Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

थायरॉइड ठरतोय बालकांसाठी धोकादायक

$
0
0
जन्मानंतर लगेचच अथवा तीन दिवसांनंतर केलेल्या चाचणीमध्ये थायरॉइड असल्याचे निदान झाल्यास त्यावर उपचार करणे शक्य होणार आहे. परिणामी मतिमंदत्व येण्यापासून बाळास वाचविता येणार आहे.

गणेश मारणेला हायकोर्टात जामीन

$
0
0
संदीप मोहोळ खूनप्रकरणातील मोका लावण्यात आलेला आरोपी गणेश मारणे याला मुंबई हायकोर्टाने ५० हजार रुपयांच्या जामिनावर सोडण्याचा आदेश दिला आहे. कोथरुड पोलिसांनी संदीप मोहोळ खूनप्रकरणी गणेश मारणे आणि त्याचे इतर १६ साथीदारांवर मोकाअंतर्गत कारवाई केली होती.

दुचाकीस्वार तरुणाचा तळीरामामुळे मृत्यू

$
0
0
विमानतळ रोडवर बुधवारी दुपारी तळीराम दुचाकीस्वाराने राँग साइडने दुचाकी चालवत दुसऱ्या एका दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून पोलिसांनी तळीरामाला अटक केली आहे. अमोल बापू लिंगायत (वय १८, रा. चंदननगर) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

१.५ लाख रुपयांची नेट बँकिंगने फसवणूक

$
0
0
नेट बँकिंगद्वारे ७२ वेळा वेगवेगळे व्यवहार करत सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी टी. एम. सत्यनारायण (रा. पौड रोड) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

आळेकर, डॉ. वाघमारे यांना साहनी आणि आझमी पुरस्कार

$
0
0
बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा बलराज साहनी पुरस्कार ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. साहित्यिक व खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांना कैफी आझमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

थंडीचा मुक्काम अजूनही कायमच

$
0
0
शहरात मागील दोन आठवड्यांपासून थंडीने ठोकलेला मुक्काम अजूनही कायम आहे. गुरुवारी शहरातील किमान तापमानात किंचित घट होऊन सात अंश सेल्सियस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. तर दुसरीकडे किमान तापमानात वाढ होऊन ३०.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

मुंबईप्रमाणेच नुकसानभरपाई द्यावी

$
0
0
खेड विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या शेतजमिनींसाठी मुंबईच्या धर्तीवर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार मोहन जोशी यांनी विधान परिषदेत केली. मगरपट्टा सिटीच्या धर्तीवर स्थानिकांना प्रकल्पात सहभागी करून घेण्याची सूचनाही त्यांनी केली.

शहर काँग्रेसची CM कडून झाडाझडती

$
0
0
काँग्रेसच्या १२८व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी २८ डिसेंबरला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शहरात येत आहे. यानिमित्त शहर काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, आमदार, नगरसेवक यांची बैठक घेऊन मुख्यमंत्री शहर काँग्रेसच्या कारभाराची झाडाझडती घेणार आहे.

केमिस्ट - FDA वादावर लवकरच तोडगा

$
0
0
मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) सचिवांच्या अध्यक्षतेखाली केमिस्टांसह अधिकाऱ्यांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने लवकरच या संघर्षाचा तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

लोणावळा बोगद्याला आडवी पायाभूत समिती

$
0
0
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात होणाऱ्या वाहतूक कोंडीला पर्याय ठरणारा खोपोली ते लोणावळा भुयारी मार्ग व पुणे शहराभोवतीचा प्रस्तावित रिंगरोड हा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत समितीच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत अडकला आहे.

आक्षेपार्ह फोटोंच्या धमकीने खंडणी मागणारा अटकेत

$
0
0
मोबाइलवरून ‘व्हॉटसअप’वर आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो टाकून बदनामी करण्याची धमकी देऊन त्याबदल्यात साडेचार लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला तरुणाला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नागोरी टोळीकडूनही धागेदोरे नाहीत हाती

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनप्रकरणात शस्त्र पुरविल्याच्या संशयावरुन मनीष नागोरी टोळीकडे सुरु करण्यात आलेल्या तपासात पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे लागले नाहीत.

शनिपारच्या बस आता मंडईतून सुटणार

$
0
0
अतिक्रमणमुक्त झालेली महात्मा फुले मंडई कायमस्वरूपी मोकळी राहावी, यासाठी शनिपार येथून सुटणाऱ्या बस मंडईतून सोडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

पुणेकरांच्या मानगुटीवर ‘पे अँड पार्क’चे भूत

$
0
0
शहरातील नागरिकांना पुरेशी वाहनतळांची सुविधा देण्यास असमर्थ ठरलेल्या पालिकेतील सत्ताधारी पक्षाने लाखो दुचाकीस्वारांच्या मानगुटीवर ‘पे अँड पार्कचे’ भूत बसविण्याचा घाट घातला आहे.

दाभोलकर हत्येचे गूढ ४ महिन्यांनंतरही कायम

$
0
0
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी वापरलेले संशयित पिस्तुल पोलिसांना मिळाले असले तरी गुन्हेगारांना अटक करण्यात अद्यापपर्यंत अपयश आले आहे. दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि पुणे पोलिसांनी संशयित गुन्हेगारांना वेगवेगळ्या पाचहून अधिक गुन्ह्यांत अटक केली.

हद्दवाढीनंतर पुणे होणार मुंबईपेक्षा मोठे शहर

$
0
0
पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने ३४ गावांचा समावेश करण्याच्या निर्णयामुळे महापालिकेची हद्द दुप्पट झाली आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीच राज्याची राजधानी असलेल्या मुंबई पेक्षा पुणे अव्वल ठरले असून शहराचे क्षेत्रफळ सर्वसाधारण ५६० चौरस किलोमीटरवर पोहचले आहे.

प्रमुख ४५ रस्ते ‘ना फेरीवाला क्षेत्र’

$
0
0
शहरात यापूर्वी अस्तित्त्वात असलेले ‘नो हॉकर्स झोन’च नव्या फेरीवाला धोरणानुसार ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून यापुढेही कायम राहणार आहेत. या रस्त्यांवर आणि रस्त्यांवरील महत्त्वाच्या चौकांमध्ये फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नाही.

फेरीवाल्यांच्या फीमध्ये वाढ

$
0
0
फेरीवाल्यांचे सर्वेक्षण, व्यवसायासाठी जागा आणि परवान्यासह फोटो ओळखपत्र पालिकेतर्फे देण्यात येणार असल्याने त्यासाठी फेरीवाल्यांना पालिकेकडे ‘परवाना फी’ जमा करावी लागणार आहे. पालिकेतर्फे हक्काची जागा आणि इतर सुविधा मिळणार असल्याने या फीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियन महिलेने घडविले माणुसकीचे दर्शन

$
0
0
हृदयरोगाचा आजार असल्याने बायपास करण्याचा सल्ला दिल्यानंतर केवळ पैशाअभावी ऑपरेशन करणे अशक्य झाले आणि एक दिवस रिक्षात बसलेल्या प्रवाशी ऑस्ट्रोलियन महिलेने केवळ रिक्षाचे भाडेच दिले नाही; तर त्या रिक्षाचालकाच्या बायपासच्या ऑपरेशनचा खर्च करून त्याला माणुसकीचे दर्शनही घडविले.

इतर मोकळ्या जागा द्या

$
0
0
फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांसाठी ‘ना फेरीवाला क्षेत्र’ निश्चित करण्यासह ‘फेरीवाला क्षेत्र’ही निश्चित केले जावे; तसेच उपनगरांतील पालिकेच्या ताब्यातील अॅमेनिटी स्पेस आणि इतर मोकळ्या जागांवर व्यवसाय करण्यास परवानगी दिली जावी, अशी मागणी जाणीव संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images