Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वाहतुकीच्या समस्येवर विद्यार्थ्यांचा तोडगा

$
0
0
वाहतुकीच्या समस्येवर उपाय सुचविण्यासाठी ‘स्टुडंट ट्रॅफिक पार्लमेंट’चे आयोजन करण्यात आले असून देशात प्रथमच अशाप्रकारच्या परिषदेचे विद्यार्थ्यांतर्फे होत आहे. यात वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ, सरकारी अधिकारी सहभागी होणार आहेत.

पर्यावरणाचा ध्यास... नेपाळपर्यंत सायकल प्रवास

$
0
0
पर्यावरण जागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांतर्फे शहराच्या विविध सातत्याने जनजागृतीपर उपक्रम सुरू असतात; पण ग्रामीण भागात राहणाऱ्या गावकऱ्यांनाही पर्यावरण, प्रदूषण, वन्यजीव संवर्धनाचे धडे मिळावेत, या उद्देशाने पांडुरंग शिंदे यांनी अनोखा उपक्रम राबविला.

मजुरांच्या ७४ टक्के बालकांना लसीकरण अपूर्ण

$
0
0
पुण्यासारख्या शहरासह राज्यात पाच वर्षांच्या आतील बालकांना शंभर टक्के लसीकरण झाल्याचा गवगवा करीत आरोग्य खात्याकडून स्वतःची पाठ थोपटविण्यात येते.

‘प्रिस्क्रिप्शन’विना सर्दी-तापाच्या गोळ्या मिळणार

$
0
0
सर्दी, तापासह डोकेदुखी, अंगदुखीसारख्या औषध दुकानात सहज मिळणाऱ्या औषधांसाठी ‘प्रिस्क्रिप्शन’ची मागणी केली जाणार नाही. प्रिस्क्रिप्शनशिवाय ही औषधे मिळतील, असे राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे राज्यमंत्री सतेज पाटील यांनी विधानसभेत जाहीर केले.

लढा… हिंजवडीच्या वाहतूक कोंडीविरोधात

$
0
0
हिंजवडी येथे राजीव गांधी इन्फोटेक पार्क सुरू होऊन पुण्याचा संपूर्ण चेहरामोहरा बदलला, हे कुणीही नाकारू शकणार नाही. येथील उद्योगांमुळे देशाच्या निर्यातीत १०० अब्ज डॉलरची वाढ झाली.

कर्मचारी दिनाचेही वाजले तीन तेरा

$
0
0
एसटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाकडून आयोजित कर्मचारी दिवसाला थंडा प्रतिसाद मिळाला. बुधवारी दिवसभरात शिवाजीनगर बसस्थानकावर दहा कर्मचाऱ्यांनी तक्रारी सांगितल्या, तर स्वारगेट बसस्थानकावर एकाही कर्मचाऱ्याने तक्रारीची नोंद केली नाही.

शनिवारवाडा महोत्सवाला २२ डिसेंबरपासून सुरुवात

$
0
0
गुलाबी थंडीने शहरातील वातावरण आल्हाददायी झाले असतानाच, १४व्या शनिवारवाडा कला महोत्सवात वाद्यवादन, नाट्यसंगीत अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी पुणेकरांना मिळणार आहे. २२ ते २५ डिसेंबर दरम्यान, शनिवारवाड्याच्या प्रांगणात हा महोत्सव रंगणार आहे.

बौद्धिक चळवळीची अविरत परंपरा

$
0
0
हडपसरमध्ये गेली २७ वर्षे व्याख्यानमालेच्या माध्यमातून बौद्धिक चळवळीला दिशा देण्याचे कार्य ‘साने गुरुजी वाचनालय’ करत आहे. संस्थेतर्फे आयोजित ‘डॉ. लोहिया जयप्रकाश व्याख्यानमाले’चे यंदा २८वे वर्ष आहे. त्यानिमित्त…

सेवेत कायम करण्यासाठी ससूनच्या कर्मचाऱ्यांचे उपोषण

$
0
0
बदली कामगारांना नोकरीत कायम करण्यात यावे, या मागणीसाठी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून हॉस्पिटलच्या बदली कर्मचाऱ्यांनी हॉस्पिटलबाहेर बुधवारपासून उपोषणास सुरुवात केली.

पुणे कॅन्टोन्मेंटला हवा राज्य सरकारकडून निधी

$
0
0
राज्य सरकार पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून व्हॅट, करमणूक कर आदी कर वसूल करत असल्याने या करातील हिस्सा सरकारने द्यावा. तसेच बोर्डातील नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या २८ योजना लागू करण्याचा प्रस्ताव बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत मान्य करण्यात आला.

फॅशन स्ट्रीटसाठी स्वतंत्र पोलिस चौकी

$
0
0
फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये लागलेली आग आणि या मार्केटच्या परिसरात नेहमीच असलेले तणावाचे वातावरण या पार्श्वभूमीवर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने मार्केटमध्ये स्वतंत्र पोलिस चौकी उभारण्याचा निर्णय बुधवारी सर्वसाधारण सभेत घेतला.

साहित्य संमेलनाला २५ लाखांचा निधी मंजूर

$
0
0
सासवड येथे होणाऱ्या ८७ व्या अखिल भारतीय सहित्य संमेलनासाठी राज्य सरकारने २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. येत्या ३ ते ५ जानेवारी २०१४ दरम्यान हे साहित्य संमेलन होत आहे.

नॉन क्रीिमलेअर दाखल्यांची चौकशी

$
0
0
राज्याच्या विविध भागांमधील अपात्र अर्जदारांना नॉन क्रीिमलेअर दाखले देण्यात आल्याची प्रकरणे उघडकीस आली आहे. या प्रकरणी हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार या दाखल्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

टळणार प्रॉपर्टी खरेदीतील फसवणूक

$
0
0
मिळकत खरेदी करतानाच त्याच्या मालकी हक्कांची पडताळणी ऑन दि स्पॉट करणे आता शक्य झाले आहे. दुय्यम निबंधकांकडे व्यवहारांची नोंद करतानाच ‘व्ह्यू सात-बारा’ हा नवा ऑप्शन उपलब्ध करून दिला असून मालकी हक्कांवरून होणाऱ्या फसवणुकीचे बहुसंख्य प्रकार टळणार आहेत.

‘ससून’च्या डॉक्टरांनी घेतली अण्णांची काळजी

$
0
0
लोकपाल विधेयक मंजूर करण्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या उपोषणादरम्यान त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याची जबाबदारी ससून हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने उचलली.

मॉलमालकाला लुटले; दोन पोलिसांना अटक

$
0
0
मॉलमालकाला अडवून त्याच्याकडील ९० लाख रुपयांचा ऐवज लुटल्याप्रकरणी दोन पोलिसांना अटक केली आहे. संपत पारधी आणि आशिष अशोक पवार अशी त्यांची नावे असून, ते अनुक्रमे भोसरी आणि डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये कामाला आहेत.

पालिकेच्या हद्दीत ३५ गावांच्या समावेशाचा मार्ग मोकळा

$
0
0
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने मित्रपक्ष काँग्रेसचा विरोध मोडून काढत हद्दीलगतच्या सात गावांसह एकूण ३५ गावांचा पुण्याच्या हद्दीमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव विरोधकांच्या साथीने बुधवारी मंजूर करून घेतला.

सोनसाखळी चोरांना पोलिस-नागरिकांनी पकडले

$
0
0
पीएमपी’ बसमधून चाललेल्या ६० वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावत पळ काढणाऱ्या चोरट्याला बंडगार्डन पोलिस ठाण्याचे दोन पोलिस कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी आठ मिनिटे पाठलाग करत पकडले. पुणे स्टेशन येथे बुधवारी दुपारी हा प्रकार घडला.

वजन घटवा अन् कपडे दान करा!

$
0
0
एकीकडे कुपोषणाने बालकांचा मृत्यू होत असताना दुसरीकडे देशात लठ्ठपणा वाढत असल्याने चिंता वाढू लागली आहे. बॅरिअॅट्रिक सर्जरीद्वारे वाढलेले वजन कमी केल्यानंतर न येणारे कपडे गरजूंना दान करण्याची नवी संकल्पना राबविण्यात येत आहे.

टिळकांवरील चित्रपटाचे रहस्य

$
0
0
भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारने हाती घेतलेल्या योजनेत भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावरील चित्रपटाला अनुदान देण्याचा विसर केंद्र सरकारला पडला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images