केल्याचे कारण पुढे करून गाय आणि म्हशीच्या दूध विक्रीच्या दरामध्ये दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय डेअरी चालकांनी घेतला आहे.

रस्ते अपघात व जखमींच्या प्रमाणात राज्यात घट

$
0
0
विस्तारलेले रस्ते, रस्त्यांचा सुधारलेला दर्जा, अत्याधुनिक वाहने यामुळे पुण्या-मुंबईसह संपूर्ण राज्यातील अपघात व जखमींच्या प्रमाणात घट झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाहनांच्या वाढत्या वेगामुळे अपघाती मृत्यूंचे प्रमाण मात्र वाढले आहे.

खासगी ‘ITI’ साठी वर्षभर ऑनलाइन सुविधा

$
0
0
राज्यात कायम विनाअनुदानित तत्त्वावर नवीन खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू करण्यासाठी आता वर्षभर कधीही ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तसेच कोणताही अर्ज न नाकारता त्याची छाननी करून परवानगी देण्याचा निर्णयही राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाने घेतला आहे.

झिरो गार्बेज प्रोजेक्टला पालिकेची मदत

$
0
0
शहरातील कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत महापालिका गांभीर्याने विचार करते आहे. याचे हेतूने ‘जनवाणी’ने कात्रज येथे राबविलेला ‘झिरो गार्बेज’चा उपक्रम नक्कीच उल्लेखनीय आहे.

पर्वतीवर येणा-या वृद्धांसाठी रेलिंगचा आधार

$
0
0
नियमित व्यायाम व पर्यटनासाठी पर्वती टेकडीवर येणाऱ्या वृद्धांना आता स्टीलच्या रेलिंगचा आधार मिळणार आहे. पर्वतीच्या तुटलेल्या व खचलेल्या पायऱ्याही दुरुस्त केल्या जाणार असून, त्यासाठी ५० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

१३ वर्षांनंतर पूर्ण होणार घोले रोड आर्ट गॅलरी

$
0
0
घोले रोड येथील आर्ट गॅलरीचे गेली १३ वर्षे रेंगाळलेले अपूर्ण काम मार्गी लावून हा प्रकल्प येत्या सहा महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने बुधवारी देण्यात आले.

जैन समाजाला लवकरच अल्पसंख्याक दर्जा

$
0
0
डिसेंबरअखेरीस केंद्र सरकारतर्फे जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त होईल, असे आश्वासन केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री के. रेहमान खान आणि केंद्रीय विधी न्यायमंत्री कपिल सिब्बल यांनी भारतीय जैन संघटनेला दिले.

मंडई... गोंगाट नव्हे, पर्यटनस्थळ?

$
0
0
रोजचा बाजार म्हणून ओळखली जाणारी आपली मंडई एक पर्यटनस्थळ म्हणून आपल्या समोर आली तर... शहराच्या सौंदर्यामध्ये भर घालण्याची महत्त्वाची जबाबदारी एक मध्यवर्ती वास्तू म्हणून मंडईने निभावली तर...

बहिरट यांच्यावर गुन्हा दाखल

$
0
0
बनावट जात दाखला तसेच प्रमाणपत्रामुळे नगरसेवकपद गमावलेल्या ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या कल्पना बहिरट यांच्यावर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना खोटी माहिती देवून शासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

उपशिक्षणाधिकारी परीक्षेला ‘MPSC’ची स्थगिती

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) येत्या ५ जानेवारीला आयोजित उपशिक्षणाधिकारी पदाच्या चाळणी परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकारणाने या पदाच्या जाहिरातीला स्थगिती दिल्याने आयोगाने हे पाऊल उचलले आहे.

प्रत्येक जिल्ह्यात पेशंटसाठी तक्रार निवारण सेल

$
0
0
पेशंट आणि डॉक्टरांमधील दुरावलेले संबंध, डॉक्टरांविरोधात असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्य शाखेने प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र ‘तक्रार निवारण सेल’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

अपु-या पाण्यावरून रास्ता रोको

$
0
0
दापोडी परिसरातील अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे गुरुवारी (१९ डिसेंबर) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सुमारे अर्धातास पुणे-मुंबई हायवे रोखून धरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.

भ्रष्टाचाराच्या गर्तेत ‘विशेष शिक्षण’

$
0
0
विशेष आणि अपंग समावेशित शिक्षणासाठी प्रत्यक्ष विद्यार्थी संख्या आणि त्यांना आवश्यक असलेल्या शिक्षकांच्या संच मान्यतांचा कोणताच ताळमेळ नसल्याचे सरकारी आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

MBA, ENGG. चे वेळापत्रक यंदा बिघडणार?

$
0
0
नव्या तंत्रशिक्षण संस्थांच्या मान्यतेच्या प्रक्रियेला यंदा उशीर होण्याची शक्यता आहे. जुन्या संस्थांतील जागावाढींचे प्रस्तावही रखडण्याचीच चिन्हे आहेत. परिणामी, यंदा इंजिनीअरिंग आणि एमबीए प्रवेशांचे वेळापत्रक बिघडेल की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

परवानाधारक विक्रेत्यांवर वरवंटा

$
0
0
मार्केट यार्डमधील सुमारे १७५ परवानाधारक स्टॉल्स व हातगाडीवाल्यांना अनधिकृत ठरवून प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने कारवाईचा इशारा दिला आहे.

कँटोन्मेंट विकास आराखड्याला मंजुरी

$
0
0
रस्ते, पावसाळी गटारे आणि मलनिस्सारण प्रकल्पांना प्राधान्य देणाऱ्या तसेच नागरिकांवर मीटरने पाण्याची सक्ती आणि मलनिस्सारण या नवीन कराचा बोजा लादणाऱ्या पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या २३८ कोटी रुपयांच्या पहिल्या शहर विकास आराखड्याला (सीडीपी) बोर्डाने मान्यता दिली आहे.

महापालिकेने थकविली कँटोन्मेंटची जकात

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून जकात वसूल करण्याच्या बदल्यात पुणे महापालिकेकडून देण्यात येणारी जकातीची रक्कम कमी असल्याने बोर्डाने महापालिकेला थकबाकीदार म्हणून जाहीर केले आहे. महापालिकेकडून बोर्डाला सुमारे २४ कोटी ७९ लाख रुपयांचे देणे असल्याचे उघड झाले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images