Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

तिकिटासाठी कलमाडी लागले कामाला

$
0
0
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुरेश कलमाडी यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. यानिमित्ताने शहरात जमवाजमव करून त्यांनी दबावतंत्राचा अवलंब सुरू केल्याची चर्चा काँग्रेसच्या काही गोटांमध्ये सुरू आहे.

हनीनं जिंकलं पुणेकरांना

$
0
0
यो यो हनी सिंगनं स्टेजवर धमाकेदार एंट्री घेतली आणि बालेवाडी मैदानावरील तब्बल २५ हजार प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. हनी सिंगला ऐकण्यासाठी जमलेल्या या मेळ्यात कुणी टाचा वर करून त्याची एक झलक डोळ्यात साठविण्यासाठी प्रयत्न करीत होतं

घुमणार ‘पुरुषोत्तम’चा आव्वाज

$
0
0
पुरुषोत्तम करंडकाच्या महाअंतिम फेरीत राज्यभरातील विजेत्यांचा कलाविष्कार पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

डीजे क्रिस्ट्रिन श्रॉटच्या तालावर थिरकले पुणे

$
0
0
प्रसिद्ध युरोपियन डीजे क्रिस्ट्रिन श्रॉट नुकतीच पुण्यात येऊन गेली. साउंड मिक्सिंगच्या जोरावर तिनं डीजे नाइटचं वातावरण अक्षरशः भारून टाकलं होतं.

‘जादूटोणाविरोधी’मधील शाब्दिक चुका बदला

$
0
0
‘विधानसभेने नुकत्याच मंजूर केलेल्या जादूटोणाविरोधी कायद्यातील काही बाबी पुरेशा स्पष्ट झालेल्या नाहीत. या कायद्यातील काही शाब्दिक चुका कायम राहिल्यास भविष्यात गोंधळ निर्माण होण्याबरोबरच या कायद्याचा दुरूपयोग होऊ शकतो.

जुन्या पुण्याच्या आठवणी जपणा-या पोस्टकार्डचा लिलाव

$
0
0
शिवाजी महाराजांचा होन, ऑस्ट्रेलियाचे एक किलो चांदीचे तीस डॉलर, अकबरकालीन सोन्याचे नाणे अशा दुर्मिळ चलनांबरोबरच जुन्या पुण्याचे दर्शन १९ ते २२ डिसेंबर या कालावधीत ‘कॉइनेक्स २०१३’ या प्रदर्शनाच्या निमित्ताने पुणेकरांना घेता येणार आहे.

अॅलोपॅथी प्रॅक्टिसची मुभा हवीच

$
0
0
होमिओपॅथीच्या डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिसची मुभा मिळावी यासाठी गेल्या पंचवीस वर्षांपासून डॉक्टरांचा लढा सुरू आहे. मात्र सरकार त्यांना दाद देत नाही. त्यामुळे होमिओपॅथीच्या विविध संघटना एकत्र येऊन संघर्ष समितीचे नागपूरला आंदोलन सुरू आहे.

विकास आणि पर्यावरणात ‘किंवा’ची बाधा नको

$
0
0
आपण नेहमी विकास ‘किंवा’ पर्यावरण असाच विचार करतो, पण भारताचा समृद्ध आणि सुंतलित विकास करायचा असेल तर आता ‘किंवा’ या शब्दाची जागा ‘आणि’ ने घेण्याची आवशक्ता आहे.

कर्मचा-यांकडून ट्रॅव्हल्स कंपनीची फसवणूक

$
0
0
बनावट ग्राहक तसेच सप्लायर तयार करून ट्रॅव्हल्स व टुर्स कंपनीची एक कोटी ७१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीच्या ब्रँच मॅनेजरसह चार आरोपींविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विमानतळावर १२ लाखांचे सोने जप्त

$
0
0
तपास यंत्रणांना चकवा देण्यासाठी खजुराची बी काढून त्यात सोन्याची लगड लपविण्याचा प्रकार लोहगाव विमानतळावर उघडकीस आला आहे. सीमा शुक्ल विभागाच्या (कस्टम) अधिकाऱ्यांनी केरळ येथील एका तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडून ४०८ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.

आता ‘एक दिवस अंगणवाडीसाठी’

$
0
0
‘एक दिवस शाळेसाठी’ या उपक्रमाला मिळालेला उल्लेखनीय प्रतिसाद पाहून आता पुणे जिल्हा परिषदेने ‘एक दिवस अंगणवाडीसाठी’ हा उपक्रम हाती घेऊन एक पाऊल पुढे टाकण्याचे ठरविले आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सोमवारी हा ठराव मान्य करण्यात आला.

‘CS’ परीक्षा देणा-यांचे ‘M.COM’चे पेपर नंतर

$
0
0
पुणे विद्यापीठाचे एमकॉम अभ्यासक्रमाचे जे विद्यार्थी २० आणि २१ डिसेंबरला होणाऱ्या कंपनी सेक्रेटरीच्या (सीएस) परीक्षेलाही बसणार आहेत, त्यांचे या दोन दिवशी होणारे ‘एमकॉम’चे पेपर नंतर स्वतंत्रपणे घेतले जाणार आहे.

‘मेट्रोच्या तरतुदींचा फेरविचार करा’

$
0
0
मेट्रोच्या दोन्ही बाजुस दहा मीटरपर्यंत ‘ना विकास क्षेत्र’ ठेवल्याने त्या अंतर्गत सध्या अस्तित्त्वात असलेल्या अपार्टमेंट, बंगले, दुकाने यांचे काय होणार, मेट्रोसाठी या सर्वांना विस्थापित करण्याची पालिकेची योजना आहे का, अशी विचारणा पुणे जनहित आघाडीच्या उज्ज्वल केसकर यांनी केली आहे.

‘गुटखा विक्रीच्या तक्रारींची दखल घ्या’

$
0
0
‘गुटख्याच्या विक्रीसंदर्भात आलेल्या तक्रारींची अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घ्यावी,’ अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी सोमवारी दिले. राज्य सरकारने गुटखाबंदी केल्यानंतरही अनेक ठिकाणी गुटख्याची सर्रास विक्री सुरू होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. ठिकठिकाणी खुलेआम दुकानांमधून गुटख्याची भरमसाट किंमतीला विक्री सुरू आहे.

कोर्टाच्या आदेशामुळे बंद घेतला मागे

$
0
0
‘औषध विक्रेत्यांनी जनहितार्थ संप मागे घ्यावा असे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे कोर्टाचा मान राखून आम्ही आमचा तीन दिवसीय बंद मागे घेत आहोत,’ अशी माहिती राज्य औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी ‘मटा’ला दिली.

१२ व्या पंचवार्षिक योजनेत पाणी व्यवस्थापनावर भर

$
0
0
‘पाण्याचा विविध कारणांसाठी होणारा वापर लक्षात घेऊन बाराव्या पंचवार्षिक योजनेत व्यापक धोरण तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये पाण्याच्या योग्य व्यवस्थापनावर भर देण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर लोकसहभागातून पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

‘BDP’च्या तेराशे हरकतींवर सुनावाणी

$
0
0
महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट २३ गावांतील जैव वैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) आरक्षणावर गेल्या बारा दिवसात १३०० हरकती आणि सूचनांवर सुनावणी झाली. सर्वसामान्यांच्या हक्काच्या जागेवर ‘बीडीपी’चे आरक्षण टाकताना जागा मालकांना शंभर टक्के टीडीआर किंवा संपूर्ण मोबदला द्यावा, अशी मागणी जागा मालकांनी केली.

हडपसर महापालिकेबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र

$
0
0
हडपसर-हवेलीसाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याच्या मागणीचा आवाज सोमवारी विधिमंडळाच्या अधिवेशनापर्यंत पोहोचला. स्वतंत्र महापालिकेचा प्राधान्याने विचार करण्याचे पत्र आमदार महादेव बाबर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिले.

‘ई-गव्हर्नन्स’ प्रकल्पाला स्थायीत मान्यता

$
0
0
जन्म-मृत्यूपासून विवाहनोंदणीपर्यंत आणि परवान्यांपासून पाणीपुरवठ्यापर्यंत महापालिकेच्या विविध २२ सेवा आता ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. तसेच, पालिकेच्या ‘नागरी सुविधा केंद्रां’द्वारे जात, रहिवास, उत्पन्न, नॉन-क्रीमिलेअर या दाखल्यांची सुविधाही याद्वारे नागरिकांना मिळणार आहे.

बेशिस्त पुणेकरांसाठी ३३ लाख पोलिस हवेत

$
0
0
पुणेकरांमध्ये स्वयंशिस्तीचा अभाव आहे, त्यामुळे ३३ लाख पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी एका नागरिकामागे एक पोलिस देण्याची आवश्यकता असल्याची टीका महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images