Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

काँग्रेसचे जेननेक्स्टला अपील

$
0
0
नव्या मतदारांची ताकद ओळखून काँग्रेसने आता यंगिस्तानकडे लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले असून, काँग्रेसशी संलग्न एनएसयूआयला त्यासाठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची मते व सूचना घेण्यासाठी शहर एनएसयूआयतर्फे महत्त्वाच्या सूचनांचे 'घोषणापत्र २०१४' चे रविवारी प्रकाशन करण्यात आले.

शि. प्र. मंडळीची वादग्रस्त प्राप्तीकर फाइल गायब

$
0
0
शिक्षण प्रसारक मंडळी संस्थेच्या २५ कोटी ३४ लाख रुपयांच्या प्राप्तीकर प्रकरणाची फाईल धर्मादाय आयुक्त कार्यालयातून गायब झाल्याची माहिती उघडकीस आली आहे.

मल्टि सिस्टिम ऑपरेटरची बैठक

$
0
0
सेट टॉप बॉक्स बसविलेल्या ग्राहकांच्या माहितीचे फॉर्म्स (सीआरएफ) सादर करण्यासंदर्भात टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (ट्राय) वतीने आज(सोमवारी) देशभरातील मल्टी सिस्टिम ऑपरेटर्सची (एमएसओ) बैठक बोलाविली आहे.

'मेस्मा'च्या विरोधात केमिस्ट हायकोर्टात

$
0
0
औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या संपाला दडपून टाकण्यासाठी राज्य सरकारने अत्यावश्यक सेवा कायद्यांतर्गत (मेस्मा) कारवाई करण्याचा इशारा दिला असला, तरी औषध विक्रेत्यांचा बंद सुरूच ठेवण्याचा निर्धार राज्य औषध विक्रेता संघटनेने केला आहे.

औषध विक्रेत्यांवर दबाव आणल्यास कारवाई

$
0
0
औषध विक्रेत्यांनी दुकाने उघडू नये यासाठी त्यांच्यावर दबाव आणणाऱ्यांवर पोलिसांमार्फत कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यातील सुमारे दोन हजार औषध विक्रेत्यांनी दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

गॅरेज आणि पानस्टॉलला धायरीत आग

$
0
0
धायरी येथे रविवारी पहाटे लागलेल्या आगीत दोन गॅरेज आणि एक स्टॉल जळून खाक झाले. दुचाकी दुरुस्तीचे कामे करण्यात येत असलेल्या या गॅरेजमधील सहा दुचाकी जळाल्या आहेत. दरम्यान, खराडी बायपास येथे रविवारी सकाळी एका गोडाऊनला आग लागली होती.

थंडीची लाट कायमच

$
0
0
पहाटे वाहणारे गार वारे, दुपारी चटका बसवणारे ऊन आणि संध्याकाळनंतर पुन्हा बोचरी थंडी असा वातावरणातील बदल पुणेकरांची जणू परीक्षाच पाहात आहे. शहरात सुमारे आठवडाभराहून अधिक काळ थंडी मुक्काम ठोकून असली, तरीही दिवसभराच्या तापमानात पडणारा सरासरी २२ अंशांचा मोठा फरक पुणेकरांसाठी ‘तापदायक’ ठरत आहे.

लेखकाकडे हवी संवेदनशीलता

$
0
0
'लेखनासाठी लेखकाकडे सर्जनशीलता आणि संवेदनशीलता असणे महत्त्वाचे आहे. सांस्कृतिक परिवर्तनवादी चळवळीसाठी सर्जनशीलता आणि संवेदनशीलता असलेले लेखक घडवले पाहिजेत', असे मत ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांनी रविवारी व्यक्त केले.

प्रेक्षणीय गायन आणि वीणा वादनाची स्वरमोहिनी

$
0
0
संपूर्ण महोत्सवात एकमेव वीणा वादन होणार, म्हणून या सादरीकरणाबद्दल चांगलीच उत्सुकता रसिकांच्या मनात होती. ती उत्सुकता केवळ शमवली नाही, तर त्या वीणा वादनाने दणदणीत ‘वन्स मोअर’ही मिळवला. ही जादू होती, जयंती कुमरेश या कलावतीची. त्यांनी अर्जुन कुमार (मृदंगम्) आणि त्रिचीकृष्णन् (घट्टम्) यांच्या साथीत मंचावर अक्षरशः कमाल केली.

हडपसर-हवेलीसाठी स्वतंत्र महापालिका

$
0
0
हक्काचा निधीसापासून वंचित राहिलेल्या पूर्व भागाला विकासाच्या गंगेत सामावून घेण्यासाठी हडपसर-हवेली स्वतंत्र महापालिकेची स्थापना करण्याचा सर्वपक्षीय ठराव रविवारी करण्यात आला.

'माय स्टॅम्प'वर प्रेमाची मोहोर

$
0
0
टपाल खात्याकडून मुख्य टपाल कार्यालय (जीपीओ) येथे सुरू करण्यात आलेल्या ‘माय स्टॅम्प’ या योजनेअंतर्गत स्वतःचा फोटो असलेले टपाल तिकीट तयार करून घेण्यासाठी पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद मिळू लागला आहे. पुण्यानंतर १७ डिसेंबर रोजी नागपूरला आणि त्यानंतर नाशिकला ही योजना सुरू केली जाणार आहे.

वाङ्मयीन इतिहासाची पद्धतशीर मांडणी हवी

$
0
0
‘लेखक, प्रकाशक आणि वाचकांमध्ये असणाऱ्या कळप संस्कृतीमुळे मराठी वाङ्मय संस्कृतीचे नुकसान झाले आहे. तसेच, व्यक्त होणाऱ्या स्त्रियांकडे पूर्वीपासूनच दुर्लक्ष करण्यात येत आहे. वाङ्मयीन इतिहासाची नव्याने मांडणी करण्याबरोबरच वर्तमानही पद्धतशीरपणे मांडण्याची गरज आहे,’ असा सूर सम्यक साहित्य संमेलनात आयोजित परिसंवादात व्यक्त झाला.

एसटीची 'महाबळेश्वर दर्शन' पॅकेज टूर

$
0
0
एक दिवसाच्या सहलीसाठी तुम्ही महाबळेश्वरला जाण्याचे नियोजन करणार असाल, तर आता तुम्हाला ते सहजशक्य होणार आहे. एसटीतर्फे येत्या १७ डिसेंबरपासून पुणे ते महाबळेश्वर दर्शन ही बससेवा दररोज सुरु करण्यात येणार आहे.

एसटी ऐकणार प्रवाशांच्या तक्रारी

$
0
0
एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणती तक्रार असेल तर ती तातडीने सोडवली जाणार आहे. प्रवाशांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्याचे तात्काळ निराकरण करण्यासाठी एसटी महामंडळाने दर मंगळवारी प्रत्येक स्थानकावर प्रवासी तक्रार दिवसाचे आयोजन करण्याचे निश्चित केले आहे.

एक शिक्षक एकच विषय शिकविणार

$
0
0
एकापेक्षा अधिक विषय शिकविणारे शालेय शिक्षक आता कालबाह्य होणार आहेत. यापुढे एका विषयासाठी एकच शिक्षक नेमण्याचा विचार शिक्षण खाते करत आहे. राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाने त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी या धोरणाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

प्रदेशनिष्ठ बेडकाला हेमंत घाटेंचे नाव

$
0
0
वैविध्यपूर्ण वन्यजीव आणि दुर्मिळ वनस्पतींनी समृद्ध असलेल्या पश्चिम घाटाच्या प्रयोगशाळेतून संशोधकाना सातत्याने नवनवीन प्रजातींच्या अस्तित्वाचे महत्त्वपूर्ण पुरावे मिळत असतात. नुकताच डॉ. आनंद पाध्ये, डॉ. निलेश डहाणूकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना एक प्रदेशनिष्ठ बेडूक सापडला आहे. या बेडकाला 'घाटेज श्रब फ्रॉग' असे नाव देण्यात आले आहे.

घड्याळ, कॅल्क्युलेटरना फुटणार वाचा

$
0
0
कॅल्क्युलेटरवर होणारा गणिती हिशेब कधी आवाजासह अनुभवला आहे? किंवा मनगटावरच्या घड्याळाने एखाद्या क्षणी किती वाजलेत हे सांगितल्याचे ऐकले आहे? जळगावचे प्रा. डॉ. राकेश रामटेके यांच्या अनोख्या संशोधनामुळे मनगटावरील घड्याळ आणि कॅल्क्युलेटर बोलू लागणार आहेत.

थंडीच्या कडाक्याने भाज्या महागल्या

$
0
0
थंडीचा कडाका वाढल्याने बाजारपेठेत आवक कमी झाल्याने भाजीपाला पुन्हा एकदा महाग झाला आहे. कांदा वगळता दुधीभोपळा, दोडके, भेंडी, गवार, काकडी, कारली, वांगी, घेवडा या भाज्यांच्या दरामध्ये दहा ते वीस टक्यांनी वाढ झाली आहे.

... तर केमिस्ट जेलभरो करतील!

$
0
0
विविध प्रलंबित मागण्यासाठी शांततेने आजपासून (सोमवार) बंद पुकारण्यात आल्याने कारवाई केल्यास आम्ही जेलभरो आंदोलन करण्यास तयार असल्याचे पुणे शहर जिल्हा केमिस्ट असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

'धूम-३'मुळे भरणार पालिकेची तिजोरी

$
0
0
आमीर खान-कतरिना आणि अभिषेक बच्चन यांचा बहुचर्चित धूम-३ येत्या आठवड्यात रसिकांच्या भेटीस येत आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांबरोबरच सरकारलाही धूम-३ ची प्रतिक्षा असून एकट्या पुण्यातच हा सिनेमा करमणूक करापोटी (एंटरटेनमेन्ट टॅक्स) तीन ते साडेतीन कोटी रुपयांची भर घालेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images