Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

शिक्षण व्यवस्थेची पुनर्रचना व्हायला हवी

$
0
0
‘आपल्याकडील शिक्षण व्यवस्थेची संपूर्ण पुनर्रचना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी वर्गाच्या संकल्पनेत बदल घडवावा लागेल.

भामा आसखेडची निम्मी पाइपलाइन मंजूर

$
0
0
शहरातील पूर्व भाग असलेल्या वडगाव शेरी, खराडी, विमाननगरसह येरवडा भागातील नागरिकांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या भामा आसखेड योजनेच्या २६ किलोमीटर पाइपलाइनला सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली.

उच्च शिक्षणाचे अनुदान धोक्यात

$
0
0
राज्य उच्च शिक्षण परिषदेच्या नियमित बैठका न घेतल्यामुळे केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ महाराष्ट्रावर येण्याचा धोका आहे.

S. M. जोशींच्या टपाल तिकिटाचा मार्ग मोकळा

$
0
0
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार व ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्या टपाल तिकिटाच्या प्रकाशनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘एसेम’ यांच्या टपाल तिकीटासाठी आवश्यक असलेला अहवाल जिल्हाधिकारी प्रशासनाने नुकताच राज्य सरकारला पाठविला आहे.

धाडसी विद्यार्थिनीचा निर्भय प्रतिकार

$
0
0
दिल्ली बलात्काराला सोमवारी एक वर्ष पूर्ण झाले. देशभरात त्या घटनेचा निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी दापोडी ते खडकी या दरम्यान अशाच एका ‘निर्भया’वर ओढवलेला अतिप्रसंग तिच्या धाडसामुळे टळला आणि ती बचावली.

प्रथमच वाळू उपशाचे ई-ऑक्शन

$
0
0
जिल्ह्यातील ९० भूखंडांपैकी २२ ठिकाणच्या वाळू उपसा परवान्याचे लिलाव नुकतेच पार पडले असून त्यातून जिल्हा प्रशासनाला अपेक्षेपेक्षा जवळपास दीडपट महसूल मिळणार आहे. दरम्यान, उरलेल्या भूखंडांचे लिलाव येत्या महिन्याअखेरीस होणार असल्याची माहिती सोमवारी देण्यात आली.

कंत्राटदारांवर ‘पीएफ’ची नजर

$
0
0
बांधकाम कंत्राटदारांकडे काम करणाऱ्या कामगारांचे भविष्य सुरक्षित रहावे, यासाठी आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खात्याच्या पुणे विभागाने पुढाकार घेतला आहे. ‘पीएफ’ खात्याने पुण्यातील बांधकाम कंत्राटदारांची माहिती मिळविण्यास सुरुवात केली असून, २० पेक्षा जास्त कामगार असतानाही ‘पीएफ’कडे कर्मचाऱ्यांची नोंद न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

CRF केबल फॉर्म देण्यास मुदतवाढ

$
0
0
सेट टॉप बॉक्स बसविलेल्या ग्राहकांची माहिती असलेले सीआरएफ फॉर्म्स भरून देण्यासाठी येत्या महिन्याअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) वतीने सोमवारी हा निर्णय घेण्यात आला.

पोटगी न देणा-या पतीला दणका

$
0
0
घटस्फोटानंतर दुसरे लग्न केलेल्या महिलेला पोटगी देण्यास नकार करणाऱ्या पतीला कोर्टाने तिला दरमहा तीन हजार रुपयांची पोटगी देण्याचा आदेश दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांच्या कोर्टाने हा आदेश दिला.

घरफोड्या; बंटी-बबली गजाआड

$
0
0
शहरात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या बंटी आणि बबलीला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या सहा महिन्यांत त्यांनी घरफोडीचे आठ गुन्हे केले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून २५९ ग्रॅम सोन्याचे तर २०० ग्रॅम चांदीचे दागिने असा पावणेपाच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

डायबेटिसच्या गोळ्यांसाठी वणवण

$
0
0
औषध विक्रेत्यांच्या बंदमुळे सकाळपासून दुकानांना टाळे लावल्याने सर्दी, ताप, खोकला, बीपी, डायबेटिससारख्या आजाराच्या नियमितपणे लागणाऱ्या औषधांसाठी पेशंटला वणवण करावी लागली. औषधे मिळत नसल्याने शहरातील पेशंटचे चांगलेच हाल झाल्याने पेशंटकडून संताप व्यक्त करण्यात आला.

अभिनेता अरमान कोहलीला अटक

$
0
0
‘बिग बॉस’च्या घरातील आदळआपट रस्त्यावर पोहोचली असून मॉडेल व अभिनेत्री सोफिया हयात हिला लादी पुसायच्या मॉबने मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता अरमान कोहली याला लोणावळा पोलिसांनी अटक केली आहे. बिग बॉसच्या घरातून एखाद्या स्पर्धकाला अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मारकुट्या आरमानची सुटका

$
0
0
मॉ़डेल सोफिया हयात हिला झाडूने मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता आरमान कोहली याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

‘कँन्टोन्मेंट’च्या दुकानदारांकडे व्यवसाय परवाने नाहीत

$
0
0
पुणे कँटोन्मेंट बोर्डाने विक्री परवान्यांचे नूतनीकरण केले नसल्याने बोर्डाच्या हद्दीतील दुकानदारांकडून विनापरवाना व्यवसाय केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. बोर्डाकडून दर वर्षी परवान्यांचे नूतनीकरण करण्यात येते.

सहज मिळणा-या औषधांची यादी जाहीर करा

$
0
0
औषध दुकानात सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखीसारखी कोणतीही औषधे आता प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणार नसल्याने औषध दुकानात सहज मिळणाऱ्या औषधांची यादी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ‘प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे नाही’ असा नवा फतवा एफडीएने काढला आहे.

ताम्हिणीत आता होम स्टे आणि नेचर ट्रेल

$
0
0
पावसाळ्यातील धबधब्यांबरोबरच इतर ऋतूतील ताम्हिणीचे निसर्गसौंदर्य अधिकाधिक निसर्गप्रेमींना अनुभवायला मिळावे, या उद्देशाने वन विभागातर्फे ताम्हिणी अभयारण्य परिसरात आता होम स्टेची सुविधा आणि नेचर ट्रेल सुरू करण्यात येणार आहेत.

‘आयटी पार्क’साठी भूसंपादन सुरू

$
0
0
राजीव गांधी आयटी पार्कच्या तिसऱ्या टप्प्यात माण व भोईरवाडीमधील सुमारे ९३ एकर जमिनीच्या भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. मात्र आता हा विरोध डावलून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

‘इंद्रायणी’चा श्वास मोकळा होणार

$
0
0
कचरा, प्रदूषणापासून सुटका करून इंद्रायणी नदीचे पुनरूज्जीवन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिल्हा प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. लोकसहभागातून हा प्रकल्प पूर्ण करण्याची योजना असून सरकारी विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि एनजीओंच्या साह्याने इंद्रायणीचा श्वास मोकळा करण्यात येणार आहे.

‘महाराष्ट्र फाऊंडेशन’चे पुरस्कार जाहीर

$
0
0
अमेरिकास्थित महाराष्ट्रीय नागरिकांनी स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’तर्फे देण्यात येणारा साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर तर सामाजिक कार्याचा जीवनगौरव पुरस्कार रयत शिक्षण संस्थेला जाहीर झाला आहे.

उपमहापौर घेणार संरक्षणमंत्र्यांची भेट

$
0
0
कोरेगाव पार्क; तसेच मुंढवा भागातील नागरिकांचा वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा मुंढवा आणि घोरपडी रेल्वे उड्डाणपूल उभारण्यास लष्कराची मान्यता मिळावी, यासाठी उपमहापौर बंडू गायकवाड संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांची उद्या (बुधवारी) १८ डिसेंबरला भेट घेणार आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images